सूचिबद्ध :ध्यानाचे अविश्वसनीय फायदे

ध्यान काय आहे?

ध्यान विश्राम आहे.ध्यान म्हणजे एकाग्रता  नव्हे, खरेतर (मनाची) एकाग्रता न करणे  ध्यान आहे.  एखाद्याने विचार कोणत्याही विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करणे नव्हे, तर त्याऐवजी मनाच्या अशा कोषात प्रवेश करणे आहे जिथे विचारच नाहीत. एकंदरीत ध्यानाच्या फायद्यांमध्ये शांत मन, एकाग्रतेमध्ये वृद्धी/वाढ होणे , संभाषण आणि (विचारांच्या) स्पष्टतेमध्ये सुधारणा होणे, मन आणि शरीराला विश्राम मिळणे यांचा समावेश होतो. ध्यानाच्या नियमित अभ्यासाचा सखोल प्रभाव अथवा  परिणाम आपल्या अस्तित्वाच्या तीन अत्यंत महत्वाच्या स्तरांवर होतो -शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक.

अनेक अभ्यासांमध्ये नियमित ध्यानाच्या सवयीचे महत्व उद्धृत केलेले आहे. खरेतर, अनेकजण असे समजतात कि ध्यान आजच्या व्यग्र/कार्यव्याप्त काळात गरजेचे आहे. खूप यशस्वी, निरोगी लोक असे समजतात कि त्यांना ध्यानाची आवश्यकता नाही. स्पष्टता , केंद्रितता आणि आनंद हे तुम्हाला  फक्त अभ्यासामुळेच (ध्यानाच्या) प्राप्त होतात. एखाद्या पावसाळ्यातील दिवसाची वाट पाहत बसू नका जेव्हा तुम्हाला सुरुवात करण्याची अनुभूती होईल.

५ शारीरिक फायदे ध्यानामुळे होणारे 

एखादी  व्यक्ती  ध्यानाचा नियमित अभ्यास करणारी व्यक्ती बनते, तिथे लक्षात येईल असा वृद्धिंगत होणारा आनंद, शांतता आणि उत्साह दिसतो. हे घडते कारण शरीरातील प्राण  (जीवन शक्ती ऊर्जा) वृद्धी होते.

शारीरिक स्तरावर, ध्यान:

  • उच्च रक्तदाब कमी करते
  • रक्तातील लॅक्टिक (अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर होताना तयार होणारे ऍसिड )प्रमाण कमी करते,  
  • ताण  कमी करते – त्या  अनुषंगाने  होणाऱ्या  वेदना ( डोकेदुखी , क्षत (व्रण) ,निद्रानाश , स्नायू  आणि 

    सांधे दुखीचे त्रास ) 

  • रोगप्रतिकार प्रणाली बळकट करते
  • ऊर्जेच्या पातळीत वाढ करते  

 

११ मानसिक फायदे ध्यानाचे

ध्यान  

ध्यान मेंदूतील तरंगांचा साचा-अल्फा स्टेटची  (वैज्ञानिक भाषेत अशी स्थिती जी उजव्या मेंदूची क्रिया जसे विश्राम, शांतता, सृजनात्मकता, कल्पनाविस्तार याकरिता आहे) स्थिती आणते जी बरे होण्यासाठी प्रोत्साहित करते. मन ताजे, कोमल व सुंदर होते. ते तुम्हाला आतून पवित्र करते आणि तुमचे पोषण करते आणि तुम्हाला शांत करते,जेव्हा तुम्ही हतबल/ व्याकुळ होता, अस्थिर , किंवा भावनिकदृष्ट्या डळमळीत अनुभव करता .

  • भय चिंता कमी होते
  • भावनिक स्थिरतेमध्ये सुधारणा होते
  • सृजनात्मकता वाढते
  • आनंद वाढतो अंतः प्रज्ञा विकसित होते
  • मनामध्ये शांती आणि स्पष्टता प्राप्त होते
  • मानसिक चपळता वाढते
  • मनाला विश्राम देते
  • उत्तम स्मृती आणि तिची धारणा 

  अभ्यासाने (संशोधकांच्या) हे दाखवून दिले आहे कि ५० वर्षे वयात ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमधील प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स मधील ग्रे मॅटर (ग्रे मॅटर - मेंदूमधील भाग आहे जो स्मृती , ऐकणे, बोलणे, बघणे, भावना , स्वतः वरील ताबा , निर्णय क्षमता अशा महत्वाच्या गोष्टी नियंत्रित करतो. प्री फ्रॉन्टल- आपल्या कपाळावर भुवयांच्यावर मेंदूचा जो भाग आहे त्याला प्री फ्रॉन्टल असे म्हणतात. इथे ग्रे मॅटर  प्री फ्रॉन्टल मधील आहे कारण ग्रे मॅटर पूर्ण मेंदूमध्ये असते.) २० वर्षे वय असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या एवढे असते. ह्याचा परिणाम म्हणजे स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता दोघांची सारखीच होते.

४ मुद्दे लक्षात ठेवण्याचे

  • तुमचा आनंद तुमची आंतरिक स्थिती ठरवते प्रति ध्यान तुम्हाला सजग करते
  • सजग (तीक्ष्ण ) मन आणि विस्तृत (विस्तारित) चेतना यांचे संतुलनच शांतता प्रस्थापित करू शकते
  • सजग (तीक्ष्ण ) मन विस्ताराशिवाय तणाव ,राग आणि निराशा/वैफल्याचे कारण बनते.
  • सजगतेशिवाय (तीक्ष्णते शिवाय) विस्तृत चेतनेची परिणीती उत्कर्षाच्या अभावात परावर्तित होऊ शकते

ध्यानाचे हे सर्व फायदे घेण्याचा उत्तम मार्ग काय आहे?

  • नियमित अभ्यास /सराव गरजेचं आहे.
  • दिवसातून फक्त २० मिनिट घेते. एकदा दिनचर्येमध्ये ते समाविष्ट झाले , कि हे तुमच्या 

   दिवसातील सर्वोत्कृष्ट भाग बनते.

  • दोन  महिन्याच्या नियमित अभ्यासानंतर  ध्यानाच्या फायद्यांचा अनुभव तुम्ही घेऊ लागता. 
  • हलके/ रिकामे पॉट असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. पचनाकरिता उच्च चयापचयाची गरज असते 

   तर ध्यान तुमच्या शरीराची चयापचयाची क्रिया मंद करते.

  • जर तुम्ही नव्यानेच/प्रथमच शिकत असाल, तर शांत आणि स्वच्छ जागेत बसणे सुकर अथवा सोयीचे   होईल . एकदा तुम्ही ध्यानामध्ये कुशल झाले कि मग तुम्ही कुठेही ध्यान करू शकता.
  • जर ध्यानादरम्यान तुम्हाला विचार येत असतील , त्यांचे फक्त निरीक्षण करा. त्यांना विरोध करू नका.

ध्यान हे बीजाप्रमाणे आहे; जेव्हा तुम्ही बीजाची जोपासना प्रेमाने करता , ते जास्त बहरते.

५ फायदे विद्यार्थ्यांसाठी

  • चांगला आत्मविश्वास
  • जास्त केंद्रितता आणि स्पष्टता 
  • चांगले आरोग्य
  • जास्त मानसिक शक्ति आणि ऊर्जा 
  • भरपूर गतिशीलता 

सर्वच क्षेत्रातील व्यग्र व्यक्ती विश्रामकरिता कृतज्ञ आहेत आणि दररोज आनंद घेत आहेत उत्साहवर्धक काही मिनिटांच्या ध्यानाचा स्वतःच्या गहनतेत जा आणि तुमचे आयुष्य समृद्ध संपन्न करा.

ध्यानाविषयी आणि इतर उपचार पद्धतींविषयी  तुम्ही  तुमच्या जवळच्या द आर्ट ऑफ लिविंग हॅप्पीनेस कार्यक्रमात  अधिक शिकू शकता