कोनासन २ कसे करावे | How to do Konasana 2
- दोन्ही पायांमध्ये दोन फुटांचे अंतर घेऊन उभे राहूया. दोन्ही पायांवर समान भार ठेऊया.
- श्वास आंत घेत दोन्ही हात डोक्यावर नेऊन बोटे एकमेकात गुंतवूया. दंड कानाजवळ ठेऊया, हा आकार मनोऱ्यासारखा बनेल.
- श्वास सोडत उजवीकडे झुका. पाय जमिनीवर घट्ट राहूद्या, कोपर ताठ असू द्या, कंबर डावीकडे झुकवा.
- अंतिम स्थितीत स्थिर रहा-विश्राम करा. दीर्घ श्वसन सुरु ठेवा.
- श्वास घेत आसन सोडत ताठ उभे राहूया.
- श्वास सोडत हात खाली घेऊया.
- हीच कृती करत विरुद्ध बाजूला आसन करूया.
कोनासन २ चे लाभ | Benefits of the Konasana 2
- शरीराच्या दोन्ही बाजू आणि मणक्यामध्ये ताण निर्माण होतो.
- हात, पाय आणि पोटातील अवयव मजबूत बनतात.
योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा..