चंडी होमामध्ये १००८ टप्पे आहेत कां?
चंडीहोम दोन प्रकारचा आहे
- लघु चंडी होम (होमाची छोटी आवृत्ती)
- महा चंडी होम (होमाची मोठी आवृत्ती)
लघु चंडी
लघु चंडी होमामध्ये देवीला आवाहन केले जाते आणि त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप केला जातो. हा होम झाल्यानंतर देवी पूजा केली जाते आणि ही पूजा केवळ एकदाच थोड्या तासांसाठी केली जाते.
महा चंडी होम
महा चंडी होम हा नऊ वेळा करतात. म्हणून त्याला ‘नव चंडी होम’ म्हणतात. १०० वेळा जेव्हा हा केला जातो तेव्हा त्याला ‘शत चंडी होम’ म्हणतात; जेव्हा १००० वेळा केला जातो तेव्हा त्याला ‘सहस्र चंडी होम’ म्हणतात; आणि जेव्हा १०,००० वेळा केला जातो तेव्हा त्याला ‘अयुत चंडी होम’ म्हणतात. या प्रत्येक यज्ञाच्या विधी वेगवेगळ्या आहेत आणि सर्वसामान्यपणे नव चंडी होम केला जातो. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनँशनल सेंटरमध्ये शत चंडी होम करतात.
होमाचे अनुष्ठान
- गुरु अनुग्रह म्हणजेच गुरूंचे मार्गदर्शन आणि गुरूंच्या आशीर्वादाने पुजेची सुरुवात होते.
- त्यानंतर देवता अनुग्रह म्हणजे देवतांची परवानगी घेतल्या जाते.
- विघ्नेश्वर पूजा (सर्व विघ्नांना दूर करणाऱ्या गणरायाला प्रार्थना) केल्यानंतर पूर्वांग पूजा केल्या जातात.
- गृह प्रीती - होम निर्विघ्नपणे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नऊ ग्रहांना प्रार्थना केली जाते. याला ‘ग्रह प्रीती’ म्हणतात. जर नक्षत्र, राशी किंवा लग्न या कशातही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी ही पूजा केली जाते ज्यामध्ये नवग्रहांचे आशीर्वाद मिळण्यासाठी नवग्रहांना आवाहन केले जाते.
- नाडी शोधन – ऋषी आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते.
- मधुपर्क पूजा – दुध, मध आणि तूप हे एकत्र करून एका विशिष्ठ मंत्राचे उच्चारण करून होम करणाऱ्या पुरोहितांना ते ग्रहण करण्यास दिले जाते जेणेकरून पूजा करताना त्यांच्या मनःस्थितीचे माधुर्य शेवटपर्यंत कायम रहावे.
- पुण्याहवाचन – ज्या ठिकाणी पूजा केली जात आहे त्या स्थळाचे शुद्धीकरण.
- पंचगव्य – गायीच्या पाच उत्पादनाद्वारे शरीराचे शुद्धीकरण
- वास्तूशांती – वास्तू आणि भूमी देवतांना प्रार्थना
- मृत संग्रहण – वाळू किंवा लाकडातून प्राण काढले जातात.
- अंकुरार्पण – नऊ प्रकारची धान्ये जी दुध आणि पाण्यात भिजवलेली असतात त्यांची पेरणी करणे.
- रक्षा बंधन – पुरोहिताच्या उजव्या हाताला पिवळा धागा बांधून पूजेचा संकल्प घेणे.
यज्ञ सुरु होण्याआधी हे विधी (पूर्वांग पूजा) केले जातात.
नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
यज्ञाची सुरुवात कशी होते
- दीप पूजा – मुख्य कलशाच्या दोन्ही बाजूला दोन प्रकारचे दिवे ठेवले जातात. डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा ‘दुर्गा दीप’ लावला जातो आणि उजव्या बाजूला तुपाचा ‘लक्ष्मी दीप’ लावला जातो.
षोडश मातृका पूजा – १६ मातृका देवींना आवाहन केले जाते. - आचार्य आणि ऋत्विक वर्णन – वेद, शास्त्र आणि आगम यांच्या विविध शाखांमध्ये पारंगत असलेल्या पुरोहितांची किंवा आचार्यांची नेमणूक केली जाते. ऋग, यजुर, साम आणि अथर्व या वेदांचे आणि इतिहास पुरण आणि शैवआगम यांचे पठण केले जाते.
- आचार्य अनुज्ञा – ज्येष्ठ पुरोहित जे संपूर्ण यज्ञाचे प्रमुख्य असतात त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. सर्वात वरिष्ठ पुरोहिताला ‘ब्रम्ह’ म्हणतात.
- ज्या दिवशी पूजा केली जात आहे, तो दिवस, वेळ आणि जिथे पूजा केली जात आहे ते स्थळ यांचे उच्चारण करून महासंकल्प घेतला जातो. होमाचे नाव आणि उद्देश्य यांचासुद्धा उल्लेख केला जातो; इथपासून पूजेला सुरुवात होते.
- चंडी महा यज्ञ मंडप पूजा – ५३ प्रकारच्या मुख्य पूजा केल्या जातात आणि दहा दिशांच्या देवांचे पूजन केले जाते.
