बघा आयुष्य कसे बदलले …विश्व विक्रमाने !!! (Dhangari People Stories In Marathi)

“ श्री श्री रविशंकरजी यांनी दिलेल्या संधीने आणि त्यांच्या कृपेने आम्ही आर्थिकरीत्या संपन्न झालो. आमची तरुण मुले, जे या पारंपारिक व्यवसाय आणि कले पासून दुरावली होती ती परत आली. यावेळी तर विश्व सांस्कृतिक मोहोत्सवाला मी माझ्या नातवासोबत दिल्लीला ११, १२ आणि १३ मार्च ला  निघालो आहे.” - श्रीपती बिरू माने, पेठवडगाव

 

विश्व सांस्कृतिक मोहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातर्फे ११००  धनगरी ढोल वादक आपली कला दिल्लीला ११, १२ आणि १३ मार्च दरम्यान सादर करणार आहे. ३२ गावांमधून येणारे हे  धनगरी ढोल वादक या वेळी जगभरातून १५५ देशांतून आलेल्या कलाकारांसोबत आपला झेंडा फडकवतील. त्यानिमित्त चालू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरला गेल्यावर दिसलेला जनसमुदाय आणि उत्साह काही अभूतपूर्वच आहे.

          एक विश्वविक्रम श्री श्री रविशंकरजींच्या आशीर्वादाने अभंगनाद या कार्यक्रमाच्या वेळी २०११ ला घडून आलेला आहे. १३५६ वादकांनी एकत्र येवून सादर केलेल्या कार्यक्रमाची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आणि या कलेला उत्तेजना मिळाली. कात टाकल्याप्रमाणे धनगरी ढोल वादकांचे आयुष्य पूर्णतः बदलले. या सर्वांमागे आशीर्वाद होता श्री श्री रविशंकरजींचा.

         जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह झिझविती परोपकारे ।। 

लोककलांना प्रोत्साहन मिळावे आणि आपली अतुल्य संस्कृतीचे प्रदर्शन जगापुढे व्हावे यासाठी श्री श्री रविशंकरजी यांनी अनेक विश्व विक्रम घडवून आणले. उदा. - कुचीपुडी नृत्य, ताल निनाद, अभंग नाद इत्यादी. या लोक कलांना पुढे आणत विश्व विक्रम करत, लोकांचे आयुष्य पूर्णतः बदलण्याची किमया त्यांनी करून दाखवली. 

       धनगरी ढोल वाजवत विश्व विक्रम झाल्यानंतर अनेकांच्या जीवनाचा कायापालट झाला - बऱ्याच लोकांचे उत्पन्न वाढले. समाज एकत्र आला, कित्येक जणांना आयुष्यात चांगले करण्याची प्रेरणा मिळाली, कित्येकजण शिक्षणाकडे वळले, दूर गेलेली युवा पिढी पुन्हा एकत्र आली असे अनेक लाभ कथन करताना,या सर्वांचे अनुभव घेताना - जाणवली ती कृतज्ञता, भक्ती आणि कमालीचा दुणावलेला आत्मविश्वास.

सर्वच अनुभव इथे लिहिता येणार नाही पण "एक तरी ओवी अनुभवावी" तसे "एक तरी अनुभव वाचून बघावा" असे अभूतपूर्व  काही अनुभव लिहित आहे.

    “‘अभंगनाद’ नंतर या ढोलाने आमची जपणूक सुरु केली आहे. शेळ्या-मेंढ्या पालन आणि छोटी मोठी शेती हे आमचे व्यवसाय. नव-नवीन आणि पाश्चिमात्य वाद्यांच्या मुळे आमची वाद्ये आणि कला मागे पडत चालली होती. परंतु अभंगनाद नंतर आमची कला जगासमोर फार मोठ्या प्रमाणात आली.आता ढोल वादनाने आमची आर्थिक मिळकत सुरु झाली. गणेश उत्सव, नवरात्री इतर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये आम्हाला निमंत्रण मिळू लागले. समाजात आर्थिक सुबत्ता आली. व्यक्तिगत माझे उत्पन्न मासिक ५००० रु. वरून १५००० रु. पर्यंत वाढले. आमच्या समाजातील बहुतांशी लोक अशिक्षित तसेच कमी शिकलेले होते. समाजामध्ये व्यसनाधीनता होती, तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धा होत्या. अभंगनाद नंतर आता मुलांसोबत मुली देखील शिकत आहेत. तंत्र-मंत्र वगैरे अंधश्रद्धा दूर होत चालल्या आहेत. समाजात मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली. आमचा तरुण वर्ग परत कलेकडे  वळला. हे सर्व घडले आहे आर्ट ऑफ लिव्हींगमुळे, गुरुजींच्या मुळे. त्यांच्या रूपाने आम्हाला भगवंतच भेटला. ” - बिरदेव बाळासो रानगे, नागांव, कोल्हापूर, महाराष्ट्र

