महिलांनी दारूबंदीचा संघर्ष जिंकला (Success stories of war against alcohol in Marathi)

ग्रामस्थांचे दररोज अडीच लाख रुपये मद्यपानावर खर्च होत होते.
संतोषी निंबाडकर ०८८१७६३०७०९

करेली गावाच्या महिला मद्य विरोधी संघर्षाच्या पवित्र्यात :

धामतरी, छत्तीसगढ़ : करेली गावच्या महिला आणि युवकांनी हे सिद्ध करून दाखवले की कणखरपणामुळे सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. ते दारूबंदी बाबतीत एकत्र आले आणि ज्या दुकानात ग्रामस्थांचे दररोज अंदाजे अडीच लाख रुपये खर्च होत होते, अशा गावातील ग्रामस्थांनी दारू विक्री केंद्र बंद करण्याचे ठरवले. या दुकानातून आजूबाजूच्या बारा गावांमध्ये दारूचा पुरवठा होत होता.

“पुरुष दारूचे व्यसनी बनल्याने या गावातील महिला अडचणीत आल्या होत्या”, अमृतबाई म्हणाल्या, तिचा पती दिवसभर दारू प्यायचा. ती म्हणाली, “जमीनदाराच्या शेतात राबून मिळवलेली सगळी मजुरी दारूवर खर्च व्हायची. शिवाय त्यामुळे माझ्या पतीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला होता.

मद्यपीची आई अनुसया बाई म्हणाली, “माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने दारू प्यायला सुरुवात केली होती. आणि त्याची अभ्यासाची आवड कमी होऊ लागली होती”.  ग्रामस्थ आणि आणि त्यांच्या कुटुंबावर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम झाला होता.

मद्यपानाचे दुष्परिणाम आणि त्याचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतीत ग्रामस्थांमध्ये जागृती आणण्यासाठी विविध व्हिडीओ आणि चित्रफिती दाखवल्या गेल्या. लोकांच्यामध्ये मानवी मूल्ये रुजवण्यासाठी आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी हे मद्य विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी करणारी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन पत्रांवर सह्या करून ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. अल्पावधीत राजकीय पुढाऱ्यांनी साथ दिली. तसेच स्थानिक प्रसार माध्यमांनी या आंदोलनाला चांगलीच प्रसिद्धी दिली.

तरीदेखील ते दुकान बंद होण्याचे नांव नव्हते. त्यातच आणखी एक दुकान सुरु करण्यासाठी निविदा मागवल्या. यामुळे ग्रामस्थ आणि स्वयंसेवक आणखी चिडले. स्वयंसेवकांनी आंदोलन करण्याचे ठरवले. ते ४७ दिवस चालले. शेवटच्या दिवशी आंदोलकांनी ते दारूचे दुकान पाडून त्या जागेवर मंदिराचे बांधकाम सुरु केले. आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक परशुराम निर्मळकर यांनी या आंदोलनामध्ये पुढाकार घेतला.

आंदोलन सुरु असताना या दारू दुकानाच्या पाठीराख्यांनी मध्यस्थी करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जितेन निषाद यांनी वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंगमध्ये ग्रुप बनवून स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले.

निषाद, नागेश वर्मा, व्यासनारायण साहू, यादरम साहू, परमानंद साहू, किशोर साहू, के.उमादेवी या स्वयंसेवक आणि युवाचार्यानी ही चळवळ यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

प्रकल्प समन्वयक परशुराम निर्मळकर : ०९६१७८९७०६३