तुम्ही नियमित ध्यान करत असाल, पण कधी असे होते ना, की तुम्ही तुमच्या विचारांमध्ये भटकत जाता? ध्यान कसे करावे ही पहिली पायरी झाली, पण ध्यानाच्या गहिऱ्या अनुभवांसाठी अजून काही पद्धती शिकाव्या लागतील. ध्यानाचा अनुभव अधिक उत्तम येण्यासाठी पुढील ६ टिपा वापरून पहा.
१. दुसऱ्याच्या चेहेऱ्यावर हास्य आणा
गरज असणाऱ्याला मदत करणे हे नेहमीच समाधान देते. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेंव्हा तुम्हाला आनंदी वाटते आणि जणू सकारात्मक ऊर्जेचा तुमच्यामध्ये विस्फोट होतो. तुमच्या स्वत्वाच्या विस्ताराचे कारण म्हणजे, जेव्हा तुम्ही सेवा करता आणि कुणाच्यातरी चेहेऱ्यावर हसू आणता तेंव्हा तुम्हाला चांगली स्पंदने आणि आशीर्वाद मिळतात. सेवेमुळे तुमची गुणवत्ता वाढते आणि त्यामुळेच ध्यानातले गहिरे अनुभव तुम्हाला अनुभवता येतात.
"मी जेंव्हा सेवा करते तेंव्हा मला मिळणाऱ्या समाधानामुळे मी आनंदी आणि शांत होते. जेंव्हा मी शांत आणि समाधानी असते, तेंव्हा मला खात्री असते की माझे ध्यान अधिक चांगले होईल."
शिल्पी मदन
२. शांततेचा आवाज अनुभवा
अथांग, प्रसन्न आकाशाकडे नजर स्थिर ठेऊन जेव्हा तुम्ही सूर्योदय पाहता, तेव्हा तुम्ही तुमच्या आतील शांतता, उगवत्या सूर्याशी आणि प्रसन्न पहाटेबरोबर असलेली एकरूपता अनुभवा. ते अतिशय सुंदर स्थिरतेचे आणि शांततेचे काही क्षण, तुमची अंतर्बाह्य सुंदरता दाखवणारे ते क्षण शब्दातीत असतात.
हे असं होतं कारण, मौनात विचार कमी असतात आणि तुमचे मनही शांत होते. बऱ्याचदा आपलं मन अर्थहीन संवादात व्यस्त असतं आणि आपली इंद्रियं बाहेरून माहिती गोळा करून विविध विचार आणि ठसे उमटवण्यात व्यस्त असतं.
मौन ध्यानाला मदत करते. तुम्ही मौनात असता तेव्हा मनाची धाव कमी होते आणि सखोल ध्यान होणे सोपे जाते. मौन आणि ध्यान दोन्हीचा एकत्रित अनुभव घ्यायचा सोप्पा मार्ग म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे पार्ट २ शिबीर.
"कधी कधी मला न संपणाऱ्या विचारांच्या शृंखलेमध्ये अडकल्यासारखे वाटते. मौनामुळे हा विचारांचा मारा कमी होतो आणि गहिऱ्या ध्यानाचा अनुभव घेता येतो."
हितांशी सचदेव
३. योगासनांच्या मदतीने शरीर ताणून शरीराचे कोडकौतुक करा
तुमच्या लक्षात आलं असेल, की कधी कधी ध्यान करताना अतिशय अस्वस्थ वाटते आणि ध्यान नीट लागत नाही. या अस्वस्थतेचं कारण म्हणजे, खूप वेळ काम केल्याने शरीरामध्ये एक प्रकारचा ताठरपणा येतो आणि कुठे कुठे वेदनासुद्धा होतात. योगासने केल्याने हा ताठरपणा निघून जातो आणि अस्वस्थता कमी होते. मग मनही शांत होते आणि चांगल्या ध्यानाचा अनुभव घेता येतो.
४. तुम्ही काय खाताय ते पहा.
तुम्ही तेलकट, तळलेले, मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर केलेले ध्यान आणि पचायला हलके, आरोग्यपूर्ण अन्न खाल्ल्यानंतर केलेले ध्यान आठवा. नीट लक्ष द्याल तर तुम्हाला जाणवेल की ध्यानाच्या गुणवत्तेमध्ये अन्नाने फरक पडलेला आहे. याचं कारण असं आहे की तुमच्या अन्नाचा तुमच्या मनस्थितीवर सरळ सरळ परिणाम होतो.
ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या आदर्श अन्नामध्ये धान्य, हिरव्या भाज्या, ताजी फळे, कोशिंबीर, सूप, आदी हलके, पचायला सोपे आणि प्राणशक्ती जास्त असलेले अन्न समाविष्ठ असावे.
५. गीते गुणगुणा
विविध गाणी विविध भावना जागृत करतात हे आता सर्वांना माहित आहे. आपल्यामध्ये जवळपास ९०% अवकाश आहे, त्यामुळे आवाजाचा आपल्यावर लक्षवेधी परिणाम होतो. सत्संगामध्ये गायल्याने भावना शुद्ध होतात आणि आतमध्ये काहीतरी विस्तारित झाल्याची जाणीव होते. छोटे मन जे सतत काहीतरी क्षुल्लक बोलत असतें ते शांत होते आणि मग तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा तुम्हाला चांगले अनुभव येतात.
ध्यानाच्या उत्तम अनुभवासाठी संगीताचा कसा उपयोग होतो ते अनुभवाने जाणून घ्या.
६. ध्यानाची वेळ ठरवा
ध्यानाच्या चांगल्या अनुभवांसाठी शिस्त आणि सरावाचा मान ठेवणे आवश्यक आहे. रोज ठराविक वेळेला नियमित ध्यान केल्याने सखोल ध्यानाचे जादुई जग तुमच्यापुढे खुले होते.
ऑनलाईन मार्गदर्शक ध्यानपद्धतीने ध्यान आणि विश्रांतीचा अनुभव घ्या.
श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानचर्चांवरून प्रेरित
प्रियदर्शिनी हरिराम या आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षकेने दिलेल्या माहितीवर आधारित
नियमित ध्यान केल्याने ताण तणावातून येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळते आणि संपूर्ण शरीरसंस्थेचे पुनरुज्जीवन होते. आर्ट ऑफ लिव्हिंग चे विशेष शिबीर तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जाऊन तुमची अमर्याद शक्ती ओळखायला मदत करते.
तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये होणाऱ्या सहज समाधी शिबिराची माहिती जाणून घ्या.