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 “ आमच्या कलेला एवढे मोठे व्यासपीठ मिळेल, हा विचार देखील आला नव्हता. अभंगनाद नंतर व्यक्तिश: माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे जीवन बदलून गेले. अभंगनाद वेळी गुरुजींना १० मिनिटे भेटायचा योग आला. त्यांचे विचार ऐकायला मिळाले, आणि कळाले की, प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो. आम्ही देखील आमच्या समाज बांधवांसाठी काहीतरी करायचे ठरवले आणि आम्ही एक ग्रुप बनवला. लुप्त होत चाललेल्या गाजी नृत्य, वालूग, ओव्या, हेडाम या कलांना चालना दिली. आज आम्हाला या माध्यमातून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी देखील निमंत्रणे येतात. पूर्वी गाव आणि वाड्यांवर आमच्यामध्ये छोटे छोटे गट होते, गटबाजी होती, भांडणतंटे होते. आता या सरावाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो, त्यामुळे गटबाजी, भांडणतंटे नाहीसे झाले आहेत. आर्थिक सुबत्तेबरोबर आमच्यामध्ये एक आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली आहे, अंगी शिस्त बाणली आणि हे सर्व घडले आहे आर्ट ऑफ लिव्हींगमुळे. ”  - बाळकृष्ण आ. कुरुंदवाडे, अब्दुललाट,कोल्हापूर, महाराष्ट्र

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“ पाचवीनंतर शाळा सोडून काकांच्या शेळ्या-मेंढ्या चारणे आणि ढोल वाजवणे, हेच माझे जीवन बनले होते. ग्रामीण भागात रहात असल्याने आणखी वेगळे आयुष्य असते हेच माहित नव्हते. ढोल वादनामुळे अभंगनाद मधील सहभागामुळे, आर्ट ऑफ लिव्हींगमुळे प्रगत जीवनाची ओळख झाली. जीवनात नवी उर्मी आली. श्री श्री रविशंकरजींच्या दर्शनामुळे, सहवासामुळे आणि प्रवचनातील मार्गदर्शनामुळे पुन्हा शिकण्याची इच्छा निर्माण झाली.सुदर्शन क्रियेमुळे मन शांत, स्थिर, एकाग्र झाले. दहावी-बारावीच्या शिक्षणानंतर वर्षभर स्पर्धा परीक्षांचा सराव केला आणि पोलिस भरतीमध्ये निवड होऊन पोलीस झालो. सध्या कोल्हापूर पोलिस मुख्यालयामध्ये नोकरी करतो आहे. उत्तम जीवन, उत्तम कुटुंब प्राप्त झाले आहे. आता माझ्या संपर्कात येणाऱ्या, अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या मुलांना मी शिकण्यासाठी प्रवृत्त करतो, सहकार्य करतो. आर्ट ऑफ लिव्हींग आणि गुरुदेवांमुळे उत्तम जीवनाची ओळख झाली, सेवेचे महत्व समजले.” - महादेव मुरारी रानगे, कागल, पोलीस कॉन्स्टेबल

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“ ‘अभंगनाद’ पूर्वी माझ्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. पण अभंगनाद सराव आणि मुख्य कार्यक्रमांमध्ये कला सादर करे-करे पर्यंत आर्ट ऑफ लिव्हींगच्या स्वयंसेवकांसोबत सेवा करत करत मी कधी कसा घडलो कळालेच नाही. आता मी शंभर पेक्षा जास्त व्यक्तींची मिमिक्री स्टेजवर करतो. व्यावसाईक कलाकार बनल्याने बाहेरच्या कार्यक्रमांची ऑर्डर घेतो. माझे, माझ्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न चांगलेच वाढले आहे. माझी मुले चांगल्या शाळेत शिकतात. त्यांच्यावर मी चांगले संस्कार करू शकलो. गुरुकृपेमुळेच जीवनात ईश्वर कृपा बरसू लागली. धन्यवाद आर्ट ऑफ लिव्हींग – धन्यवाद गुरुजी. “ - कृष्णात गणपती शेळके

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

   “श्री श्री रविशंकरजीनी ‘अभंगनाद’ मुळे आमच्या कलेला आणि समाजाला प्रकाश झोतात आणले, उद्धार केला. अभंगनाद नंतर आमच्या श्री.मुरसिध्द /ओविकार मंडळाला भारतभर तसेच श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि ऑस्ट्रेलियाला कला सादर करण्याची संधी मिळाली. गुरुदेव आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रेरणेने माझे उर्वरित जीवन कला संगोपन आणि संवर्धनासाठी, सेवेसाठी वाहून घेतले आहे. माझे जीवन सर्वार्थाने समृद्ध बनले. मुख्य म्हणजे अभंगनाद नंतर आमच्या ग्रुपच्या प्रतिभेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वालुग, गाजनृत्य, ओवी यांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक प्रश्नांबाबतीत समाजात जागृती आणत आहोत. विश्व संस्कृती महोत्सव नंतर गुरुजी सगळ्या विश्वात फिरवतील. जीवन कृतार्थ करतील, याची खात्री आहे.” - पैलवान बाळासाहेब लक्ष्मण मंगसुळे, कुपवाड

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

     “गुरुजींचा मी अत्यंत ऋणी आहे. त्यांच्या सुदर्शन क्रियेबद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. लहानपणापासून कुस्त्यांचा नाद, खूप कुस्त्या जिंकल्या परंतु कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताची असल्याने पुढे खेळू शकलो नाही. जीवनात नैराश्य आले. आई-वडील दोघेही एक महिन्याच्या अंतराने मृत्यू पावले. जीवन नकोसे झाले. परंतु ढोल वादनाच्या निमित्ताने गुरुजींचे दर्शन झाले आणि मन आपोआप खूप शांत होऊन गेले. जीवन समतोल बनले. मग आर्ट ऑफ लिव्हींगचे शिबीर केले. मनातील कोंडलेला सगळा-सगळा कचरा निघून गेला. खूप रडलो - सावरलो. आयुष्यात रस आला, शेती करू लागलो. शेती वाढवली. जीवन सुधारले. ओव्या-पोवाडे गातो. जीवन एकदम मस्त झाले आहे.” - गजानन पुजारी, शिगांव

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे अनुभव वाचल्यावर खरोखरच म्हणावेसे वाटते

        जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें । तोचि  साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा ।।

आम्ही आपली वाट पहातोय

दिल्लीला येणारे कित्येक जन आपला व्यवसाय दुसऱ्याच्या हाती सोपवून, कोणी आपल्या नातवासोबत, कोणाच्या शेळ्या मेंढ्या ची जबाबदारी शेजाऱ्याकडे देत तर कोणी आपले घरातील कार्यक्रम पुढे

ढकलत या जागतिक वारी साठी निघाले आहेत. हे सर्वजण एकत्र येऊन एकच  मागणे करत आहेत

 “ आता ३५ लाख लोकांच्या सोबत  दिल्लीला आम्हीही  निघालोय आणि आपली वाट पहातोय, तुम्हीदेखील या.“

दिल्लीला होणाऱ्या अश्या या भव्य-दिव्य आणि पवित्र सादरीकरणासाठी सर्व स्तरांमधून हातभार लावण्याची गरज आहे. आपल्याला यथाशक्ती जी पण मदत करण्याची इच्छा असेल किंवा यात सहभागी व्हायचे असेल तर यासाठी संपर्क - विजय हाके : ०९४२२७४८९१० शेखर मुंदडा : ९८६०७५५५४४  राजश्री दिदी : ९८९०९६९९९६   डिंपल दीदी : ९८९००१९९९२ 

संकलन - राजेंद्र लकडे

अधिक माहितीसाठी / प्रतिसाद देण्यासाठी संपर्क - webteam.india@artofliving.org

==========================================================================

विश्व सांस्कृतिक मोहोत्सव

कार्यक्रम स्थळ  : मयूर विहार फेज्-१ मेट्रो स्टेशन च्या समोरचे मैदान, दिल्ली
दिनांक  : ११ से १३ मार्च ,२०१६
वेळ : प्रथम दिवस - संध्याकाळी  ५ वाजेपासून,
दुसरा आणि तिसरा दिवस - सकाळी १० वाजेपासून

==========================================================================