सहजतेने स्वतःमध्ये जा : ध्यानाच्या मदतीने शोकाचा सामना / स्वीकृती

आयुष्य आणि प्रेम एकमेकांशी निसर्गतःच जोडलेले आहेत किंवा अंतर्भूत आहेत.ज्यावेळी आपण जन्म घेतो त्यावेळेपासून,आपण बंधनात बांधले जातो - परिवार, वस्तू, अनुभव आणि नातेसंबंध. वास्तविकतेची प्रकर्षाने जाणीव तेंव्हा होते जेव्हा आपण ज्याच्यावर प्रेम करतो अशा व्यक्तीला आपण गमावतो. शोक नैसर्गिकच आहे आणि काही वेळ, दुसरा काही उपायच नाही कि ज्याने तुम्ही त्याला दुर्लक्षित करू शकाल.                                                    

प्रत्येकाची शोक व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असते. त्याच बरोबर, तुम्ही भावनांच्या आहारी न जाणे  हे पण महत्वाचे आहे. जीवनातील काही सरल सत्य तुम्हाला यातून पुढे जाण्यासाठी मदत करतात. या काळात, रोज काही मिनिटे बसून मौन राहण्यास सूचित  मानले जाते .ध्यान आपली सोडून देण्याची क्षमता वाढविते, आणि शोकातून बाहेर पडण्यातही खात्रीपूर्वक मदत करते. ध्यान विचलित मनाला स्थिर ठेवते आणि शांतता देते.

शोकाची साधारणतः आढळणारी लक्षणे:

 
  • थकवा आणि तंद्रा
  • अस्वस्थता
  • वेदना /क्लेश  आणि दुःखाची भावना
  • भीतीचा हल्ला
  • श्वसनाला त्रास होणे
  • भूक न लागणे

वेळ हाच यासगळ्यावर उपाय आहे. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता अशी व्यक्ती गेली, कि तुम्हाला शोकाचा अनुभव येतो. पण हे तुम्ही विशाल दृष्टीने पहा -एक न एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचेच आहे. कोणीतरी आधी निघून गेले आहे, आणि आपण नंतर जाणार आहोत . जेंव्हा तुम्ही सगळ्यागोष्टींची अस्थिरता / क्षणिकता  पाहता, तेव्हा  तुम्हाला शोकातून बाहेर येण्याची ताकत मिळते. पुन्हा पुन्हा तुमचे लक्ष सर्व गोष्टींच्या अस्थिरतेकडे / क्षणिकतेकडे असू द्या.

-गुरुदेव श्री श्री रविशंकर

शोकातून बाहेर पाडण्यासाठी  चार उपाय

१. तुम्ही खंबीर / सामर्थ्यवान आहात हे समजा

तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे हे ज्ञात असू द्या. समस्या आली आहे , शोक आला  आहे. तुम्ही त्यात काहीही करू शकत नाही. ध्यान तुम्हाला तुमचे ते प्रेमळ क्षण हृदयात जतन करणे शक्य करवून देते जे तुम्ही तुमच्या लाडक्या व्यक्ती बरोबर अनुभवले आहेत, ते तुम्हाला अत्यंत हलके आणि आनंदी करते.

२. आयुष्याच्या सत्यावर लक्ष केंद्रित करा

सगळ्यांना एक दिवस मरायचेच आहे हे जाणून / समजून घ्या. इथले  सर्वजण भूमीमध्ये / मातीमध्ये जाणार आहेत. हे पुढील १०० वर्षात घडेल. कोणीतरी लवकर निघून गेले आहे. आपण जेंव्हा सकाळी उठू,  एका क्षणासाठी असे वाटेल सगळे ठीक आहे , पण क्षणार्धातच वास्तव समोर असेल आणि मन पुन्हा एकदा त्या सर्व गोष्टींमुळे विचलित होईल. रोज तुम्ही जे उपक्रम करता ते करा- व्यायाम, वाचन,मित्र मैत्रिणीं बरोबर वेळ घालवणे ,ध्यान. स्वतःला नीट सांभाळायला शिका.  ते सगळे  करा ज्यामुळे  हळूहळू तुम्हाला यातून बाहेर पडत येईल ,सहाजिकच तुमची अनुकूलता  सांभाळून.

३. परिवाराशी आणि जगाशी जास्त जोडलेले रहा

तुमच्यापेक्षा जास्त अडचणी / समस्या ज्यांना आहेत त्यांच्याकडे बघा. जेव्हा तुम्ही अशा लोकांकडे बघता ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त समस्या /अडचणी आहेत आणि त्यांची सेवा करता ,तेव्हा आपल्या समस्या नाहीशा होतात.जरी शोक नैसर्गिक असेल, तरी त्याचा सामना करणे खरेच सोपे नाही. जर तुम्ही तुमचे विचार तुमच्या परिवाराला आणि मित्र मैत्रिणींना सांगितले  तर त्याचीही तुम्हाला मदत होईल.यावेळेत, परिवारातील सदस्य तुम्हाला आधार देण्यासाठी तत्पर असतील.

४. ध्यान शोक आणि नुकसान/गमावणे यासाठी 

अगदी साहजिक आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे ज्यांना आपण गमावले आहे. ध्यानामुळे  मौल्यवान आंतरिक संबंध जोपासता आणि जतनही करता येतात.रोज स्वतःसाठी २० मिनिटे काढा, डोळे बंद करा. याकाळातील म्हणजे  प्रिय व्यक्ती गेल्याच्या किंवा गमावलेल्या काळातील ध्यान  मनाला शांत करते विचारांना स्थिरता देते . श्वासावर लक्ष ठेवा आणि जास्तीत जास्त विश्राम करा. दिव्यता तुमच्या बरोबर आहे हे लक्षात असू द्या. तुमच्या समस्या दिव्यतेला समर्पित करा आणि विश्राम करा. आपल्यामध्ये आत्मविश्वास हवा.आपण स्थिर/शांत असू  तर आपण शांतता पसरवू शकतो. जर आपण आनंदी असू ,तर आपण आनंद प्रसारित आणि उत्सर्जित करू.

पण मनाची अवस्था आणि आणि तुमच्या भाव भावना यांच्याविषयी जागरूक रहा. विचारांना येऊ द्या , आतून शांत आणि सौहार्द भावना असू द्या. त्या क्षणात रहा आणि ध्यानाच्या त्या स्थितीचा आनंद घ्या. आर्ट ऑफ लिविंगच्या सहज समाधी ध्यान कार्यक्रमात तुम्ही याबद्दल आणखी शिकू शकता.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संभाषणांवरून प्रेरित

डॉ. सीमा थानेदर, आणि डॉ. शिल्पा सभ्रवाल, शिक्षक, आर्ट ऑफ लिविंग यांच्या सौजन्याने