नवरात्रीत होणारे ७ होम / यज्ञ आणि त्यांचे फायदे काय आहेत ? | Benefits of 7 Homa performed in Navratri

सहा यज्ञ कां केले जातात आणि त्यांचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो?

  • गणेश होम
  • सुब्रमण्य होम
  • नवग्रह होम
  • रुद्र होम
  • सुदर्शन होम
  • नव चंडी होम
  • ऋषी होम

नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ?  हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


1. गणेश होम

कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोहो ऊर्जांचा त्यात समावेश असतो. नेहमीच या ऊर्जा बाह्य नसतात तर त्या आपले शरीर किंवा मन यासुद्धा असू शकतात. म्हणूनच सर्व विघ्नांना दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणपतीला प्रार्थना केली जाते. परंपरेनुसार कोणत्याही यज्ञाची सुरुवात करण्याआधी गणेश होम आणि पूजा केली जाते.


2. सुब्रमण्य होम

भगवान सुब्रमण्य हे विजयाचे देव आहेत. कोणत्याही प्रयासांमध्ये यश मिळवण्यासाठी ज्ञान शक्ती आवश्यक असते. म्हणूनच ब्रम्हण्य मंत्रांचे पठण करून भगवान सुब्रमण्य यांना आवाहन केले जाते.


3. नवग्रह होम

नवग्रह किंवा नऊ ग्रह हे महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या ग्रहगतीचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर तर पडतोच शिवाय त्यावर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची ग्रहगती प्रभावित करते. म्हणूनच या नऊ ग्रहांचा त्यांना विविध आहुत्या अर्पण करून सन्मान केला जातो. असे करताना प्रत्येक ग्रहासाठी त्याचा विशिष्ठ मंत्र पठण केले जाते. विशिष्ट ग्रहांचा आपल्या शरीराच्या विशिष्ट भागांवर परिणाम होतो तसेच असा प्रभाव धान्ये आणि रात्नांवरही पडतो. पृथ्वीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ग्रहांचा प्रभाव असतो. त्यांच्या नकारात्मक परिणामांना कमी करण्यासाठी किंवा असा प्रभाव पडू नये यासाठी आणि आपल्यावर पडणाऱ्या त्यांच्या सकारात्मक प्रभावाला आणखी प्रबळ करण्यासाठी आपण या नऊ ग्रहांची प्रार्थना करतो.


4. रुद्र होम

रुद्र होम आपल्याला शांती प्रदान करतो आणि आपल्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट करतो. या होमामध्ये ‘नमक आणि चमक’ मंत्रांचा समावेश असलेल्या रुद्र मंत्रांचे पठण केले जाते. रुद्र मंत्रांचा सन्मान केल्यामुळे आपल्याला गहन ध्यानामध्ये जाण्यास मदत होते आणि हे मंत्र सत्त्व, रजस आणि तमस या गुणांमध्ये संतुलन निर्माण करतात. रुद्र मंत्र या तीन गुणांचा प्रभाव कमी करतात आणि त्यामुळे आपण शून्यत्वाच्या स्थितीत जातो जी आपल्याला गहन ध्यानात जाण्यास मदत होते. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये रुद्र होम करताना ११ पुरोहित अकरा वेळा रुद्र मंत्रांचे पठण करतात. यालाच ‘एकादश रुद्र होम’ असे म्हणतात.


5. सुदर्शन होम

सुदर्शन होम हे आपल्याला नकारात्मक शक्ती आणि प्रभावांपासून रक्षण करतो आणि आपल्याला परमानंदाकडे घेऊन जातो. या होमामध्ये सुदर्शन मंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण केले जाते. सुदर्शन होमामध्ये लक्ष्मी मंत्र आणि श्री सुक्त यांचेसुद्धा पठण केले जाते.


6. नव चंडी होम

चंडी होमामध्ये देवीला आवाहन केले जाते आणि त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप केला जातो. हा होम झाल्यानंतर देवी पूजा केली जाते.
महा चंडी होम हा नऊ वेळा करतात. म्हणून त्याला ‘नव चंडी होम’ म्हणतात. १०० वेळा जेव्हा हा केला जातो तेव्हा त्याला ‘शत चंडी होम’ म्हणतात; जेव्हा १००० वेळा केला जातो तेव्हा त्याला ‘सहस्र चंडी होम’ म्हणतात; आणि जेव्हा १०,००० वेळा केला जातो तेव्हा त्याला ‘अयुत चंडी होम’ म्हणतात. या प्रत्येक यज्ञाच्या विधी वेगवेगळ्या आहेत आणि सर्वसामान्यपणे नव चंडी होम केला जातो. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनँशनल सेंटरमध्ये शत चंडी होम करतात.

चंडी होम बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


7. ऋषी होम

हा होम नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केला जातो. ऋषी हे दृष्टाराह आहेत. म्हणजेच ते ज्यांनी गहन समाधीमध्ये राहून अवकाशातून वेदांचे मंत्र प्राप्त केले. मानवजातीच्या उन्नतीसाठी हे पवित्र ज्ञान ज्यांनी दिले त्या ऋषींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी होम करतो. सप्तर्षी आणि इतर सर्व ऋषींकरिता प्रार्थना केली जाते. याची सुरुवात गुरुपुजेने होते. परमपूज्य गुरुदेवांच्या कृपेने आणि त्यांच्या उद्दिष्ट्यानुसार आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये अशा प्रकारे नवरात्री साजरी केली जाते.


नवरात्र हा दरवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनँशनल सेंटरमध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे ज्याच्याकडे हजारो लोक आकर्षित होतात. या नऊ दिवसात प्राचीन वैदिक शास्त्रांनुसारच पूजा, होम केले जातात आणि त्यांची पूर्व तयारी देखील फार मोठ्या प्रमाणात सुरु असते.

या तयारीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनँशनल सेंटरच्या वेद आगम संस्कृत महापाठशाळेचे मुख्याध्यापक (प्रिन्सिपल) श्री. ए. एस. सुंदरमूर्ती शिवम, जे या सर्व पूजा आणि होम यांचे मुख्य पुरोहित असतात, यांची भूमिका यामध्ये फार मोठी असते.

त्यांच्या घराण्याला पौरोहित्याचा वारसा लाभला असून त्यांनी जगभरात १००५ कुंभाभिषेक आणि २१०० पेक्षा अधिक चंडी होम  केले असून १९९४ पासून आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनँशनल सेंटर येथे नवरात्रीचे होम आणि पूजा करत आले आहेत. वरील तपशीलवार उत्तरे त्यांनीच दिली आहेत.

नवरात्री संबंधित अन्य लेख

  1. चंडी होम | Chandi Homa
  2. नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
  3. नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
  4. नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
  5. नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
  6. आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
  7. नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
  8. २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
  9. ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
  10. देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
  11. आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

ज्ञानासंबंधी अधिक लेख वाचा | Read more on wisdom

योगाबद्दल अधिक वाचा | Read more about Yoga