कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळणे हा आरोग्याकरिता सोनेरी नियम आहे. जे काही करायचे ते मध्यम मार्गाने मग ते खेळाच्या बाबतीत असो, जेवणाच्या बाबतीत असो किंवा उपवासाच्या बाबतीत असो.
आठवड्यातील ठराविक दिवशी किंवा महिन्यातील काही ठराविक दिवसांकरिता तुम्ही उपवास करू शकता. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासाचे नियोजन तुम्ही खालीलप्रमाणे करु शकता.
नवरात्रि - दिवस १–३
फलाहार करावा. तुम्ही सफरचंद, केळी, चिकू, पपई, कलिंगड आणि गोड द्राक्षे यासारखी गोड फळे खाऊ शकता. आणि तुम्ही आवळ्याचा रस, दुधीभोपळ्याचा रस आणि शहाळे याचे सुद्धा सेवन करू शकता.
नवरात्रि - दिवस ४-६
पुढचे तीन दिवस तुम्ही फळांचे रस, ताक आणि दुध हे दिवसभर घेऊ शकता आणि दिवसातून एकदा खाली दिल्याप्रमाणे एक वेळेस जेवू शकता.
नवरात्रि - दिवस ७-९
शेवटचे तीन दिवस तुम्ही नवरात्रीचा पारंपारिक आहार घेऊ शकता. जर तुम्हाला काही आरोग्याची तक्रार आहे तर उपवास सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहिल आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आरामदायी असेल तेवढेच करा.
नवरात्रीचा पारंपारिक आहार | Traditional Navratri Diet
नवरात्रीचा पारंपारिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो. तोखाली दिलेल्या घटकांचा संयोग आहे:
- शिंगाड्याच्या पिठाची पोळी. वरीचे तांदूळ, वरीच्या तांदळापासून बनवलेले घावन, साबुदाण्याचे पदार्थ, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा, सुरण, अरबी, उकडलेले रताळे इत्यादी.
- साजूक तूप, दुध आणि ताक. हे आपल्या शरीराला शीतलता देऊ करतात.
- दुधीभोपळा आणि लालभोपळा दह्यात कालवून.
- भरपूर द्रव्य पदार्थ – शहाळे, रस, भाज्यांचे सूप इत्यादी. हे उर्जा तर प्रदान करतातच शिवाय शरीराचे निर्जलीकरण होऊ देत नाही आणि उपवासा दरम्यान शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात.
- पपई, नाशपती आणि सफरचंद यांपासून बनविलेले फळांचे सॅलड.
जेव्हा पारंपारिक नवरात्रीचा आहार घेतल्या जातो तेव्हा खालील गोष्टी पाळणे चांगले असते (Navratri fasting rules in Marathi)
- स्वयंपाकात नेहमीचे साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदेलोण वापरावे.
- भाजणे, उकडणे, वाफवणे आणि विस्तवावर शेकणे यासारख्या आरोग्यकारक शिजवण्याच्या पद्धतींचा वापर करावा.
- काटेकोरपणे शाकाहारी राहा.
- पहिले काही दिवस धान्य टाळावे.
- तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज्य करावे.
- कांदा आणि लसूण टाळा.
- अति प्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळा.
जे उपवास करू शकत नाहीत त्यांनी मांसाहार, मदिरा, कांदा, लसूण आणि मसाले यांच्यापासून दूर रहावे आणि स्वयंपाकात साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदेलोण वापरावे.
नवरात्री मध्ये उपवास सोडताना |How to break your fast during Navratri
जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री उपवास सोडता तेव्हा हलका आहार घ्यावा ज्याने तुमच्या शरीरावर ताण पडणार नाही. रात्रीच्या वेळी जड आणि तळलेले जेवण जेवल्याने प्रणालीला ते पचवण्यास अवघड तर होतेच शिवाय जी विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया आहे आणि उपवासाचे जे सकारात्मक फायदे आहेत त्याकरिता अपथ्यकारक ठरते. सहज पचतील असे अन्नपदार्थ थोड्या प्रमाणात खावेत.
उपावासामध्ये योग आणि ध्यान
शरीर ताणणे, शरीरास पीळ देणे आणि वाकणे यासारखी सोपी योगासने केल्याने उपवास करण्याच्या प्रक्रियेत मदत होते. त्यामुळे विषारी द्रव्ये बाहेर टाकणे जलदगतीने होते आणि तुम्हाला उत्साह आणि उर्जेचा संचार जाणवतो.
आपला अभिप्राय येथे कळवा: webteam.india@artofliving.org