तेजस्वी त्वचेसाठी १२ नैसर्गिक उपाय

आपण जडवस्तू आणि चेतना या दोन्हीपासून बनलो आहोत. याचाच अर्थ हा की आपली त्वचा ही फक्त बाहेरून दिसणारे एक आवरण नाही तर ती जिवंत आणि कार्यशील आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे त्वचाही एक अवयव आहे आणि त्यालाही निरोगी ठेवले पाहिजे, त्याचे पोषण झाले पाहिजे . 

पण सौन्दर्य ही आतून येणारी बाब आहे. असे म्हणतात की सौन्दर्य प्रत्येकाच्या हृदयात असते आणि तेजाच्या रूपात ते चेहऱ्यावर दिसते. जरी त्वचा हा स्थूलमानाने सौन्दर्य सगळ्यात अधिक  प्रकट  करणारा अवयव असला तरी, सौन्दर्याची व्याख्या त्वचेपलीकडे आहे. 

आजकालचे सौन्दर्योपचार त्वचेच्या वरवरच्या गरजा पूर्ण करतात, पण त्वचेच्या प्रत्येक पेशीला आतून तजेलदार आणि सतेज कसे बनवावे याची उकल करत नाहीत. 

वय, ताण तणाव, धूम्रपान, दारू व इतर नशेचे पदार्थ सेवन, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, शरीराच्या संप्रेरकांमधील बदल आणि अपचन हे सामान्यतः त्वचेच्या समस्यांचे कारण ठरतात. तेजस्वी त्वचेसाठी अनेक नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी होते.

 इथे आम्ही त्वचेच्या तजेलदारपणासाठी उपाय देत आहोत 

त्वचेसाठी घरगुती उपचार 

सौन्दर्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक गुपिते  दिली आहेत. आयुर्वेदिक उटणे त्वचेचे अगदी अलवार पोषण करते आणि त्वचेचा श्वासोच्छ्वास अधिक चांगला होण्यासाठी मदत करते. याशिवाय या उटण्यासाठी लागणारे पदार्थ तुमच्या स्वैपाकघरातच मिळतील. 

घाम येऊ द्या

धावणे, पळणे, काही सूर्यनमस्कार वेगाने घालणे याने रक्ताभिसरण वाढते. घाम येणे हे तब्येतीसाठी आणि त्वचेसाठी चांगले आहे. व्यायाम झाल्यावर न विसरता थंड पाण्याने अंघोळ करा, ज्यायोगे तुमची त्वचापण स्वच्छ होईल. 

योगासने करा 

अधोमुख श्वानासन कधी केले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की या आसनात हळू हळू लक्ष श्वासाकडे जाते. योगासनांची खुबी हीच आहे की आपले लक्ष शरीरावर (कारण ते ताणले जात असते) आणि श्वासावर असते. जेव्हा तुम्ही उच्छश्वास सोडता तेंव्हा त्याबरोबर तुमच्या शरीरातील हानिकारक विषद्रव्ये बाहेर पडत असतात. योगासने आणि सजगतेने घेतलेले श्वास यामुळे शरीरस्वच्छतेची क्रिया वेगाने घडते, ज्याने त्वचा ताजीतवानी व प्रफुल्लित राहते. याचा उपयोग त्वचेचे तेज टिकवून ठेवण्यासाठी होतो. 

तुम्ही कोण आहात हे जाणा 

कधी कधी कितीही काही औषध लावले तरी तुमची त्वचा कोरडीच राहते, असे कधी होते ना ? तुम्ही आणि तुमचे मित्र /मैत्रीण एकच उत्पादन वापरत असाल तरी तुमच्यासाठी परिणाम वेगळा असतो. हे वेगवेगळ्या शरीरप्रकृतीमुळे होते. आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही २ किंवा ३ घटकांपासून बनली आहे : वात, पित्त आणि कफ.

विशेष म्हणजे, या प्रत्येक शरीरप्रकृतीचे काही विशेष गुणधर्म आहेत जे तुमची शरीरयष्टी, व्यक्तिमत्व आणि तुमची त्वचा बनवत असतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर शक्य आहे की तुमची प्रकृती वातप्रधान आहे. पित्त प्रकृती असणाऱ्यांची त्वचा सामान्य असते तरी तेलकट त्वचा पित्त प्रकृती दर्शवते. तुमचा प्रकृतीप्रकार जाणून घेतल्याने काय पदार्थ खावे/ वापरावे आणि काय टाळावे हे समजू शकेल. 

नैसर्गिक अन्न खा 

आपण जे खातो तसे आपण बनतो. अर्थातच ताजे , स्वच्छ व रसाळ अन्न खाल्ल्याने त्वचाही टवटवीत होते. प्रथिने, व्हिटॅमिन, फळे, पालेभाज्या योग्य वेळी योग्य प्रमाणात खाण्याने फायदा होतो. 

