आपले जीवन 'प्राण' नावाच्या सूक्ष्म जीवनशक्तीमुळे चालते. ही प्राणशक्ती आपल्या शरीरातील नाड्यांमधून आणि ऊर्जा केंद्रांमधून वाहत असते. आपल्या मध्ये हजारो नाड्या व चक्रे आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा साठलेली आहे. मणक्याच्या पायथ्याजवळ साठवलेल्या ह्या गुप्त ऊर्जेला कुंडलिनी म्हणतात. ऊर्जेचा प्रवाह जो ह्या उर्जा केंद्रापासून वर जातो ते इतर चक्रांच्या आणि नाडीच्या स्थितिवर अवलंबून असते. हरी ओम ध्यान हे आपल्याला ही चक्रे सक्रिय करण्यास मदत करते.
'हरि' म्हणजे “निवारण करणारा”. जेव्हा एखादा 'त्याचे' नाव पुन्हा पुन्हा घेतो, तेव्हा पाप, वाईट कर्म आणि वाईट फलज्योतिषाचा प्रभाव हळू हळू नष्ट होतो / पुसून जातो. वेदना आणि दु:ख / भोग मिटतात. 'ओम' हे आदिकाळापासुन अस्तित्वात असलेले वैश्विक स्पंदन आहे ज्याच्यामुळे संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. सर्वात प्रसिध्द मंत्र 'हरि ओम' आहे. त्याचा मूलभूत अर्थ - हरि हाच ओम आहे. 'हरि ओम' हा वैश्विक मंत्र आहे जो दु:ख / भोग मिटवतो. ह्या मंत्रामध्येच वैश्विक स्पंदन सामावलेले आहे. हरि ओम ध्यान केल्याने प्राणशक्ती एका ऊर्जा चक्रातून दुसऱ्या ऊर्जा चक्रात प्रवेश करतो.
मणक्यापासून डोक्यापर्यंत एकूण सात ऊर्जा केंद्रे किंवा चक्रे आहेत. प्राणशक्ती ह्या चक्रांच्या माध्यमातून शरीरात वरच्या दिशेला प्रवास करते. प्रत्येक चक्रामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. उदाहरणार्थ, मूलाधार चक्र, ह्याचे ऊर्जा केंद्र मणक्याच्या पायथ्या जवळ आहे, जिथे सुस्ति आणि उत्साह हे दोन्ही उपस्थित असतात. सर्व चक्रांबद्दल आणि हरि ओम ध्यानाची संपूर्ण माहिती मिळवून घेण्यासाठी अॅडव्हान्स ध्यानधारणा शिबिर (भाग - २) आणि आर्ट ऑफ लिव्हिंग योगा शिबिर करा. श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन केलेले 'हरि ओम ध्यान' हे सीडी आणि कॅसेट मध्ये उपलब्ध आहे.
ध्यान करे | Meditate now
Gurudev says that one should read little bit of knowledge everyday. After meditation, it's best time to read some articles related to knowledge/wisdom. Here are few ones which you can ponder over
वैराग्य |Dispassion in Marathi
शांत मन | A calm mind in Marathi
अवतार हा दिव्यत्वाचा भाग आहे | Avtaar is a part of divinity in Marathi