तेनाली रामकृष्णन, ज्यांना आपण आदराने तेनाली रमण म्हणून ओळखतो, मुळचे तेनालीचे रहिवासी. तेनाली १६ व्या शतकामध्ये भारतातील विजयनगर साम्राज्यामध्ये राजकवी होते. अत्यंत बुद्धिमान आणि हजरजबाबी म्हणून ते आजही प्रसिध्द आहेत.
आपणांस आयुष्यात काय हवे याची लांबलचक यादी तयार आहे-अगदी गणितात १००% मार्क्स मिळण्यापासून ते मुलीचे लग्न होण्यापर्यंत ...या सर्वांचे अंतिम ध्येय असते 'आनंदप्राप्ती'.आनंदप्राप्तीच्या शोधामध्येच जीवन व्यतित करण्यापेक्षा ते आनंदी कसे करू शकतो ...
#१: आनंदी व्हा 'आत्ता'
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रमणचा मित्र मस्तपणे झोपाळ्यावर पहूडला होता.
तेनाली : मित्रा कसला विचार करतोस?
मित्र: : मी खरोखरच आनंदी कधी असेन याचा विचार करतोय.
तेनाली : आणि तो दिवस कधी उगवणार आहे?
मित्र : जेव्हा सागर किनारी बंगला असेल, गाडी असेल, चार चार मुले असतील, त्यांना चांगले शिकवून छानशी नोकरी मिळून भरपूर पैसे मिळवतील..आणि ...
तेनाली (मध्येच) : मला कल्पना आली परंतु त्यानंतर काय?
मित्र : मगच मस्तपैकी पायावर पाय टाकून हवा खात आराम करीन ना..
तेनाली : परंतु माझ्या मित्रा, तू आत्ता पण कोणत्याही कष्टाशिवाय तेच करतो आहेस ना.
पाहिलंत , आपण आपला आनंद कसा पुढे पुढे ढकलतोय. शाळकरी मुलाला वाटते की एकदा शिक्षण पूर्ण झाले की मी आनंदी होईन , मग कॉलेज, मग नोकरी..... भली मोठी यादीच-कोणतीही इच्छा पूर्ण होताना तिच्यामुळे क्षणभंगूर आनंद मिळतोच, परंतु अजाणतेपणी आपण आनंद शोधणे सुरूच ठेवतो. मनाजोगा जीवनसाथी मिळाल्यावर, बढती मिळाल्यावर मी आनंदी होईन.......आणि ही यादी वाढतच जाते ..
आनंद भविष्यकाळात नाही आहे. विचार करा नां- तुम्ही काल आनंदी होऊ शकता का? उद्या होऊ शकता का? आनंदी होण्याच्या योजना बनवू शकता परंतु आनंदी आत्ताच होऊ शकता ..होय ना. आनंद शोधण्यासाठी एकामागून एक गोष्टी करत राहण्यापेक्षा आनंदी राहून सगळ्या गोष्टी कश्या करू शकतो?
' ध्यान - एकमेव मार्ग ', आनंद वर्तमान क्षणात आहे आणि तोच तुम्हाला प्रत्येक क्षणी आनंदी रहाण्यास समर्थ बनवतो आणि ध्यान तुमच्या मनाला वर्तमान क्षणात आणते.
#२: जे आहे त्यात संतुष्ट रहा
तळतळीत दुपारी तेनालीने एका व्यक्तीला त्याच्या डोक्यावर सूर्यापासून आडोसा करताना पाहून उत्सुकतेने विचारले,
तेनाली : मित्रा तू हे काय करतो आहेस?
मित्र : सूर्य खूपच तळपतोय, त्याला लपवण्याचा प्रयत्न करतोय .
तेनाली : त्यासाठी इतका का त्रास करून घेत आहेस. एक सोपी युक्ती आहे. असे म्हणत वाळू उचलून त्याच्या डोळ्यांत फुंकली.
