राजेश कुंडू ०७७६२८२७१०९
रांची, झारखंड : रांची मधील आर्ट ऑफ लिव्हिंगने १७ ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी’ निमित्त ८४ गरीब मुलांना शैक्षणिक साहित्यांची ‘भेट’ देऊन त्यांना चकित केले. जागरनाथपूर मधील बिरसा निकेतन हायस्कूल मधील या विद्यार्थ्यांनी या भेटीमुळे दिवाळी साजरी केली. या शैक्षणिक साहीत्य संचामध्ये पेन, पेन्सिल, खडू, पाटी, वही, फोल्डर, कटर आणि इतर आवश्यक साहित्य होते. या कार्यक्रमाचे समन्वयक श्री सौरव अग्रवाल म्हणाले की, “या विद्यार्थ्यांसोबत व्यतीत केलेल्या वेळेमुळे आम्हाला त्यांच्याप्रति आणखी प्रेम निर्माण होणेस मदत झाली.”
एकूणच, या कार्यक्रमामुळे त्यांना खूप छान वाटले. याशिवाय स्वामी ओंकारानंद यांनी आपल्या ज्ञानचर्चेमधून या मुलांना त्यांच्या प्रगतीसाठी चिकाटीने प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले. साधक श्रीमती. सबिता सिंह, सुनीता सिंह, उत्तम कुमार, नूतन सिन्हा, राशी आणि बिना हे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.