एकत्रितपणा उत्कृष्ट’ : सामुहिक विवाहाचा दुसरा सोहळा दि. १७ मे,२०१४ रोजी संपला.
गौरी शितोळे : ०७०३०७५९१५७
सातारा, महाराष्ट्र : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय सोहळा असतो, म्हणून प्रत्येकजण तो उपलब्ध साधन-सामुग्रीद्वारा तो भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करतो. सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस गावचा एकवीस वर्षीय युवक अनिल नकुरे देखील अशाच शाही विवाहाचे स्वप्न पहात होता, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्याला लग्न कार्यालय देखील परवडणारे नव्हते. तो आपले पाहुणे आणि मित्र परिवारासाठी शानदार भोजन देखील देऊ शकत नव्हता. तो आणि त्याची एकोणीस वर्षीय वागवधू अश्विनी सोबत आरामशीर भावी वैवाहीक जीवनाचे आयोजन करत होता.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकारामुळे कमीत कमी खर्च आणि उपलब्ध साधन सामुग्री मध्ये या जोडप्याची महत्वकांक्षा पूर्ण झाली. आर्ट ऑफ लिव्हिंगने सातारा जिल्ह्यातील पवारवाडी येथे सामुहिक विवाहाचे आयोजन केले होते. तेथे कमीत कमी धार्मिक विधी आणि भव्य समारंभाशिवाय अनिल आणि अश्विनी यांचा विवाह झाला. धार्मिक विधीचे योग्य पठण पंडितांनी केले आणि भोजन देखील समाधानकारक होते. “जर आम्ही अशी व्यवस्था केली असती तर रु.७०००० -८०००० खर्च आला असता. परंतु खर्च फक्त रु. ९०००/- आला. यातून वाचलेल्या पैश्यामुळे आमच्या दोघांचे भविष्य सुरक्षित झाले.” ते म्हणाले.
त्याच दिवशी अनिल-अश्विनी सह आणखी सहा जण विवाह बंधनात बांधले गेले. एकाच विवाहाच्या खर्चामध्ये भव्य आणि समाधानकारक असा सोहळा सहज शक्य झाला. २०१३ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या या पुढाकाराला धन्यवाद. त्या वर्षी पहिल्यांदा पाच जोडप्यांचा विवाह झाला आणि या वर्षी १७ मे ला सात जोडप्यांचा विवाह झाला.
स्वामी संतोष नाईक, जे त्या दिवशी या सोहळ्याला उपस्थित होते, त्यांनी नव-दांपत्यांना आशिर्वाद दिले. या सोहळ्याचे संयोजक डॉ. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणतात, “या सामुहिक विवाहाचे आयोजन निव्वळ गरीब कुटुंबातील जोडप्यांना मदत करण्यासाठी केले आहे.” मंगल कार्यालयावर खर्च करण्यापेक्षा त्यांना आपण कमी पैश्यात कपडे, भांडी आणि जीवनावश्यक वस्तू पुरवू शकतो. हे खूप कमी खर्चात होते आणि गावकऱ्यांना देखील ते आवडते.”
या प्रसंगी बारामतीमधील तुळजाराम चतुर्वेदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लेक वाचवा’ नाटक सादर केले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे युवाचार्य- नेताजी जगदाथे, नितीन घोडके आणि मयूर जाधव यांनी हा सोहळा यशस्वी संपन्न होण्यासाठी विशेष सहकार्य केले.
ज्यांना या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी जयप्रतिक मंगल कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रकल्प समन्वयक ज्ञानेश्वर पवार यांचा संपर्क- ०९८२२९९२३४८