ध्यान आणि झोप: समान आणि तरीसुद्धा निराळे (sleeping problem solution in Marathi)

मी एकदमच थकलो आहे; मला बस्स थोडावेळ झोप पाहिजे. आपण असा विचार करणे नैसर्गिकच आहे, नाही का? मात्र असे काही आहे का जे आपल्याला गहन विश्रांती देऊन ताजेतवाने करेल? उर्जेचे चार स्रोत आहेत. त्यापैकी एक आहे झोप आणि दुसरे आहे ध्यान.

ध्यान आणि झोप हे काही प्रकारे समान आहेत आणि तरीसुद्धा एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत.

चला पाहू या कसे ते …

1

थेट उर्जेच्या उगमस्थानातूनच उर्जा मिळवूया

 

झोपेतून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा ध्यानाद्वारे मिळणारी उर्जा ही कितीतरी प्रमाणात अधिक असते. “ध्यान केल्याने तुम्ही आंतरिक स्रोतातून उर्जा निर्मिती करून, तुम्ही तुमच्या शरीराला एक विद्युतकेंद्र बनवू शकता,” असे श्री श्री रविशंकर म्हणतात.

2

गहन विश्रांती

 

ध्यान आणि झोप हे दोन्ही गहन विश्रांती देऊ करतात. परंतु ध्यानाद्वारे मिळणाऱ्या विश्रांतीचा दर्जा अधिक गहन आहे. “ध्यानामुळे तुम्हाला विश्रांती मिळते, अगदी गाढ झोपेपेक्षा अधिक गहन,” असे श्री श्री रविशंकर म्हणतात. २० मिनिटांचे ध्यान हे आठ तासांच्या चांगल्या झोपेच्या बरोबर आहे.

3

अमर्याद विश्रांती

 

जेव्हा आपण नेहमीपेक्षा अधिक झोपतो तेव्हा काय होते? आपल्याला आळस आणि जडपणा येतो. दर दिवसाला सहा-आठ तास झोपणे ही एक परिपूर्ण कालावधी आहे. झोप कमी किंवा जास्त मिळण्याने तणाव आणि असंतुलन निर्माण होते. परंतु ध्यानाला असे काहीही दुष्परिणाम नाहीत. तसेच आपल्याला गहन अनुभव मिळण्याकरिता दिवसभर ध्यान करीत बसण्याची आवश्यकता नाही. सामान्यतः दिवसातून दोनदा २० मिनिटांचे ध्यान हे पुरेसे आहे

4

खऱ्या अर्थाने झोपेस पूरक

 

ध्यान झोपेला पर्यायी नाही परंतु ध्यानामुळे झोपेची गुणवत्ता वाढते. झोप आणि ध्यान हे दोन्ही महत्वाचे आहेत. खरे तर ध्यान हे झोपेला पूरक आहे. दैनंदिन ध्यान करण्याने आपल्याला अधिक गहन आणि अधिक आरामदायी झोपेचा अनुभव येतो. जर तुम्ही रात्र रात्र झोपेशिवाय जागत काढत असाल तर नियमित ध्यानाच्या सरावाने अशा निद्रानाशाचा उपचार चांगल्याप्रकारे होऊ शकतो.

5

चयापचयाची क्रिया मंदावते

 

झोप आणि ध्यान या दोन्हीमध्ये चयापचयाची क्रिया मंद होते. चयापचयाची क्रिया मंदावल्यामुळे मन शांत होते.

6

सावध जागरुकता

 

जागृतावस्था, निद्रावस्था, स्वप्नावस्था आणि ध्यानस्थ स्थिती या चैतन्याच्या चार अवस्था आहेत. निद्रावास्थेमध्ये आपल्याला चांगली विश्रांती मिळते पण त्यात जागरुकता नसते. जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा आपल्याला ताजेतवाने वाटते परंतु आपण झोपले असताना काय झाले हे आपल्याला काहीच आठवत नाही. ध्यान मात्र जागरुकतेसह विश्रांत होणे आहे.

“जागृतावस्था आणि निद्रावस्था हे सूर्योदय आणि रात्र याप्रमाणे आहेत. आणि स्वप्नावस्था म्हणजे मधला संधिकाल आणि ध्यान हे अंतराळात ताऱ्यांमध्ये फेरफटका मारून येण्याप्रमाणे आहे, तिथे ना सूर्योदय, ना सूर्यास्त, काहीही नाही!”, असे श्री श्री रविशंकर म्हणतात.

7

तुमच्या मनाला मुक्त करा

 

झोप आणि ध्यान हे दोन्हीही आपल्याला ताजेतवाने करतात परंतु ध्यान हे मनावरचे गतकाळातील ठसे पुसून टाकते आणि आपल्याला मुक्त करते. ध्यानाच्या नियमित सरावामुळे आपण वर्षानुवर्षे आपल्या मनात साठवलेला भावनिक कचऱ्याला झाडून बाहेर फेकून देऊ शकतो आणि त्याने आपल्याला नवचैतन्याचा अनुभव येतो.

8

निवड स्वातंत्र्य

 

आपण झोपायचे का नाही याची निवड खरोखर करू शकत नाही; आपण तेव्हाच झोपू शकतो जेव्हा आपल्याला झोप येते, परंतु ध्यान करण्याची निवड कधीही आपल्याला पाहिजे तेव्हा करू शकतो. जरी सकाळच्या वेळी ध्यान केलेले चांगले तरीसुद्धा दिवसभरात कधीही ध्यान करता येते.

गहन विश्रांती, संपूर्ण जागरुकता आणि आंतरिक उर्जेच्या स्रोताला पकडीत आणणे हे सर्व आपण करू शकतो हे समजल्यावर आता विलंबाशिवाय ध्यान करण्याची ची निवड आपण करायला हवी.

श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानाच्या भाष्यांवरून प्रेरित

ध्यान हे झोपेला पर्यायी नाही. झोप आणि ध्यान या दोन्हींचे स्वतःचे वेगवेगळे फायदे आहेत. ध्यानाचा नियमित सराव केल्याने झोपेचा दर्जा सुधारतो.