- द्वार,तोरण, ध्वज, पताका, स्थापना – मंडपाला मंडपाच्या ठराविक दिशांना विशिष्ठ पाने बांधली जातात.
- आचार्य आसन पूजा – यज्ञासाठी नेमणूक केलेला मुख्य पुरोहित आता देवी पूजन सुरु करतो आणि नवाक्षरी मंत्राचा जप करतो.
- पद्यादी पात्र परी कल्पना – नैवेद्य तयार केले जातात.
- कुंभ स्थापना – पवित्र नद्यांचे पाणी ज्यात भरले आहे अशा मुख्य कलशांची स्थापना करणे.
- पुस्तक पूजा आणि देवीची पारायण पूजा, देवी महात्म्य असलेल्या देवी सप्तशतीच्या पठणाने केली जाते.
देवीचे आवाहन आणि केल्या जाणाऱ्या पूजा
- अग्नी कार्य – अग्नी मंथन म्हणजेच अरुणी लाकडांना घासून अग्नी पेटविला जातो. या अग्नीमध्ये देवीला आवाहन केले जाते आणि नंतर या अग्नीमध्ये आहुत्या अर्पण केल्या जातात. ज्या प्रकारचा होम असतो त्याप्रमाणे ठराविक आहुत्या – १०००, १००००, १००००० इत्यादी आहुत्या – अर्पण करण्यात येतात. सप्तशती ही १३ भागात विभागलेली आहे आणि प्रत्येक भागासाठी एक निश्चित देवी आहे आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या विशिष्ठ मंत्रांचे पठण करून आणि ठराविक आहुती त्यांना अर्पण करून या सर्व १३ देवींना आवाहन केले जाते. याचा परिणाम असा होतो की विशिष्ठ देवीच्या आशीर्वादाने विशिष्ठ प्रभाव प्राप्त होतो.
- ६४ योगिनी आणि ६४ भैरव पूजा – त्यांची उपासना.
- कादंबरी पूजा
- वादुका भैरव पूजा
- गौ पूजा (गायीची पूजा)
- गज पूजा (हत्तीची पूजा)
- अश्व पूजा (घोड्याची पूजा)
- कन्यका पूजा (लहान बालिकांची पूजा)
- सुहासिनी पूजा (सौभाग्यवती स्त्रियांची पूजा)
- दाम्पती पूजा (जोडप्यांची पूजा)
नवरात्रीमध्ये केले जाणारे ६ होम कोणते हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मंगल आरती नंतर होणाऱ्या आहुति
- सौभाग्य द्रव्य समर्पण – श्रीसूक्ताच्या मंत्राचे पठण करीत मुख्य होम कुंडामध्ये १०८ प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फळे अर्पण केली जातात.
- वासोधारा – आता चमक मंत्रांचे पठण केले जाते.
- महापूर्णाहुती – लाल साडी, तूप, सुक्या खोबऱ्यामध्ये मध, नवरत्नसोर म्हणजे नऊ मौल्यवान रत्ने, पंचलोह किंवा पाच प्रकारचे धातू यांचा शेवटचा नैवेद्य दाखवला जातो.
- संयोजन – पूजेचे परिणाम आणि कंपने मुख्य कलशामध्ये स्थानांतरीत केली जातात.
- रक्षाधारण – रक्षा किंवा राख होम कुंडातून घेऊन मुख्य कलशाला लावल्यानंतर पूजा केली जाते.
- कलश अभिषेक – मुख्य कलशातील पवित्र पाणी आता देवीच्या मूर्तीला अर्पण केले जाते.
- विशिष्ट प्रार्थना म्हटल्या जातात आणि समस्त पृथ्वीला आशीर्वाद दिले जातात आणि मग परम पूज्य गुरुदेव सर्व उपस्थित भाविकांवर कलशातील तीर्थ शिंपडतात.
- गुरुदेव मग प्रसाद वाटप करतात आणि सर्वांना आशीर्वाद देतात. चंडी होमामध्ये १००८ पेक्षा अधिक टप्पे आहेत.
नवरात्र हा दरवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनँशनल सेंटरमध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे ज्याच्याकडे हजारो लोक आकर्षित होतात. या नऊ दिवसात प्राचीन वैदिक शास्त्रांनुसारच पूजा, होम केले जातात आणि त्यांची पूर्व तयारी देखील फार मोठ्या प्रमाणात सुरु असते.
या तयारीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनँशनल सेंटरच्या वेद आगम संस्कृत महापाठशाळेचे मुख्याध्यापक (प्रिन्सिपल) श्री. ए. एस. सुंदरमूर्ती शिवम, जे या सर्व पूजा आणि होम यांचे मुख्य पुरोहित असतात, यांची भूमिका यामध्ये फार मोठी असते.
त्यांच्या घराण्याला पौरोहित्याचा वारसा लाभला असून त्यांनी जगभरात १००५ कुंभाभिषेक आणि २१०० पेक्षा अधिक चंडी होम केले असून १९९४ पासून आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनँशनल सेंटर येथे नवरात्रीचे होम आणि पूजा करत आले आहेत. वरील तपशीलवार उत्तरे त्यांनीच दिली आहेत.
नवरात्री संबंधित अन्य लेख
- चंडी होम | Chandi Homa
- नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
- नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
- नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
- नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
- आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
- नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
- २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
- ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
- देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
- आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi