महाशिवरात्रीनिमित्त श्री श्री रविशंकरजींचा संदेश I Sri Sri's Message On Mahashivaratri
Tue, 03/17/2015 Bangalore, इंडिया
“शिवरात्रीला आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक दुःखे आणि नैसर्गिक आपत्तींपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करतो. ईश्वर प्रत्येकाला शांती आणि ज्ञान बहाल करो” – श्री श्री
आज शिवरात्रि दिवशी भौतिक जगत आणि चेतना एक होतात. स्थूल आणि सूक्ष्म जगत एकत्र येतात आणि तो उत्सव बनतो.
जेंव्हा आपण निसर्गाचे नियम मोडतो तेंव्हाच गोंधळ माजतो. हे पूर, जंगलातील वणवे आणि इतर नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गाचा क्रोध आहे, प्रकोप आहे. आणि हा प्रकोप ज्या अलौकिक दैवी चेतनेशिवाय शमत नाही, ते ‘शिवतत्व’ होय. निव्वळ शिवच निसर्गाचा प्रकोप शांत करू शकतात.
अडथळे/आपत्ती/गोंधळ तीन प्रकारच्या आहेत :
१. मानसिक गोंधळ,
२. आत्मिक गोंधळ,
३. नैसर्गिक गोंधळ.
म्हणून शिवरात्रीला आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक दुःखे आणि नैसर्गिक आपत्ती पासून मुक्तता व्हावी आणि सर्वत्र शांतता नांदावी म्हणून शिवाला प्रार्थना करतो.
निसर्गाची रहस्ये गुप्त आहेत. पहा,आपण आत्ता वाय फाय जाणतो परंतु वाय फायचे रहस्य अनादी काळापासून आहे. आणि विज्ञान प्रगत होत आहे ही ईश्वराची कृपा आहे. वेदांमध्ये देखील याचा उल्लेख आहे,
“ईश्वरा, निव्वळ तुझ्या कृपेमुळे, हस्तक्षेपामुळेच विज्ञान प्रकट होते, निसर्गातील गुपिते प्रकट होतात.
जिथे मनदेखील पोहोचू शकणार नाही अशा अथांग ब्रम्हांडातील रहस्ये , हे ईश्वरा, निव्वळ तूच प्रकट करू शकतोस.”
म्हणून आज आपण जागतिक शांततेसाठी, सामाजिक शांती आणि प्रगतीसाठी, प्रत्येकाच्या ज्ञानवृद्धी आणि आनंदासाठी हृदयापासून, कृतज्ञापूर्वक प्रार्थना करूया.
ईश्वर तुम्ही जसे आहात तसा तुमचा स्वीकार करते. तुम्ही स्वतःला काटे समजत असाल तरी स्वीकार, पान असाल
तरी स्वीकार. तुम्ही फळ किंवा फुलासारखे असलात तरी स्वीकार. तुम्ही जसे आहात आणि प्रगतीच्या कोणत्याही
स्तरावर तुम्ही असलात तरी फक्त ईश्वरच तुमचा स्वीकार करतो. हेच सत्य आणि सुंदर आहे. शिव म्हणजे सत्य,
सुंदर आणि कृपा. आणि हे तिन्ही अविभाज्य आहे. साहजिकच “शिवरात्र “ म्हणजे कृपा, सत्य आणि सौंदर्याचा निसर्गाने साजराकेलेला उत्सव.
Read earlier posts
A Message on Guru Nanak’s Birthday
जानेवारी 29, 2018
Gurudev Sri Sri Ravi Shankar reminisces Guru Nanak Devji a great Saint who lived in India more than 500 years back on the occasion of Guru Nanak Jayanti.