राग कमी कसा करायचा

जर तुम्ही त्रासले असाल अथवा अस्वस्थ असाल, ज्याप्रकारे तुमचा राग तुमच्यावर नियंत्रण ठवतो त्याऐवजी हे उलटे असावे, तिथे  (तुमच्यासाठी) मदतीचा  हात आहे. त्याच्या अनेक फायद्यांपैकी, महत्वाचा खूप मोठा ध्यानाचा फायदा राग कमी करण्यासाठी मदत करणे हा आहे. पण रागासाठी ध्यान याबद्दल आपण अधिक समजण्यापूर्वी, चला आधी समस्या समजून घेऊ आणि त्याचे परिणाम .

राग काय आहे? 

रागाची व्याख्या अशी आहे "नैसर्गिक, विलक्षण स्वस्थ, माणसाची भावना". रागाच्या अतितीव्र आवेशानंतर, जर तुम्ही (ते) विसरू शकत असाल, तर ठीक आहे. तथापि, जेव्हा राग हाताबाहेर जातो, समस्यांची फौज एकाएकी आयुष्यातील सर्व क्षेत्रात येते : शारीरिक, मानसिक आणि सामाजिक.

राग तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे का? 

रागामुळे फ्लाइट- ऑर- फाइट प्रतिक्रिया एकाएकी घडते ( फ्लाइट- ऑर- फाइट प्रतिक्रिया- तणावपूर्ण स्थितीमध्ये येणारी प्रतिक्रिया). सुरुवातीला, त्याचा परिणाम म्हणजे हृदयाची गती, रक्तदाब आणि तणाव वाढतो. श्वासोच्छवासाचीही गती वाढते. जेंव्हा राग ' पुनरावृत्तीत आणि अप्रतिबंधित ' होतो, (तेव्हा) चयापचयातील बदल फक्त आरोग्यालाच अपरिहार्यपणे अपाय करत नाही तर, पूर्ण आयुष्याचा दर्जा  अथवा स्तरही (बाधित होतो). अप्रबंधित राग खूप वाईट परिणाम करू शकतो जसे- 

  • हृदयविकाराचा झटका 
  • आघात
  • रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे
  • त्वचा रोग
  • निद्रानाश
  • उच्च रक्तदाब 
  • चयापचयाची समस्या 
  • भय चिंता आणि तणाव
  • अर्धशिर्शी (तीव्र डोकेदुखी) 
  • नकारात्मक भावना 
  • पूर्वीपासूनच असणाऱ्या आरोग्याच्या स्थितीत आणखी समस्या उत्पन्न होते

राग समजावून घेऊ

राग चांगला नाही ह्याची तुम्ही स्वतः ला  वारंवार आठवण करून दिलेली आहे. तरीही जेव्हा हि भावना येते , तुम्ही तिला नियंत्रणात ठेवण्यात असमर्थ होता. लहान असताना, तुम्हाला रागवायचे नाही असे शिकवले जाते पण, हे शिकवले जात नाही कि रागावर नियंत्रण कसे ठेवायचे किंवा राग कमी कसा करायचा. राग कमी कसा करायचा याच्याविषयी सल्ला अथवा सूचनांच्या आधी, सुरुवातीपासून सुरुवात करू, रागाचे कारण काय?

१. बरेचदा जेव्हा आपण सभोवताली अपूर्णता/ त्रुटी पाहतो, आपण ते स्वीकारण्यास असमर्थ असतो. 

   उदाहरणादाखल- जेव्हा कोणीतरी चुकीचे काहीतरी करते, आपला राग एखाद्या लाटेप्रमाणे वाढतो 

   आणि नंतर कमी होतो, आपल्याला हलवून सोडतो,आणि काहीवेळा पश्चातापामध्ये.

२. जेव्हा आपण रागात असतो, आपण सजग नसतो. पहिली पायरी म्हणजे अपूर्णता / त्रुटी राग काढून 

  टाकू शकत नाही/दूर करू शकत नाही ह्याची जाणीव असू देणे . आपल्याला हे समजून घेण्याची गरज 

  आहे कि ज्यावेळी प्राप्त परिस्थिती आपण आहे तशीच स्वीकारतो, आपण सजगतेने त्यात सुधारणा 

  करू शकतो.

३. हे म्हणणे सोपे आहे करण्यापेक्षा कारण मन आणि भावना यांना सरळ सामोरे जाणे सोपे नाही. 

   त्यामुळेच आपल्याला काही तंत्रांची गरज आहे जे आपल्याला मदत करतील. रागासाठी ध्यान, 

   शांततेसाठी श्वासोच्छवासाचे तंत्र लक्षणीय भूमिका पार पाडतात.

७ सामान्य सूचना राग कमी करण्यासाठी

तुम्ही ते आहात जे तुम्ही खाता

   तुमच्या  हे निदर्शनास आले आहे का तुम्ही काही दिवस शांत आणि आराम अनुभवता , बाकीचा काहीकाळ तुम्ही अस्वस्थ असता ? हे होते कारण तुम्ही जे अन्न खाता ते खूप प्रमाणात तुमचे मन 

   आणि भावनांवर परिणाम करते. काही प्रकारचे अन्न अस्वस्थता आणि तणाव तुमच्या मनात 

   आणि  शरीरावर आणते. ह्या प्रकारचं अन्नात मुख्यतः मांसाहार, मसालेदार आणि तेलकट अन्न 

   यांचा समावेश होतो. ज्यादिवशी तुम्हाला प्रतिक्रियाशीलतेची भावना जाणवते (तेव्हा) याप्रकारचे 

   अन्न  टाळावे आणि अवलोकन/निरीक्षण करावे. तुम्हाला आत परिवर्तन झाले असे  वाटण्याचा 

   संभव आहे.  यातून एक स्थिर अथवा दृढ मार्ग राग कमी करण्यासाठी आणि भावनांची तीव्रता 

   त्यावेळी कमी करण्यासाठी आहे आरोग्यास पोषक अन्न खाणे.

 

आरामाचा शक्तीचा अनुभव घ्या

तुम्हाला कसे वाटते जेव्हा तुम्हाला शांत झोप मिळालेली नसते ? तुम्ही वारंवार रागवण्यास प्रवृत्त 

   होता का? / वारंवार राग येण्याकडे तुमचा  कल असतो का? तुमच्या शरीरातील थकवा आणि 

   अस्वस्थता तुम्हाला मनाच्या ताण , तणाव आणि चिडचिडेपणा/व्याकुळतेकडे घेऊन जाते. किमान 

   ६-८ तासांची रोजची झोप राग कमी करण्यासाठी गरजेची आहे कारण ती शरीराला आणि 

   त्याचबरोबर मनाला योग्य आराम सुनिश्चित करते. चांगली झोप तुमची चिडचिडेपणाची भावना / 

   व्याकुळतेच्या भावनेची शक्यता कमी करते.

योगासने चांगली आहेत

१०ते १५ मिनिटांची त्वरित केलेली योगासने शरीरातील व मनावरील तणाव आणि अस्वस्थता 

   काढून टाकण्यास मदत करतील. हे,राग कमी करण्यासाठी मदत करेल आणि मनाला ध्यानासाठी 

   तयार करेल. सुरुवात करण्यासाठी  काहीवेळ सूर्यनमस्कार करणे हा चांगला मार्ग आहे . योगासनांचा 

   लाभ शारीरिक व्यायामापेक्षा असा आहे कि योगासनांच्या मुद्रा श्वासाशी समक्रमित आहेत, त्यामुळे 

   गरजेच्या शारीरिक ताण देण्याबरोबरच तुमच्या ऊर्जेच्या पातळीतही वाढ होते.