दर आठवड्याचे नियम पाळा 

काही विशिष्ट तेलांनी चेहेऱ्याची मालिश केल्यास चांगला परिणाम होतो. तुमच्या त्वचाप्रकारानुसार क्षीरबाला किंवा नारायण तेल निवडू शकता. मोहरीचं तेल, खोबरेल तेल, बदाम तेल किंवा कूमकादी तेल हे त्वचेचे चांगले पोषण करून त्वचेला तजेला देऊ शकतात. 

सुदर्शन क्रियेला सौन्दर्य मंत्र बनवा 

योग्य पद्धतीने श्वास घेण्याने डाग आणि मुरमांवर फरक पडेल असे वाटते का? हो, नक्कीच फरक पडतो. जेव्हा तुम्ही निवांत असता, तेव्हा मुरूम, पुरळ अशी बाहेर दिसणारी ताणाची अभिव्यक्ती कमी होते. सुदर्शन क्रियेच्या श्वासपद्धतीमुळे शरीर व मनावर साठलेला ताण मोकळा होतो, आणि आपल्या प्रकृती मध्ये समन्वय व समतोल साधला जातो. 

रोज ध्यान करा 

मेणबत्ती प्रकाशज्योत देतेच. तुमच्यामधली अंतर्ज्योत देत असणाऱ्या प्रकाशावर ध्यानाचा खूप परिणाम होतो. जेवढे अधिक ध्यान कराल तेवढा अधिक प्रकाश. चित्रकार ध्यान करणाऱ्यांच्या चित्रात मस्तकाभोवती नेहमी आभा दाखवतात. ते फक्त कल्पनेतील चित्र नाही. ते खरंच आहे. ध्यान करणारे आतून तेजाने चमकतात, कुठल्याही संसाधनांशिवाय. 

मौन हे सोनं आहे 

तुम्ही जेव्हा बराच वेळ बडबड करत असता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? दमल्यासारखे वाटते ना?  अविरत बडबड आपल्या शरीरावर आणि मनावर नाहक दडपण आणते. मौनामुळे अविश्वसनीय प्रमाणात ऊर्जा व्यर्थ जाण्यापासून वाचते. जर तुम्हाला याबाबत काही करावेसे वाटत असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे पार्ट २ शिबीर करून बघा. ध्यान आणि मौनाचे एकत्र परिणाम तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल. आणि महत्वाचे म्हणजे तुमची त्वचा तजेलदार होईल. 

काहीही झाले तरी तुमच्या मनाला वाचवा. 

तुम्ही जर नाखूष, चिडलेले, वैतागलेले असाल तर नक्कीच तुमची त्वचा फार चांगली दिसणार नाही. म्हणून, तुमचा आनंद आणि मनाची शांती ढळणार नाही याची काळजी घ्या. यासाठी ध्यान हा एकमेव मार्ग आहे. ही चैनीची गोष्ट नाही तर गरजेची गोष्ट झाली आहे. 

अजून १८?  का नाही!

आपण आपल्या आयुष्याला त्यातील सुरकुत्या आणि पांढऱ्या होणाऱ्या केसांसकट जवळ करायचे आहे. सुंदर दिसणे म्हणजे साधारणपणे तरुण दिसणे आणि आयुष्याबद्दल उत्साही दृष्टिकोन असणे, असे मानतात. पण खरी गोष्ट ही आहे की तुम्हाला तरुण वाटत असेल तर तुम्ही तरुण दिसालच. तुमचे वय वाढण्याची प्रक्रिया ध्यानामुळे नैसर्गिकरित्या मंदावते आणि तारुण्य व तजेला जपून ठेवले जाते. मग, करा सुरुवात. एक सुंदर स्वप्न पहा आणि हृदयातून १८ वर्षांचेच राहा. 

चेहेऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम 

तुम्ही मोहक दिसण्यासाठी कितीही पैसे खर्च केले तरी, आकर्षक दिसण्यासाठी तुमचे हास्य महत्वाचे आहे. आपण आपले शरीर आणि बाह्यसौंदर्य सुधारण्यासाठी इतका समय, शक्ती आणि पैसा घालवतो, पण आपला मनापासूनचा आनंद व सुख व्यक्त करायला विसरतो. खरेतर यासाठी फक्त ओठांना थोडे ताणायचे आहे. चेहरा हसरा ठेवा आणि तुमचे व जगाचे सौन्दर्य वाढवा. 

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञान चर्चांपासून प्रेरित 

भारती हरीश, प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि डॉ. निशा मणीकांतन, आयुर्वेदिक तज्ञ यांनी दिलेल्या माहितीवर आधारित