ध्यान या शब्दाचे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे अर्थ आहेत. कुणासाठी ध्यान म्हणजे एकाग्रता, तर कुणासाठी ध्यान म्हणजे चिंतन आणि मनन.
गुरुदेव श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, यांच्या म्हणण्यानुसार, ध्यान म्हणजे "कशावरही लक्ष केंद्रीत न करणे", आणि याचा नियमित सराव अत्युच्च योगिक अवस्था, समाधिकडे घेऊन जातो. खूप जणांना ध्यान कसे करावे हे शिकण्याची इच्छा असली तरी, सहज आणि आनंददायक शैली शोधण्यासाठी वेळ लागू शकतो.
मार्गदर्शक ध्यान का करावे?
नव्याने सुरुवात करणारे किंवा ज्यांची शिक्षक वा गुरूंच्या सूचनांप्रमाणे ध्यान करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शक ध्यान हा स्वतंत्र सरावासाठीचा योग्य पर्याय आहे. खरं तर, जेंव्हा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यान केलं जातं, तेंव्हा ते संपूर्ण सहज होतं.
दैनंदिन जीवनात, आपण आपलं शरीर व भौतिक जग यातच रमलेले असतो. मार्गदर्शक ध्यान आपल्याला शारीरिक पातळीवरून आत्मिक पातळीवर नेते, ज्याने आपला आध्यात्मिक प्रवास जलद आणि सहज होतो. नियमित ध्यान केल्याने, फक्त साधकाचे आयुष्यच नाही तर, साधकाच्या आजूबाजूचे वातावरण पण बदलते.
मार्गदर्शक ध्यानांची ऑनलाइन उपलब्धता
जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीत आणि मनाच्या अवस्थेनुसार, गुरु देव श्री श्री रविशंकर यांची, अनेक मार्गदर्शक ध्याने उपलब्ध आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंगची आॅनलाईन उपलब्ध असलेली काही मार्गदर्शक ध्याने
विश्रांतीसाठी श्र्वास
भावनांमधील बदल
पंचकोश ध्यान
योग निद्रा
तृप्तता ध्यान
औरा ध्यान
स्वतःकडे प्रवास
आॅनलाईन मार्गदर्शक ध्यानातील वरील ध्याने करून बघा आणि ध्यान कसे करावे हे शिकण्याचा आनंद अनुभवा!