   " काही दिवस मला जेव्हा ताण - तणाव जाणवतो , मला स्वतः  च्या शरीरात जास्त कडकपणा 

   जाणवतो.  हे मला अस्वथ आणि चिडचिडे  बनविते. सहजतेने रागवण्याकडे माझा कल असतो. योग 

   शरीरातील कडकपणा काढून टाकतो, मला वाटते राग कमी करण्याचा हे सर्वात जलद उपाय आहे 

   आनंदी मन आणि आराम वाटणे हा याचा परिणाम आहे,"  प्रियम खन्नाचे म्हणणे.

प्राणायाम मनासाठी चांगला आहे

मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी भस्त्रिका आणि नाडी शोधन प्राणायाम  हे प्राणायाम मदत 

   करतात. जेव्हा मन शांत असते, तुम्ही चिडचिडेपणा करण्याच्या आणि रागावण्याच्या शक्यता कमी 

   असतात . पण, हे सुनिश्चित करा कि तुम्ही ते पात्र किंवा योग्य शिक्षकाकडून शिका.

खोल श्वास

काही खोल श्वास घेणे तुम्हाला तत्काळ राग सोडण्याकरिता मदत करतात. ज्याक्षणी तुम्हाला राग येतो, डोळे बंद करा आणि काही खोल श्वास घ्या. तुमच्या बदललेल्या मनाच्या स्थितीचे निरीक्षण 

   करा. श्वास ताण मुक्त करतो आणि तुमच्या मनाला शांत होण्यासाठी मदत करतो.

 

'हमम्-  ' करा

 'हमम्' प्रक्रियेसाठी काही मिनिट लागतात, पण ते तुम्हाला लगेच अगदी शांत करते आणि राग 

   कमी करण्यासाठी मदत करते. हि चित्रफीत (विडिओ) 'हमम्' प्रक्रिया कशी करावयाची याकरिता बघा.

 

रोज ध्यान

योगा आणि प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने, आणि अन्नावर लक्ष देणे (आरोग्यास पोषक अन्न खाणे) अस्वस्थता मिटविण्याकरिता मदत करते, पण कोणीही मनाची हि शांत आणि स्थिर स्थिती कशी टिकवू शकेल? रोज ध्यान हे त्याचे उत्तर आहे फक्त २० मिनिटांचे  रोजचे ध्यान पूर्ण दिवसाकरिता पुरेसे आहे. तुमच्या हे लक्षात येईल कि जरी तुम्हाला राग आला, (तरी) तुम्ही  लवकर शांत व्हाल. जरी ध्यानाचे अनेक फायदे मन आणि शरीरासाठी आहेत, राग कमी करण्याकरिता ध्यान हा  त्यापैकी एक महत्वपूर्ण लाभ आहे. अनुभवी शिक्षकांकडून ध्यान शिकणे हे अनुकूल आहे. परंतु , जोपर्यंत तुम्ही (क्लास) वर्गामध्ये जात नाहीत, निर्देशित ध्यानापैकी ध्यानाचा अभ्यास करा .

" ध्यान मला शांत करते आणि रागापासून दूर ठेवते," सुरभी शर्मा म्हणते 

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या  ज्ञान संभाषणावरून प्रेरित 

लिखाण : दिव्या सचदेव , भारती हरीश ,शिक्षक , द आर्ट ऑफ लिविंग, यांच्या माहितीवर आधारित.

ध्यानाचा नियमित सराव/ अभ्यास तुमच्या ताण तणावाशी संबंधित समस्या कमी करते, मनाला सखोल आराम देते आणि प्रणाली पुनरुज्जीवित करते. द आर्ट लिविंगचे  सहज समाधी ध्यान हा विशेषतः तयार केलेला कार्यक्रम आहे जो तुम्हाला गहनतेत घेऊन जातो आणि तुमच्या असीमित कक्षा रुंदावण्यास मदत करतो.  

तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रात सहज समाधी ध्यानाची माहिती घ्या.