नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवरात्रीची पार्श्वभूमी काय आहे?

नवरात्रीच्या पूजांच्या तयारींची यथार्थ तपशीलवार माहिती देऊ शकाल कां?

पूजा मंडपात सर्वकाही एकदम अचूक वेळेवर घडताना आढळते. तर मग नवरात्रीमध्ये वक्तशीरपणाचे काय महत्त्व आहे?

होमांच्या दरम्यान देवी ऊर्जा कशी प्रकट होते?

सर्वकाही अतिशय अचूकतेने, खात्रीशीरपणे घडून येण्यासाठी पाठशाळेतील वेदाच्या विद्यार्थांना प्रशिक्षण कसे दिले जाते?


आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवरात्रीची पार्श्वभूमी काय आहे?

दोन नवरात्री साजऱ्या केल्या जातात. एप्रिल महिन्यात येणारी चैत्र नवरात्र जिला ‘वसंत नवरात्र’ म्हणतात, जी प्रामुख्याने उत्तर भारतात साजरी केली जाते. आणि दक्षिण भारतात साजरी होणारी ‘शरद नवरात्र’ जी अश्विन म्हणजेच सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्यात येते.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने आर्ट ऑफ लिविंगमध्ये समस्त चराचराचे कल्याण, शांती आणि समृद्धीसाठी शरद नवरात्र साजरी केली जाते.

प्रत्येकाला

  • इच्छाशक्ती: प्रबळ इच्छाशक्ती
  • क्रिया शक्ती: योग्य कृती करण्याची शक्ती
  • ज्ञान शक्ती: योग्य कृती करण्याचे ज्ञान,

यांच्या प्राप्तीच्या कृपाशिर्वादासाठी हि साजरी केली जाते.


नवरात्रीच्या पूजांच्या तयारींची यथार्थ तपशीलवार माहिती देऊ शकाल कां?

नवरात्रीच्या शेवटचे पाच दिवस म्हणजे षष्टी तिथीपासून अर्थात सहाव्या दिवसापासून पूजा आणि होम आयोजित केले जातात.

नवरात्रीमध्ये केले जाणारे ६ होम कोणते हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पूजांच्या तयारीसाठी खालील पूर्वतयारी केली जाते

  • सर्वप्रथम आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे योग्य आणि योग्य प्रमाणात साहित्य जमा करणे : द्रव्य संग्रहण आणि द्रव्य प्रमाण. हे साहित्य प्रामुख्याने केरळ, हिमाचल प्रदेश आणि जम्मू या राज्यातून गोळा केले जाते.
  • दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे यज्ञशाळा लक्षण नुसार यज्ञशाळेची निर्मिती आणि तयारी करणे. या प्रक्रियेला म्हणतात - ‘यज्ञशाळा निर्माण’ आणि ‘मंडल लेपन’. ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या आकृत्या निर्माण केल्या जातात. गणेश मंडल, वास्तू मंडल, नवग्रह मंडल आणि सुदर्शन मंडल ही काही मंडले आहेत. पंचमहाभूतांची म्हणजे पाच तत्त्वांची पूजा केली जाते. कलशातून जल तत्त्वाची, हवनकुंडातून अग्नी तत्त्वाची, मंत्र घोषातून वायू तत्त्वाची, मंडलांतून पृथ्वी तत्त्वाची पूजा केली जाते. या सर्व पूजा अवकाश तत्त्वामध्ये घडतात.
  • चंडीहोमाचा मुख्य कलश ठेवण्यासाठी व्यासपीठ
  • पंचासन वेदिका निर्माण केली जातो ज्याचा आकार
  • कूर्मासन (कूर्म म्हणजे कासव, जे स्थैर्याचे प्रतिक आहे) सारखा असतो. त्याच्यावर
  • अनंतासन (सर्प, जो स्ज्ग्तेचे, जागरूकतेचे प्रतिक आहे) असते. त्यावर
  • सिंहासन (सिंह हा वीर्य, सामर्थ्य दर्शवितो). त्यावर
  • योगासन (आठ सिद्धांचे पुतळे जे अष्टांग योगाचे प्रतिक आहे.) त्यावर
  • पद्मासन (कमळ, जे साक्षात्कारी अवस्थेचे, संपूर्ण उमललेल्या चेतनेचे दार्शनिक आहे.) यावर
  • कलश स्थापना म्हणजे पाण्याने भरलेले कलश, ज्यामध्ये देवीच्या दिव्य ऊर्जेला आवाहन दिले जाते, ते ठेवले जातात.
  • कलशांची तयारी केली जाते. त्यांच्यावर सुंदर आणि रंगीबेरंगी धागे गुंडाळले जातात. आणि त्यात पवित्र नद्यांचे पाणी आणि औषधी वनस्पती भरले जातात. सर्वात वरच्या कलशामध्ये आंब्याची पाने आणि नारळ ठेवतात आणि त्याला चंदनाचे गंध, कुंकू, दर्भ आणि विशिष्ठ सुगंधित फुलांनी सजविले जाते.
  • यज्ञ सुरु करण्याआधी वास्तूपूजा केली जाते. यामध्ये पृथ्वीची पूजा करतात आणि अंकुर अर्पणम केले जाते. अंकुर अर्पणम म्हणजे नऊ प्रकारच्या धान्यांची यज्ञशाळेच्या चहुबाजूने सर्वत्र पेरणी करतात. अन्न धान्ये आणि शेतकरी यांच्या सन्मानार्थ हे केले जाते. जमिनीची सुपीकता वृद्धिगत व्हावी यासाठी या प्रार्थना केल्या जातात.
  • होमकुंडाची तयारी : यज्ञशाळेच्या पूर्व दिशेला होमकुंड बांधला जातो. आपल्या आश्रमात चंडी यज्ञ करण्याकरिता ‘पद्मकुंड’ हा एक विशिष्ठ प्रकारचा होम कुंड बांधला जातो. योनीकुंड हा दुसऱ्या प्रकारचा कुंड आहे. कोणत्या प्रकारचा कुंड उभारायचा हे आहुती देण्यासाठी उपलब्ध असलेल्या द्रव्यांवर (यज्ञाच्या पवित्र अग्नीत अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तूंवर) अवलंबून असते. चतुस्तंभ पूजा किंवा चार खांबांची पूजा (चार खांब म्हणजे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य) ही अंतर्भागात उभारली जाते. बाहेरील भागात षोडस स्तंभ म्हणजे १६ खांबांची पूजा उभारली जाते. १६ खांब म्हणजे मानवी जीवनाचे १६ भाग होय.
  • यज्ञशाळेच्या बाहेरील भागात अष्टध्वज म्हणजे आठ ध्वज आणि हत्तीचे चित्र असलेल्या आठ पताका लावल्या जातात. अष्टमंगल म्हणजे आठ उपकरणे – दर्पण (आरसा), पूर्णकुंभ (कळशी), वृषभ (बैलाचे चित्र), दोन चामरे (केसांचे पंखे), स्वस्तिक (स्वस्तिकाची आकृती), शंख आणि दीप (दिवा) यांची यज्ञशाळेत स्थापना करतात.
  • यज्ञशाळेच्या आंतमध्ये रांगोळी काढली जाते आणि संपूर्ण यज्ञशाळेला आंब्याची पाने, केळीचे बुंधे, ऊस बांधून पेटत्या दिव्यांनी सुशोभित केले जाते.
  • यज्ञशाळेच्या किनाऱ्यांनासुद्धा लगेच अंकुरित होणाऱ्या धान्यांची पेरणी करून सुशोभित करतात. मंत्रांना – औषधी मंत्रांना शोषून घेण्याची क्षमता या अंकुरांमध्ये असते. धान्ये उत्तमप्रकारे अंकुरित होण्यासाठी आणि निर्विघ्नपणे चंडीयज्ञ घडून येण्यासाठी प्रार्थना केली जाते.

चंडी होम बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


पूजा मंडपात सर्वकाही एकदम अचूक वेळेवर घडताना आढळते. तर मग नवरात्रीमध्ये वक्तशीरपणाचे काय महत्त्व आहे?

नवरात्रीच्या पूजा आणि विधी हे शैवागम व शक्ततंत्र आणि रुद्रयामलम, श्रद्धातिलकम, परशुराम कल्पसूत्रम, श्री विद्या तंत्रमंद मंत्र महर्णवाद आणि देवी महात्म्य या पवित्र ग्रंथांमध्ये विहित केल्यानुसार शास्त्रोक्त पध्दतीने केल्या जातात. या ग्रंथांमध्ये अनुष्ठान आणि पूजा करण्याची निश्चित विधी आणि निश्चित शुभ मुहूर्त निर्धारित केलेले आहेत. पारंगत पुरोहित ही मार्गदर्शक तत्त्वे तपशीलवार आणि अचूकतेने अंमलात आणतात. आमच्या गुरुकुलमधील विद्यार्थांना जेष्ठ पुरोहितांना सहाय्य करण्यासाठी उच्च प्रशिक्षण दिले जाते जेणे करून सर्व विधी अचूक वेळेवर पूर्ण व्हावेत.


होमांच्या दरम्यान देवी ऊर्जा कशी प्रकट होते?

कला, तत्त्व, भुवन, मंत्र, पद आणि वर्ण यांना ‘शडध्वास’ म्हणून ओळखले जाते आणि ते शरीरातील शडधारा यांच्याशी जोडलेले असतात.

सामुहिक साधना केल्याने ध्यान गहरे होण्याची क्षमता वाढते. घडून येणारे बदल केवळ आपल्या स्वतःमध्ये आणि स्वतःच्या शरीरापुरते मर्यादित न राहता आपल्या अवतीभवतीसुद्धा दिसून येतात.


सर्वकाही अतिशय अचूकतेने, खात्रीशीरपणे घडून येण्यासाठी पाठशाळेतील वेदाच्या विद्यार्थांना प्रशिक्षण कसे दिले जाते?

वेद आगम संस्कृत महा पाठशाळेचे विद्यार्थी योग, सुदर्शन क्रिया आणि ध्यान यांचा दैनंदिन सराव करतात. त्यामुळे ते शरीराने आणि मनाने सजग असतात आणि ते गुरुकुलाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियमांचे पालन करतात.

त्यांना मंत्र दीक्षासुद्धा दिली जाते. त्यामुळे चंडी होम करण्यासाठी ते सक्षम बनतात. त्यांना होमाच्या प्रत्येक टप्प्याचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे ते प्रत्यक्ष चंडी होमाच्या दिवशी अचूक वेळेचे काटेकोरपणे पालन करू शकतात. महा चंडी होमाच्या एक आठवडा आधी आगम पाठशाळा येथे विद्यार्थ्यांना चंडी होमाचे प्रायोगिक प्रशिक्षण दिले जाते. देवी महात्म्य पठणाचा जवळजवळ १२ आठवडे सराव केला जातो.


नवरात्र हा दरवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनँशनल सेंटरमध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे ज्याच्याकडे हजारो लोक आकर्षित होतात. या नऊ दिवसात प्राचीन वैदिक शास्त्रांनुसारच पूजा, होम केले जातात आणि त्यांची पूर्व तयारी देखील फार मोठ्या प्रमाणात सुरु असते.

या तयारीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनँशनल सेंटरच्या वेद आगम संस्कृत महापाठशाळेचे मुख्याध्यापक (प्रिन्सिपल) श्री. ए. एस. सुंदरमूर्ती शिवम, जे या सर्व पूजा आणि होम यांचे मुख्य पुरोहित असतात, यांची भूमिका यामध्ये फार मोठी असते.

त्यांच्या घराण्याला पौरोहित्याचा वारसा लाभला असून त्यांनी जगभरात १००५ कुंभाभिषेक आणि २१०० पेक्षा अधिक चंडी होम  केले असून १९९४ पासून आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनँशनल सेंटर येथे नवरात्रीचे होम आणि पूजा करत आले आहेत. वरील तपशीलवार उत्तरे त्यांनीच दिली आहेत.

नवरात्री संबंधित अन्य लेख

  1. चंडी होम | Chandi Homa
  2. नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
  3. नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
  4. नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
  5. नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
  6. आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
  7. नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
  8. २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
  9. ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
  10. देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
  11. आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

ज्ञानासंबंधी अधिक लेख वाचा | Read more on wisdom

योगाबद्दल अधिक वाचा | Read more about Yoga