ध्यान कसे करावे समजण्याआधी, हे समजणे गरजेचे आहे की त्याबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज वा असत्य काय आहे? प्रथम आपण हा गैरसमज / अपसमज जाणून घेऊ या त्याचवेळी आपल्याला खऱ्या अर्थाने ध्यान कसे करावे हे समजेल.
पण हे ‘काही न करण्याची कला’ अवगत कशी करायची? ते आपण शिकू .
‘ध्यान’
‘ध्यान’ कसे करावयाचे याकरिता अनेक पद्धती आहेत. परंतु सगळ्यात सोपी पद्धत ( जर तुम्ही प्रथमच ध्यान शिकत असाल) ध्यान करण्याची आहे ' निर्देशित ध्यान ' अथवा 'योग्य मार्गदर्शनखाली' केलेले ध्यान. योग्य मार्गदर्शनाखाली केलेल्या ध्यानामध्ये तुम्हाला डोळे बंद करून बसायचे असते व दिलेल्या सूचना ऐकून त्यांचे पालन करायचे असते.
परंतु, स्वतःचे स्वतः ध्यान करण्यासाठी तुम्ही ते तज्ज्ञ मागदर्शकांकडून शिकलेले असणे आवश्यक आहे. याकरिता तुम्ही 'सहज समाधी ध्यान' कार्यक्रम करू शकता. गहनतम ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी तीन गोष्टींचे पालन तुम्ही ध्यानाला बसताना करायला पाहिजे.
- मला काहीही नको - तुम्ही सर्व इच्छा त्यावेळी बाजूला ठेवायच्या आहेत. अगदी 'मला खूप छान ध्यान करायचे आहे सुद्धा.
- तुम्हाला काहीही जाणून घ्यायचे नाही अथवा कोणत्याही 'योजना /नियोजन' करायचे नाही.
- मी कोणीही नाही - आपण कोणीतरी असण्याची किंवा आपण कोणीतरी अहोत अशा ज्या काही कल्पना तुम्ही स्वतः बद्दल करत असता त्या सर्व सोडून द्या .
सह्ज समाधी ध्यान कार्यक्रम
सहज समाधी ध्यान कार्यक्रमात तुम्हाला अतिशय प्रभावी व सहज ध्यान करण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तुम्हाला स्वतःला तुमचा मंत्र देण्यात येतो. अगदी सहजपणे मन शांत करण्याचे व सर्व ताण- तणावां पासून मुक्त करण्याचे काम या मंत्रामुळे सहज होते. ताण- संबंधित त्रासांपासून मुक्तता, गहनतम शांतता तसेच आपले तंत्रही पुन्नरुजीवित होते. तीन दिवस सहा तासांचे सह्ज समाधी ध्यान हे विशेष ध्यान आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या अंतर्निहित असणाऱ्या असीमित क्षमता जाणू शकता तसेच गहनतेचा अनुभव करू शकता .