इच्छापूर्तीमुळे आनंदप्राप्ती होईल, या भ्रमात तुम्ही त्यांच्या मागे धावता, त्यामुळे आपणाकडे 'जे आहे' त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही. या इच्छा डोळ्यातील वाळूच्या कणाप्रमाणे आहेत, ज्यांच्यामुळे आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तुमधील सौंदर्य पाहू शकत नाही .
ध्यान आपल्याला या उतावळेपणापासून मुक्त करते. आपणांस आंतरिक स्वातंत्र्य आणि संतुष्टी, समाधान देते.
#३: ध्यानाद्वारे निरिक्षण, आकलन शक्ती आणि अभिव्यक्ती सुधारा.
तेनाली राम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते.
पत्नी: मला घराला गुलाबी रंग हवा आहे.
तेनाली: नको त्यापेक्षा पांढरा सफेद देऊया.
पत्नी : नाही, मी ठरवलं आहे, निव्वळ गुलाबी रंगामुळेच मी आनंदी होऊ शकते .
तेनालीने पत्नीला दोन गुलाबी गॉगल आणून दिले आणि म्हणाला, तुझ्या मतानुसार होऊ दे. या गॉगलच्या वापरण्याने या भिंतीच काय मी देखील गुलाबी दिसेन.
तेनाली रमणच्या सांगण्याप्रमाणे गॉगलमुळे घर गुलाबी होणार नव्हते.
ताण तणावामुळे आपल्या वस्तुस्थितीची समज विपरीत होते. त्यामुळे आपण वस्तुस्थिती जशी आहे तशी समजू शकत नाही. त्यामुळे गैरसमज आणखी वाढून परत ताण तणाव वाढतात. या दुष्ट-चक्रातून कसे मुक्त व्हावे?
'ध्यान' आपणांस ती स्पष्टता प्राप्त करून देते, जिच्यामुळे आपण वस्तूस्थिती जशी आहे तशीच जाणू शकतो . निरिक्षण, आकलनशक्ती आणि अभिव्यक्ती या तिन्हीच्या क्षमता ध्यानाद्वारे वाढतात.
कमीतकमी गैरसमज आणि विसंगती मुळे आनंदी रहाणे आणखी सुलभ होते.
#४: काहीही करा पण 'मन' सांभाळा :
तेनाली रमण सपत्नीक मित्राच्या विवाहास जात होते. पत्नी महागडी साडी आणि दागिन्याने लखलखलेली होती .
अचानक पाठीमागून बेकाबू बैलगाडी येताना पाहून बचावासाठी तेनालीने पत्नीला मागे खेचले. या धांदलीत दोघेही तोल जाऊन खड्ड्यात पडले.
पत्नी नाराजीने म्हणाली : "बघा हे काय केलेत, माझी सगळी साडी खराब झाली. आत्ता या अवतारात मी लग्नाला येऊ शकत नाही."
तेनाली : बरे झाले, आत्ता आपण नवीन साडी खरेदी करू शकतो. ( हसून मनातल्या मनात मात्र पत्नी ठीक असल्याबध्दल देवाचे आभार मानले.)
तुमच्या वर अशी वेळ आली आहे का, की काही चांगले करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा शेवट वाईट झाला आहे . अशावेळी तुम्हाला वाईट तर वाटतेच पण तुम्ही स्वतःला दोष ही देता. हे ध्यानात येते का? हे घडते, निव्वळ आपला हेतू चांगला होता याची सजगता नसल्यामुळे. क्रिया योग्य नसली तरी हेतू चांगला होता नां. ध्यानाद्वारे क्रियामधील दोष स्विकारून हेतू बाबतची सजगता वाढते. यामुळेच काहीही होऊ दे, आपले मन गडबडीपासून बचावते आणि आपण आनंदी राहू शकतो.
श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञानचर्चेमधून प्रेरीत.
सहज समाधी ध्यान तज्ञ भारती हरीश यांच्या सहकार्याने. लेखिका दिव्या सचदेव.