‘पेय जल कृपा’ (Pure drinking water in Karanataka Marathi)

पेय जल कृपा’ : कर्नाटकातील गावकऱ्यांवर शुद्ध पाण्याच्या रूपाने बरसली.

आजुबाजुच्या बारा खेड्यांना माफक दारात पेयजल मिळेल.

चिक मंगळूर,कर्नाटक :  लाख्या हुबळी आणि चिक मंगळूर यांच्या दरम्यान असणाऱ्या सिंदीगेरे  खेड्यातील भू-जलामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ते पाणी पिण्यास योग्य नव्हते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जल शुद्धीकरण प्रकल्पामुळे ग्रामस्थांना शुध्द पेय जल मिळत आहे.

सिंदिगेरे येथे वेदवती नदीचे परीक्षण करताना हे भूजल पिण्यास योग्य नसल्याचे लक्षात आले. यामुळे ग्रामस्थ नेहमी आजारी पडत आणि महिला व मुलांची विषाणूंची बाधा, ताप, खोकला आणि सांधे दुखीची तक्रार होत असे. परंतु ‘गेल्या पाच महिन्यांपासून कुटुंबीय निरोगी असल्याचे आणि त्यांचा आजारपणा कमी झाल्याचे’ तोत्ताप्पा या ग्रामस्थाच्या लक्षात आले आहे.

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. इस्माईल म्हणाले की, "अशुद्ध पाण्याच्या प्राशनामुळे होणाऱ्या आजारांमध्ये १०-२०% घट झाली आहे. तथापि ग्रामस्थांची जीवनशैली बदलून आणि त्यांना स्वच्छतेचे धडे देऊन बरेच काही करू शकतो."

अशुद्ध जल प्राशनाचा ग्रामस्थांना मोठा धोका होता.‘शुद्ध गंगा’ प्रकल्पाचे समन्वयक नागराज (०९६११८०८०८६) यांनी ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला. मार्च २०१४ मध्ये पायाभरणी झालेल्या या प्रकल्पाचा बांधकाम आणि यंत्र सामुग्रीचा खर्च आर्ट ऑफ लिव्हींगने केला आहे.

ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी आता नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध झाले आहे. नजीकच्या काळात या प्रकल्पामधून आसपासच्या १५ गावांना शुद्ध पाणी पुरवले जाईल.यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निव्वळ या गावालाच पाणी पुरवठा होत आहे.