झारखंड मधील आदिवासी मुलांच्या आशा श्री श्री विद्यामंदिरमुळे पल्लवीत (Education of tribals in Jharkhand in Marathi)

 

झारखंड :  भारतातील नक्षलवाद्यांनी ग्रस्त एक राज्य, झारखंड मधील लोकसंख्येचा मोठा भाग आदिवासी भागात रहातो. ही रहिवासी ठिकाणे एकमेकांपासून दूर-दूर असल्याने यातील आदीवासींना आधुनिक जग आणि प्रगत तंत्रज्ञानाची माहिती नाही. खूप कमी लोकांना शिक्षण मिळू शकते आणि याचा विपरीत परिणाम येणाऱ्या पिढीवर होतो.

आज चावलांनी नक्षलवादी ग्रस्त भागातील मुलांच्यासाठी, काम करण्यासाठी एक टीम बनवली आहे. टीमने, आपले ब्रीदवाक्य, ‘दीर्घ प्रवासासाठी छोटे पाऊल’ प्रमाणे झारखंड राज्याच्या प्रगतीसाठी मोठी झेप घेतली आहे. दोन उच्च माध्यमिक, एक माध्यमिक आणि १४ प्राथमिक शाळांच्या द्वारे २८०० पहिल्या वंशाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्वांगीण शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी, जे श्री श्री विद्यामंदिराचे वैशिष्ट्य आहे. आदिवासी मुलांनामूल्याधारित शिक्षणासह आधुनिक सोई-सुविधा मिळत आहे, हीच या टीमच्या कामाची साक्ष आहे.

मुले अकिकी लिपी, तसेच मुंडारी, ओरॉन या मातृभाषेत शिकत असल्याने त्यांच्यासाठी भाषा, शब्दार्थ शब्दसंग्रह आणि व्याकरण यांच्या माध्यमातून परिणामकारक संपर्क ठेवण्यामध्ये प्राविण्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे हिंदी आणि इंग्रजी सारख्या इतर भाषा अवलोकने सोपे झाले आहे.

फिरता दवाखाना

या भागामध्ये कोणतीही शासकीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. एक तज्ञ डॉक्टर फिरत्या दवाखान्यामधून वेगवेगळ्या गावांना भेट देऊन या शाळांमधील विद्यार्थी आणि इतर गावकऱ्यांचे नियमित तपासणी करतात. प्रत्येक भेटीमध्ये अंदाजे ६० रुग्णांना उपचार केले जातात.

शून्य खर्चाधारीत नैसर्गिक शेती

या प्रकल्पाचा उद्देशच रसायनमुक्त शेतीची प्राचीन तंत्रे पुन्हा प्रचलित करणे आहे आणि अनेक स्थानिक गावकरी या चळवळीमध्ये सामील झाले आहेत. त्यांना हे पटले आहे की, आजपर्यंत जिच्यावर रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर झाला आहे, त्यांची शेती निव्वळ रसायनमुक्त शेतीमुळेच वाचू शकते.

वृक्षारोपण

विद्यार्थी आणि गावकरी यांच्या सहभागातून या शाळा आणि आसपासच्या भागामध्ये जवळपास फळे आणि वनौषधी यांची वर्षाला दोन हजार झाडे लावली गेली. स्थानिक गावकऱ्यांना मुळातच निसर्ग आणि आजूबाजूला हिरवी वनराई आवडत असल्याने शाळा वृक्षारोपण आयोजित करतात.

स्त्रियांसाठी व्यावसायिक केंद्र

ग्रामीण भागातील पालक, सामान्यतः त्यांच्या मुलांनी त्यांच्या शेतात किंवा घरगुती कामे करावी, ज्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काही पैसे मिळतील, असे इच्छितात. परंतु कौशल्य विकसन प्रशिक्षणांतर्गत शाळेतील मुलींना शिवणकला शिकवली जाते. जिच्यामुळे त्यांना ज्यादा उत्पन्न मिळणेस मदत होते.

विषयांचा अद्वितीय मिलाप 

विज्ञान आणि गणिताच्या अभ्यासासाठी या विषयांचा सुंदर मिलाप या टीमने स्थानिक जनजीवनाशी घडवला आहे. उदा. पर्यावरणाचे संरक्षण आणि समतोल, हरीतगृह वायू, ओझोन थराचे घटणे हे विषय त्यांना ‘सारहुल उत्सव’ ( निसर्ग आणि वृक्षवल्लींचे पूजन) च्या माध्यमातून समजावले जातात, हा शिक्षण देण्याचा एक उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण मार्ग आहे. जीवनामध्ये स्वाभिमान आणि आदीवासी संस्कृती बद्दल आदर बाणण्यासाठी आदीवासींचे आदर्श, जसे बिरसा मुंडा आणि सिधू कान्हू सारख्या व्यक्तिरेखांना समजावले जाते.

जागतिकीकरणाशी जोडले जाण्यासाठी बदलांना स्वीकारण्यासाठी व्यक्ती विकास केंद्र्ने आदीवासी प्रकल्प सुरु करण्यासाठी, आदीवासींना अद्यावत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरण बचावासाठी आदिवासी जमातींना सुशिक्षित करणे हा सर्वात परिणामकारक मार्ग आहे.

मुलभूत शिक्षण

या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीच्या मनावर शहरी शैक्षणिक पद्धतींचे प्रतिबिंब न बिंबवता मुलभूत शिक्षण देणे हे पहिले पाऊल होते. मुलांना सुशिक्षित करून सुजाण नागरिक बनवण्यासाठी मदत करणे जेणेकरून ते आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतील आणि पर्यावरणाचा आदर करतील, हा उद्देश्य होता. भाषाशास्त्र, अंकगणित, मूल्यशिक्षण, कृषी, योगा, ध्यान आणि खेळ इ. विषयांच्या व्यावहारीक पैलूंनी युक्त संतुलित अभ्यासक्रम आहे. काळजी घेणारे जबाबदार नागरिक बनवण्याच्या उद्देश्याने हे विषय समाविष्ट केले आहेत.

पहिली सुशिक्षीत पिढी बनवण्यासाठी त्यांना शिक्षण देण्यासाठी, १९९९ साली श्री श्री विद्यामंदिर सुरु झाले. आता या शाळा शून्य खर्चाधारित शेती, तंत्र प्रशिक्षण केंद्र, मोफत वैद्यकीय शिबीर तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सारख्या ग्रामीण प्रगतीच्या प्रकल्पाचे केंद्र बनले आहेत.

या शाळांमधील शिक्षक स्थानिक गावामधून घेतले गेलेत आणि प्रत्येक शाळेमध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बहुमाध्यमिक (मल्टीमिडिया) साधनांनी युक्त असे वर्ग आहेत. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याच्या सततच्या मूल्याधारित शिक्षणाची गरज जाणून घेण्यासाठी तत्पर आणि जबाबदार असतात, ज्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, सांस्कृतिक जोपासना, अहिंसा, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाबाबतीत सजगता यांवर भर दिला जातो. अभ्यासक्रमामध्ये, धनुर्विद्या, हॉकी, कब्बडी आणि सॉसर सारख्या स्थानिक खेळांचा समावेश आहे. ज्युनिपर प्रणालीनी युक्त अशी अद्यावत संगणक प्रयोगशाळा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
 

झारखंड प्रकल्प समन्वयक बी.बी.चावला. संपर्क   ०९८३६४८१९२९