मंत्र हे असे प्राचीन नाद आहेत जे सकारात्मक स्पंदनांनी भारलेले असतात. जेंव्हा मंत्रांचे उच्चारण केले जाते तेंव्हा नादाची अशी कंपने निर्माण होतात जी ऐकणाऱ्यास आणि वातावरणासाठी अतिशय लाभदायक ठरतात.
ते याप्रमाणे :
- मंत्रोच्चारामुळे तुमच्या आंत सकारात्मक ऊर्जेचा उदय होतो.
- मनाची शक्ती एकत्रित होऊन तिला बळ प्राप्त व्हायला मदत लाभते.
- मंत्रांमुळे तुमच्या शरीराभोवती कवच निर्माण होते. (म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात).
- नकारात्मक आणि हानिकारक कंपने अधिक सकारात्मक कंपनात परिवर्तित केली जातात.
- वातावरण आणि परिसरात सुसंवाद साधला जातो.
काय, विश्वास वाटत नाही? स्वतःच प्रत्यय घेऊन बघा.
जेंव्हा कोणी तुम्हाला शिवीगाळ केली होती तो प्रसंग आठवा. तेंव्हा तुम्हाला कसे वाटले? त्याने तुमच्या वर नेमका काय परिणाम झाला?
तुम्हाला ते नक्कीच आवडले नसेल. तुम्ही विचलित झाला होतात. शाब्दिक शिवीगाळ नकारात्मक कंपने तयार करते, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला राग येतो, तो दुखावला जातो, त्याला चीड येते. शरीर आणि मनाचा एकमेकांशी संबंध असल्याने त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम होऊ लागतो. मग ते पोटात गोळा येणे ते डोके तडतडणे असे काहीही असू शकते.
एखादे वेळी तुम्ही अशा लोकांना भेटता आणि तुम्हाला त्यांच्या सोबत बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक स्पंदने मिळत असतात. कधी तुम्ही अशा लोकांना भेटता आणि तुम्ही त्यांना टाळू पाहता. याचे कारण तुम्हाला माहित आहे काय? त्यांच्या भोवतीच्या नकारात्मक स्पंदनांमुळे असे प्रतिकर्षण तयार होते. अशा भोवतालच्या नकारात्मक आणि नावडत्या स्पंदनांना मंत्र शक्तीने अधिक सकारात्मक आणि मोहक स्पंदनांमध्ये बदलता येते. मंत्रांच्या उच्चारणाचा हा एक लाभ आहे.
ह्या नवरात्रीत काहीतरी वेगळं करूया
नवरात्रीच्या प्राचीन मंत्रांना ऐका आणि आपला दिवस कसा जातोय याकडे लक्ष द्या. असे बरेच मंत्रोच्चार आहेत जे तुम्ही रोज श्रवण करू शकता, जसे ललिता सहस्त्रनाम, देवी कवचम आणि अर्गळा स्तोत्र.
याच्या सोबतीला नवरात्रीच्या यज्ञामधील मंत्रोच्चारावर ध्यान करा. तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रावर तुम्ही या पूजामध्ये सहभागी होऊ शकता. जर ते शक्य नसेल तर हजारो लोक वेबकास्टवर थेट प्रक्षेपणाद्वारे यज्ञात सहभाग घेत आहेत, त्यांच्या सोबत सामील व्हा.
नवरात्री संबंधित अन्य लेख
- चंडी होम | Chandi Homa
- नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
- नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
- नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
- नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
- आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
- नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
- २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
- ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
- देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
- आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi