मी निरोगी आयुष्य जगत आहे कां? माझी जीवनशैली निरोगी आहे कां? मी माझ्या जीवनशैलीचा स्तर कसा उंचावू शकतो..? असा प्रश्न कधी ना कधी आपल्याला पडतोच, नाही कां? तुम्ही जगत असलेल्या जीवनावरून तुमची जीवनशैली ठरते.
असे काहीतरी नक्की आहे ज्याच्यामुळे तुमच्या निरोगी जीवनशैलीचा स्तर उंचावू शकतो आणि ते म्हणजे “ ध्यान." निरोगी जीवनशैलीचे काही पैलू आणि त्यावर ध्यान कसे लाभप्रद ठरू शकते ते पाहू..
#१ निरोगी आहार :
पाहूया:
माझ्या आहारात पोषक घटक किती असतात? नेहमी मी शरीराला गरजेपेक्षा कमी-जास्त आहार घेतो कां?
आहार हा ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. म्हणून योग्य वेळेला, योग्य पोषक घटक असणारा, योग्य प्रमाणात आहार घेणे यावर आपले दीर्घकालीन आरोग्य ठरत असते. बऱ्याच वेळा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण पोषक आहार घेणे टाळत असतो. खूप लोकांचा अनुभव असा आहे कि सातत्याने ध्यानाच्या सरावामुळे पोषक आहार घेणे बऱ्याच वेळा सोपे झाले आहे.
#२. आपल्या झोपेची गुणवत्ता आणि कालावधी :
पाहूया:
अनेक तासांच्या झोपेनंतरही मी आळसावालेला असतो कां ? दिवसभरात मी किती तास झोपतो ?
जेंव्हा तुम्ही थकलेले असता- पहिला विचार काय येतो- ‘एक छानपैकी डुलकी काढावी’. सात-आठ तासांच्या झोपे बरोबरच ती झोप किती गाढ होती, हे देखील तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
ध्यानाने तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढते. ती कशी? शांत झोप न लागण्याचे महत्त्वाचे कारण आहे, ताण-तणाव. सततच्या ध्यानामुळे ताण-तणाव निर्माण करणाऱ्या संप्रेरकांची घट होते. त्यामुळे मन शांत होऊन गाढ आणि आरामदायी झोप लागते
#३ कार्यमग्न रहा :
पाहूया:
दिवसभरात कितीतरी गोष्टी करायच्या असतात नां? साहजिकच त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्षमतेपेक्षा चांगल्या करू इच्छितो नां? काही दिवस आपण कार्यक्षम तर काही दिवस आळसावलेले असतो. सतत ध्यानाचा सराव करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे कि, “ध्यानामुळे ते दिवसभर कार्यक्षम आणि आनंदी रहातात.” जरी त्यांना थकून गळून गेल्यासारखे वाटले तरी काही मिनिटांच्या ध्यानामुळे ते पुन्हा ताजेतवाने होतात.

#४ स्वतःसोबत काही काळ रहा :
पाहूया :
तुमच्या ध्यानात आले आहे कां, जेंव्हा जेंव्हा तुम्ही शरीराला आणि मनाला विश्रांतीसाठी वेळ दिलेला असतो तुमची उत्पादकता वाढते. परंतु नेहमी आपण तक्रार करत असतो कि, ”खूप कामे आहेत, वेळ पुरात नाही”. होय नां. स्वतःसोबत रहाण्यासाठी एक उपाय म्हणजे “ ध्यान”. डोळे झाकून वीस मिनिटे ध्यानाला बसल्यामुळे मन शांत आणि स्थिर होते.
ध्यानाबरोबरच वाचन तसेच पाळीव प्राण्यांशी खेळणे अश्या आवडत्या छंदामुळे आपण ‘स्वतः बरोबर’ राहू शकतो. एक आनंदाची बातमी म्हणजे ध्यानामुळे तुम्ही कार्यक्षम बनता, तुमची हातातील कामे पटापट उरकतात आणि आपसूकच तुम्हाला विश्रांतीसाठी जादा वेळ मिळतो. फ्रांसिस्को म्हणतो, “सातत्याने काम करात राहिल्याने मी लवकरच दमून-कंटाळून जाईन, हे मला माहित आहे. परंतु कामासोबतच जेंव्हा मी ध्यान करतो तोच तो कंटाळवाणेपणा निघून जातो आणि मी माझे काम आनंदाने करू लागतो !”
#५ कार्यपूर्तीचा आनंद :
पाहू या:
पहा नां, आपण आपले काम केंव्हा आनंदाने करतो ? जर ते काम तुमच्या आवडीचे असेल तेंव्हाच. कारण जेंव्हा तुम्ही ते पूर्ण करता तेंव्हा समाधान मिळते. आणि ते समाधानच तुम्हाला आनंदी बनवते.
आता हे कसे प्राप्त करू शकतो? उत्तर आहे ‘ध्यान’. सोपे सूत्र आहे- ध्यानामुळे एकाग्रता वाढते, एकाग्रतेमुळे- कार्यक्षमता, कार्यक्षमतेमुळे-उत्पादकता , उत्पादक्तेमुळे- कार्यपुर्तीचा आनंद वृद्धिंगत होतो.
#६ सामाजिक आरोग्य :
पाहू या:
‘मानव हा सामाजिक प्राणी आहे’, हे आपणास माहित आहे नां. आपले सामाजिक आरोग्य देखील आपल्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘आपण समाजात कसे रहातो’ यावर ते अवलंबून आहे,ज्यांच्या बरोबर आपण आपली सुख-दु:खे वाटू शकतो अश्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असणे, चांगले असते ना ! जेंव्हा गरज भासते तेव्हा आपण समाजाकडूनच मदतीची अपेक्षा करतो, बरोबर?
चांगला समाज कसा मिळवू शकतो ? समाजप्रियता आणि मित्रत्त्वाचे संबंध असणे हे आपल्या स्वभावात आहे. परंतु यांच्या वृद्धीसाठी देखील प्रयत्न करावे लागतात. ध्यानामुळे इतरांना स्वीकारण्याची क्षमता वाढते. ध्यानामुळे सुसंवाद आणि अभिव्यक्त होण्याची क्षमता वाढते. या सर्वामुळे आपापसात बांधिलकी वाढते आणि चांगल्या नातेसंबंधांची जोपासना होते.
#७ आजारी पडण्याचे प्रमाण घटणे :
पाहू या:
ध्यानाच्या सरावामुळे आपली रोग-प्रतिकार शक्ती वाढून आजारी पडण्याच्या प्रमाण,शक्यता कमी होतात.तसेच ध्यानाच्या सरावामुळे आजारानंतर आरोग्याची पुनः प्राप्ति झपाट्याने होऊ
लागते.
ध्यानासाठी सूचना :
- आपण सर्वजण नैसर्गिकरीत्या निरोगी राहू इच्छितो, होय नां? वर उल्लेख केलेल्या घटकांवर चिंतन करत रहा.त्यामुळे, ध्यानामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांचा अनुभव मिळणेस मदत होईल.
- दिवसातून एकदा तरी ध्यान करणे गरजेचे आहे. ध्यान- तुमचे तुम्हीच सुरु करू शकता किंवा ध्यान तज्ञाकडून शिकून घेऊ शकता. ध्यानाचा गहन अनुभव प्राप्त होण्यासाठी तज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील.
- तुम्ही एक ध्यान-मित्र करू शकता ज्याच्याबरोबर तुम्ही ध्यान करू शकाल. ध्यान-मित्र केल्याने तुमचे ध्यान नियमित होईल.
श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञान चर्चेतून प्रेरित
लेखिका : दिव्या सचदेव
सहज समाधी ध्यान तज्ञ, भारती हरीश यांच्या सूचनांप्रमाणे