आयुर्वेदानुसार निरोगी पचन संस्था संपूर्ण तंदुरुस्तीचा आधार आहे. बहुतांश रोगाचे प्रमुख कारण पचन संस्थेतील बिघाड हेच असते. पचन संस्थेतील मेटॅबोलिक ऊर्जा, ज्याला ‘अग्नी’ म्हटले जाते, शरीरातील साऱ्या प्रकारचे विष व अवशेष बाहेर काढते. ती भौतिक पदार्थांना तोडून त्यांना सूक्ष्म ऊर्जेत परिवर्तीत करते, जे शरीराला आवश्यक आहे. त्यामुळे आंतरिक ऊर्जा निर्माण होते आणि आपले मन स्पष्ट आणि निर्दोष रहाते.
आपण एका ज्यूसरच्या उदाहरणावरून पचन संस्थेला समजू शकतो. शरीरातील विषतत्व फळांच्या सालीसारखे आहेत. अग्नी ज्यूसर ब्लेड्स आहेत आणि ज्यूस ऊर्जा आहे. जेंव्हा अग्नी कमजोर होतो तेंव्हा अन्नाचे पचन व्यवस्थित होणार नाही आणि त्यातून ऊर्जा (ज्यूस) निर्माण होणार नाही. मग याचा परिणाम काय होईल? जास्त प्रमाणात विष (फळांची सालं) पेशींमध्ये जमा होऊ लागतील. म्हणूनच तेज अग्नी (धारदार ज्यूसर ब्लेड्स) एका कार्यक्षम पचन संस्थेसाठी आवश्यक आहे. या पाचक अग्नीला योगाद्वारे प्रज्वलित केले जाऊ शकते.
योगा कशाप्रकारे पचन संस्थेला सुधारेल?
योगा म्हणजे श्वासासोबत केलेला व्यायाम. श्वास शरीरात प्राणशक्ती वाढवतो आणि अयोग्य आहार, चुकीची जीवन शैली आणि तणावामुळे तयार झालेल्या विषतत्वांना शरीरातून बाहेर काढतो. श्वास अग्नीला ठीक करतो आणि शरीरात संतुलन साधत पूर्ण पचन संस्थेला दीर्घायुष्य प्रदान करतो.
पचनसंस्थेसाठी पूरक आसने:
- त्रिकोणासन- भूक वाढवते, पचनक्रिया ठीक करून मलावरोध दूर करते.
- पश्चिमोत्ताणासन- मलावरोध दूर करून पचन संस्थेतील समस्या दूर करते.
- पवनमुक्तासन- गॅसेसशी संबंधित तक्रारी दूर करते.
- मत्स्येन्द्रासन- पोटातील अवयवांना मसाज होऊन पचनाचे आजार दूर करते.
- उष्ट्रासन- पोट व आतड्यांना ताण देऊन मलावरोध दूर करते.
योगा – एक प्रभावी मार्ग
योगा करण्याचे अनेक लाभ आहेत, ज्यामुळे कळते की योगा आवश्यक का आहे. प्रज्वलित पचन संस्थेसोबत होणारे आणखी काही लाभ:
- हलकेफुलके आणि लवचिक शरीर
- सजग आणि तंदुरुस्त मन
- मजबूत हाडे व स्नायू
- लठ्ठपणा कमी होतो.
- शरीरात ताकत वाढते.
- भूक वाढते.
- कार्यक्षमतेत वाढ होते आणि थकवा येत नाही.
हे सर्व आपल्याला लाभते. आपल्याला फक्त योगा नियमितपणे करावा लागतो, जेणेकरून आपणास स्वस्थ पचन संस्था लाभते शारीरिक स्वास्थ्य वाढते.
योगा शिकण्यासाठी येथे क्लिक करा श्री श्री योगा