अभ्यास? अरे तो तर एकदम सोप्पा आहे!”
“मी आता परीक्षेला अजिबात घाबरत नाही!”
“उजळणीची कोणाला गरज? मी हे एकदा वाचले आहे आणि झाला माझा अभ्यास!”
नाही, तुम्ही स्वप्नात नाही. या विद्यार्थ्याला वेड लागलेले नाही आणि या कल्पनासुद्धा असंभाव्य नाहीत. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसोबत असे घडले आहे आणि तुमच्या बाबतीतही तसे घडू शकते. चमत्कार? होय, ध्यानाच्या चमत्काराने हे शक्य आहे, एक सर्वसामान्य विद्यार्थ्याचे जीवन व्यतीत करणाऱ्या तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येते.
#१: एकाग्रतेत वाढ
१. ध्यान ही माझी जादूची छडी आहे
मी थकलेलो आहे आणि मला अभ्यास करायचा असेल तेव्हा ध्यानामुळे मला ताजेतवाने वाटते.
२.ध्यान हे माझे उत्साह वर्धक आहे
३.माझ्या इच्छा आणि मागण्या कमी झाल्या आहेत. ध्यान हा असा परिपूर्ण अनुभव आहे.
४.ध्यानामुळे माझी अभ्यासातील रुची वाढली आहे
५.ध्यान करा आणि परीक्षेला केवळ एकदाच तोंड द्या.
६. ध्यानामुळे माझा दृष्टीकोन बदलला आहे. आता समस्यांकडे मी, अडथळे म्हणून न बघता, आव्हाने म्हणून पाहतो.
७. ध्यानाने मला वेळेचे व्यवस्थापन शिकवले आहे.
८. परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्यान हा मुख्य घटक आहे.
९. माझ्या मित्रमैत्रिणींनी मला आता निरीक्षक असे बोलावतात कारण माझ्या निरीक्षण शक्तीमध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे.
१०. जेव्हा मी ध्यान करतो तेव्हा इतर कोणत्याही गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.
मी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात होतो आणि मी अतिशय तणावात होतो कारण माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना कंपन्यांमधून मुलाखतीचे बोलावणे येत होते. मी पाहिले की माझ्यापेक्षा खालच्या वर्गातील विद्यार्थिनी, जिने ध्यानाचे शिबीर नुकतेच केले होते, वरच्या वर्गातील इंजिनिअरींगच्या डिझाईनमधील समस्या सहजपणे सोडवीत असे. यामुळे मला ध्यान स्वतः करून पाहण्याचा मोह झाला. माझी एकाग्रता सुधारली. मी तोंडी परीक्षेला अतिशय घाबरत असे, परंतु आता मी आत्मविश्वासाने हसतमुखाने उत्तरे दिली. – शैलजा कण्णन
तुम्ही अभ्यासाचे पुस्तक उघडून बसले आहात, लक्ष केंद्रित व्हावे अशी मिन्नती करीत असता आणि मन मात्र कुठेतरी भटकायला निघून जाते असे क्षण तुम्हाला आठवतात? किंवा तुम्ही पिक्चरला जाण्याच्या किंवा मित्राच्या घरी रात्र घालवण्याची योजना करण्यात बिझी होतात जेव्हा परीक्षा सुरु झालेल्या नव्हत्या तेव्हा?
जर तुम्हाला तुमच्या समोर असलेल्या धड्यावर लक्ष केंद्रित करणे अवघड वाटत असेल तर दररोज काही मिनिटांच्या ध्यानाने तुम्हाला मदत होईल. (भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकणाऱ्या) तुमच्या मनाला ध्यान वर्तमानकाळात आणण्यात मदत करते. याचा परिणाम तुमचे अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित होण्यामध्ये होतो.
#२: कमी उजळण्यांची आवश्यकता
ध्यान सुरु केल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात तीनदा उजळणीची संख्या कमी होऊन एकावर आली. ध्यान करायला लागल्यापासून एका वर्षानंतर उजळणीची अजिबात गरजच उरली नाही! परीक्षा देताना मला पूर्णपणे आत्मविश्वास वाटतो. – साक्षी बाबर
जेव्हा तुमचे लक्ष केंद्रित होण्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टींचे आकलन लवकर होते. दैनंदिन ध्यान करण्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते आणि मग तुम्हाला पहिल्यापेक्षा कमी उजळणीची किंवा उजळणीची अजिबात गरज उरत नाही! अनेक ध्यान करणा-या विद्यार्थ्यांनी सांगितले की पहिल्यांदा वाचणे हे मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्याकरिता पुरेसे असते. म्हणून मग जेव्हा पुढच्या वेळेस तुमचे शिक्षक विचारतील की तुम्ही काल काय शिकलात तेव्हा तुमचाच हात सर्वात पहिले वर जाईल!
#३: आत्मविश्वासात उत्तुंग भरारी
ध्यानाने मला एकप्रकारचे समाधान दिले आहे. मला माहित आहे की परीक्षेमध्ये मी माझे शंभर टक्के प्रयत्न देतो आणि मग मला निकालामुळे काही फरक पडत नाही. – विकास कुमार
तुम्हाला तुमचे विचार वर्गात इतरांपुढे मांडण्याची भीती वाटते का? असे कितीवेळा झाले आहे की तुम्हाला उत्तर माहित होते पण हात वर करण्यात तुम्हाला संकोच वाटला?
वरील गोष्ट अगदी बरोबर आहे का? – ध्यानाला आपला खास दोस्त बनवा आणि अधिक चांगला आत्मविश्वास अनुभवा.
#४: छुप्या कलागुणांना विकसित करा:
मला अभ्यासात कधीच रस नव्हता परंतु ध्यानाने माझ्यातले इतर कलागुण विकसित झाले. मला आत्मविश्वास मिळाला आणि मी कॉलेजच्या उपक्रमांमध्ये भाग घेऊ लागलो. सर्वप्रकारच्या लोकांसोबत राहण्याची आणि तरी आपला आत्मसन्मान टिकवण्याची कलासुद्धा मी शिकलो. सर्वात चांगली गोष्टं म्हणजे संपूर्ण दिवसभराचा थकलेला मी कसा परततो आणि ध्यान केल्यावर मला जणू तीन-चार तास झोप काढल्यासारखे विश्रांत वाटते आणि मग मी माझ्या अभ्यासाला लागतो. – जसराज सुथर
ध्यान अतिशय तरल पातळीवर काम करते ज्यामुळे छुपे कलागुण जोपासले जातात. नियमित सरावाने, तुम्हाला तुमच्यातील सृजनशीलता अधिक रसिकतेने वृद्धिगत झालेली दिसून येईल आणि तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमात भाग घेऊ लागाल.
#५: परीक्षेची भीती नाही
मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून परीक्षेचा एकत्र अभ्यास करतो. खरे तर मी इतका वेळ वाया घालवते त्यांच्याबरोबर मजा करण्यात, त्यांना त्रास देण्यात आणि त्यांच्यापेक्षा माझा अभ्यासदेखील कमी व्हायचा तरीसुद्धा माझा निकाल त्यांच्यापेक्षा अधिक बरा असायचा. आता मी माझ्या मैत्रिणींना गंभीरपणे अभ्यास करताना पाहाते तरी मला टेन्शन येत नाही. आता मी माझी तुलना त्यांच्याबरोबर करीत नाही. आता तर मला परीक्षा या परीक्षा म्हणून जाणवत नाहीत! – प्रियांका लाल
ध्यानामुळे परीक्षेचा धसका आणि भीती कमी होते. जीवन म्हणजे परीक्षा आणि निकाल यांच्यापेक्षा मोठे आहे ही जाणीव निर्माण होते. परीक्षा आणि निकाल म्हणजे जगाचा अंत नव्हे. तर मग काय झाले जर तुम्ही केवळ एक सर्वसामान्य विद्यार्थी आहात तर किंवा तुम्ही परीक्षेमध्ये एकदम चांगले गुण आणले नाहीत तर? दुसऱ्या कोणत्या कार्यामध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ठ असू शकता आणि ध्यान तुमच्यातील त्या अद्वितीय क्षमतेचा शोध घेण्यात आणि त्याचा विकास करण्यात मदत करते.
#६: निकालात सुधारणा
मला गोष्टींचे आकलन होण्यात समस्या होती. मी एखाद्या गोष्टीचे पाठांतर करायचे आणि पुढच्या क्षणी विसरून जायचे. ध्यानामुळे माझी स्मरणशक्ती एकदम अफलातून झाली आहे, आता मी कमी वेळात अधिक अभ्यास करू शकते आणि माझ्या परीक्षेचा निकालपण सुधारला आहे. एकदम गरुडझेप घेतल्याप्रमाणे! – हितांशी सचदेव
अंतिम, परंतु नक्कीच अतिशय महत्वाचे: ध्यानामुळे परीक्षेच्या निकालात सुधारणा होऊ शकते किंवा काही केसेसमध्ये तर निकाल एकदमच चांगला लागतो. तुम्हाला स्वतःवरच आश्चर्य वाटेल! विनासायास स्मरणशक्तीमध्ये आणि लक्ष केंद्रित होण्यामध्ये सुधारणा, शांतपूर्ण आणि आत्मविश्वासी मन असे असल्यावर परीक्षेला कोण घाबरतो?
खाली दिलेला ३० विद्यार्थ्यांचा सर्व्हेक्षण केलेल्या निकालाचा तक्ता पाहा:
श्री श्री रविशंकर जी यांच्या ज्ञान वाणी प्रेरणेतून