आसामच्या महिलांमधील कौशल्य वाढत आहे (Assamese women's skill development program in Marathi)

तिनसुकिआ,आसाम : तिनसुकिआ जिल्ह्यातील नटुंगांव मध्ये, स्थानिक आमदार राजू साहू यांच्या तीन लाख रुपयांच्या सहाय्याने आर्ट ऑफ लिव्हींगने महिला सबलीकरणासाठी नवीन श्री श्री कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. याचे उद्घाटन आमदार राजू साहू आणि संसद सचिव चबुआ यांनी केले.

या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना कापड कटाई आणि शिलाईचे तसेच विणकामाचे प्रशिक्षण दिले जाईल. या उद्घाटन प्रसंगी तिनसुकिआ जिल्ह्याचे उपायुक्त स्वामी पूर्णचैतन्य, एस.एस.आर.डी.पी चे विश्वस्त दीपक शर्मा, आसाम राज्याचे प्रसार माध्यमे समन्वयक अशोक के. थिर्ड, आसाम समन्वयक मौसमी शर्मा-बरपुजारी आणि इतर साधक उपस्थित होते.

आमदार श्री राजू साहू म्हणाले, “शिलाई-विणकाम केंद्र सुरु करण्याची संकल्पना घेऊन इतर संस्था माझ्याकडे आल्या होत्या, परंतु त्यांच्याकडे भविष्य काळासाठीच्या योजना नव्हत्या. परंतु तुमच्या श्री श्री ग्रामीण विकास प्रकल्पच्या आसाम शाखेच्या समन्वयक मौसमी शर्मा-बरपुजारी हा प्रकल्प दीर्घकालावधीसाठी निष्ठेने चालवण्यासाठी सुरु करणेबाबत उत्सुक होत्या. म्हणून मी सहमत झालो. ” त्यांनी या केंद्राला दोन शिलाई यंत्रे देण्याचे आणि प्रत्येक संभाव्य मदत करण्याचे आश्वासन दिले. आता या केंद्राकडे चार शिलाई यंत्रे आणि एक हात करघा यंत्र आहे.

उपायुक्त पुरू गुप्ता ज्यांनी या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रकल्पाला सहाय्य केले, ते म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्याचा हा एक अद्वितीय आणि प्रोत्साहन देणारा प्रकल्प आहे. त्यांनी सुचविले की आर्ट ऑफ लिव्हींगने त्यांच्या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे घ्यावीत ज्यामुळे त्यांना ताण-तणावावर मात करून कामाच्या ठिकाणी उत्तम सेवा देण्यास सहाय्य होईल.

श्रीयुत तीलेश्वर बारपात्रा गोखई यांनी या केंद्रासाठी आवश्यक जमीन भेट दिली. त्यांचे सुपुत्र निहार रंजन बारपात्रा गोखई या केंद्राचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, “जरी मी पूर्वी कितीतरी स्थानिक संस्थामध्ये काम करत असलो तरी या संस्थेमध्ये काम करत असताना गुरुदेवांच्या कृपेमुळे मनःशांती मिळत असल्याने सार्थक वाटते."

श्री श्री ग्रामीण विकास प्रकल्पाचे विश्वस्त श्री दिपक शर्मा म्हणाले, “आसाममधील अश्या प्रकारचा हा दुसरा प्रकल्प आहे. यापूर्वी तिनसुकीआ जिल्हा कारागृहामध्ये असेच केंद्र सुरु केले होते. परंतु सोई-सुविधांच्या अभावी तो बंद करण्यात आला. कु. मौसमी शर्मा बरपुजारी म्हणाल्या की, "भविष्यात सुपारीच्या पानांपासून पत्रावळी बनवण्याचा मानस या केंद्राचा आहे." अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे आसाम मधील हे एकमेव केंद्र असेल.

प्रकल्प समन्वयिका मौसमी शर्मा यांचा संपर्क : ०९९५४५७७७८८