आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Importance of Ayudh Puja

आयुध पूजा म्हणजे काय? | What is Ayudha Puja?

आयुध पूजेची गोष्ट आणि ऐतिहासिक संदर्भ | Story of Ayudh Puja

उपकरणांचा आदर आणि सत्कार | Reverence for equipment

एकच दिव्यत्व | One Divinity


आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Importance of Ayudh Puja

या विश्वामध्ये ‘काहीही महत्त्वपूर्ण नाही’ किंवा ‘सर्वकाही महत्त्वपूर्ण आहे’ अशी दोन्हीही विधाने आपण करू शकतो. ही दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत! कारण ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.

लहानमोठ्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हा जीवनाचा एक विलक्षण पैलू आहे. आणि म्हणूनच एक बारीकशी सुई तितकीच उपयुक्त आहे जितके एक भले मोठे विमान. एक सुईसुद्धा तितक्याच उपयोगाची आहे. सरतेशेवटी आपण घालतो ते कपडे शिवायला ती बारीकशी सुईच उपयुक्त ठरते. म्हणून साडी नेसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला एका सेफ्टी पिनचे महत्व विचारा !

म्हणजेच आपल्या जीवनात असणाऱ्या वस्तूंचा आकार नव्हे तर त्या वस्तूंची उपयुक्तता आणि अर्थ हे निर्णायक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या वस्तू, साधने आणि उपकरणे यांची कार्यक्षमता आणि गुण यांना आयुध पूजा मान्यता देऊ करते.


आयुध पूजा म्हणजे काय? | What is Ayudha Puja?

आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या सर्व अवजारांचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच ‘आयुध पूजा’’ होय.

यामध्ये पिना, चाकू, कात्र्या आणि पाना यासारख्या छोट्या छोट्या वस्तू आणि कॉम्पुटर, मशिनरी, कार्स आणि बसेस यासारख्या मोठ्या वस्तूसुद्धा समाविष्ट आहेत.


आयुध पूजेची गोष्ट आणि ऐतिहासिक संदर्भ | Story of Ayudh Puja

पांडवांना 13 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात पाठवण्यात आले. हा वनवास सुरु करण्याआधी त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या झाडावर लपवली होती. असे म्हटले जाते की अर्जुनाने ही शस्त्रे विजयादशमी (दसरा) च्या दिवशी परत आणली.. यानंतर त्यांनी युद्धाची तयारी सुरू केली आणि कुरुक्षेत्राचा विजय मिळवला. पांडव विजयादशमीला पुन्हा परत आले, म्हणूनच एक नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पण कर्नाटकमध्ये विजयादशमीच्या एक दिवस आधी शस्त्र पूजा केली जाते.

प्राचीन काळी देखील शस्त्रांची पूजा केली जात असे कारण शस्त्रांच्या द्वारेच शत्रूला हरवणे शक्य होते. उदाहरणार्थ, कर्नाटकमध्ये देवी चामुंडेश्वरीने (पार्वती देवीच्या अवताराने) महिषासुर या राक्षसाचा वध केला. त्याच्या स्मरणार्थ आयुध पूजा केली जाते.


उपकरणांचा आदर आणि सत्कार | Respect for equipments

“जर तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल आदरभावाने ओतप्रोत असाल, तर तुमचे जीवन पूर्णत्व पावते.” -

गुरुदेव श्री श्री रविशंकर

जेंव्हा आपण एखाद्या वस्तूचे महत्व जाणतो तेंव्हा ती वस्तू अपरिमित पटीने उपयुक्त होते. आपले जीवन सुसहाय्य करणाऱ्या गोष्टींना आपण जेंव्हा मान देतो, तेंव्हा आपल्याकडे असलेल्या सर्व वस्तूंपासून आपल्याला समाधान मिळते. अधिकाधिक मिळावे या इच्छा आणि लोभाच्या जाळ्यामध्ये आपले मन अडकत नाही.

पण, एखाद्या वस्तूची पूजा करणे या इतक्या सोप्या कृतीने संपूर्ण परिपूर्णता कशी काय मिळू शकते?

गुरुदेव म्हणतात की तुमच्या मालकीच्या वस्तूंबद्दल तुम्ही नेहमी आदर गमावून बसता आणि हे जाणूनबुजून घडत नाही. प्रामुख्याने ज्या कशाला तुम्ही सन्मानित करता ते तुमच्यापेक्षा मोठे बनते. जेंव्हा तुम्ही समस्त विश्वाचा आदर करता तेंव्हा तुम्ही त्याच्याबरोबर सलोख्याने राहू शकता.

मग तुम्हाला या विश्वातील कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करण्याची गरज उरत नाही. मालकीचा आदर केल्याने लोभ आणि ईर्ष्या यापासून मुक्ती मिळते. म्हणूनच, जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करण्याच्या कौशल्याला रुजावा, जोपासा.

आपल्या जीवनोपयोगी वस्तूंना मान्यता देणे आणि त्यांचा सन्मान करणे -आयुध पूजा /शस्त्र पूजा ही केवळ तेच करण्याचा समय आहे.


एकच दिव्यत्व | One Divinity

जेव्हा आपण वस्तूंची पूजा करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्या वस्तूंची कल्पना करून निर्माण झालेल्या मनाचा सन्मान करत असतो. आपले मन हे दुसरे तिसरे काहीही नसून केवळ दिव्यत्व आहे. एक विमान, एक कॅमेरा किंवा एक माईक निर्माण करण्याचा विचार आपल्या मनात येतो तो एकाच समान स्त्रोत,म्हणजेच देवी मधून येतो. आणि याचेच तर आपण आठव्या दिवशी केल्या जाणाऱ्या चंडी होम मध्ये उच्चारण करतो, -

"या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता "

बुद्धी रुपात सर्व प्राण्यांमध्ये वस्ती करणाऱ्या देवीला मी प्रणाम करतो.

हा श्लोक सर्व प्राण्यांच्या बुद्धीमत्तेमध्ये उपस्थित असलेल्या एकाच दिव्यत्वाचे थोडक्यात वर्णन करतो. त्या बुद्धिमत्तेचा जेंव्हा आपण सन्मान करत असतो तेंव्हा आपण देवीचीच पूजा करत असतो.Ayudha Puja in Hindi

प्रत्येक उपकरणाच्या उपयुक्ततेला मान्यता दिली जाते आणि त्याचा दिव्यत्व म्हणून आदर-सत्कार केला जातो. सारेकाही या एकाच दिव्यत्वाचा भाग आहे याची जेंव्हा आपल्याला याची जाणीव होते तेंव्हा मनाला एक प्रकारची गहन विश्रांती प्राप्त होते.

या नवरात्रीत तुमच्याकडे जे काही आहे त्याची पूजा करून तुमच्या मनाला गहन परिपूर्णता आणि विश्रांतीकडे न्या. तुमच्या जीवनातील अगदी छोट्यात छोट्या वस्तूमध्ये सुद्धा तुमची आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करण्याची क्षमता आहे.

सुरवातीला जाण्यासाठी क्लीक करा (Top)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवरात्री संबंधित अन्य लेख

  1. चंडी होम | Chandi Homa
  2. नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
  3. नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
  4. नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
  5. नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
  6. आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
  7. नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
  8. २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
  9. ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
  10. देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
  11. आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

ज्ञानासंबंधी अधिक लेख वाचा | Read more on wisdom

योगाबद्दल अधिक वाचा | Read more about Yoga