आपल्यापैकी बर्याच जणांना “ध्यान”हा शब्द अपयशाची आणि पराभवाची भावना निर्माण करतो. बर्याचदा, जेव्हा मी ऐकतो की मी दररोज ध्यान करतो, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया “मी कधीच शांत बसू शकणार नाही”ते “मी एकदा प्रयत्न केला पण माझे मन खूपच वेगळे वाटले.” अश्या आहे. गुरूकडून एखादा मंत्र आणि प्रशिक्षण घेण्यापूर्वी, मलासुद्धा असे वाटले की मी डोळे ५ सेकंदांपेक्षा जास्त काळ बंद करून कधीही शांत बसू शकणार नाही. मी ध्यानावरची भरपूर पुस्तके वाचली आणि त्याबद्दल विचार करणे मला आवडले, परंतु जेव्हा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा मला अपयशी वाटले.
गुरूकडून शिकल्यानंतर मला समजले की मी ध्यान करण्यासाठी सक्षम आहे की नाही हा प्रश्नच नाहीये, तर योग्यरित्या ध्यान कसे करावे हे मला समजले आहे की नाही हा आहे. ध्यान करण्याच्या एव्हढ्या विविध पद्धती अस्तित्वात असताना आणि त्याबद्दलचे वेगवेगळे विचार असताना, ध्यान करण्याचे उत्तम तंत्र शोधून काढल्याने आणि आपण योग्यरित्या ध्यानधारणा करत असल्याचे समजल्याने खूप छान वाटू शकते.
ध्यान योग्य प्रकारे करण्याची ५ चिन्हे
1. मार्गदर्शित ध्यानामधील सूचना अनुसरणे
आपल्या लक्षात आले आहे का की ध्यानामधील काही सूचना आणि मार्गदर्शनांचे पालन केल्यावर ध्यानात खोलवर जाणे अधिक सोपे होते. बर्याच लोकांसाठी, सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मार्गदर्शित ध्यान. ज्याप्रमाणे रूळ एखाद्या रेल्वेगाडीला दिशा दाखवितात, त्याचप्रमाणे मार्गदर्शित सूचना असलेले ध्यान उच्च प्रतीच्या ध्यानाचा अनुभव देतात.
2. ध्यानाकडून कोणत्याही अपेक्षा न करणे
गाडी चालवताना तुम्ही अनुभवले असेल की काही वेळा तुम्हाला सुंदर देखावे व रस्ता स्पष्ट दिसतो पण इतर वेळी तुम्ही रहदारीमध्ये अडकलेले असता. तरीही, वाटेत काय होते, रस्ता कसाही असला तरीपण आपण इच्छित स्थळी पोचता. त्याचप्रमाणे, आपले मन विचारांमध्ये व्यस्त असो किंवा ध्यानाच्या प्रक्रियेदरम्यान शांत आनंदाच्या स्थितीत असो. काहीही असले तरी, ध्यान त्याचे कार्य करते, ज्यामुळे तुमची विश्रांती, मनाची शुध्दी आणि चैतन्य विस्तारते.
ध्यान करताना मन जेव्हा अशांत असते, आपण त्यावेळचे ध्यान कसे झाले याबाबत विचार करत बसतो. तथापि, ध्यान चांगले झाले का वाईट याची निवड करत बसण्यापेक्षा हे सर्व अनुभव चिंतामुक्त होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत हे समजून घ्या. तुम्हाला विखुरलेले वाटते का अतिसुखी हे सर्व फायदेशीर अनुभवाचा एक भाग आहेत.
3. दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभव येणे
बरेच जण ध्यान करताना डोळे मिटून काय अनुभव येतात याकडे लक्ष देतात. पण जर तुम्हाला दिवसभरात अधिक शांतता, विश्रांती, वैचारिक स्पष्टता आणि इतरांच्या गरजांबद्दल संवेदनशीलता आढळत असेल तर समजा की तुमचे ध्यान व्यवस्थित आणि अगदी बरोबर होत आहे. आणि जर तुम्हाला दिवसभरात आनंदी आणि एकदम प्रसन्न वाटत असेल तर नक्कीच समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहेत.
कधीकधी तुमच्यामधील बदल खूप सूक्ष्म असतात, जे तुम्हाला दिवसभरात जाणवणारही नाहीत. पण समजून घ्या की तुम्ही योग्य ध्यान करीत असाल. तरीही तुमच्या मनात शंका असेल तर तुमच्या शिक्षकाला विचारा.
4. इच्छापासून अलिप्तता किंवा मुक्तता
तुम्ही कधीकधी आपल्या इच्छेत आणि काळजीमध्ये अडकलेले आढळता का? प्रत्येकजण वासनांचा आणि इच्छांचा अनुभव घेतो. ध्यानाचा उद्देश सर्व इच्छा नष्ट करणे नाही. तथापि, ध्यानाचा दीर्घकालीन सराव तुम्हाला वासनांपासून अलिप्तपणाची भावना विकसित करण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे ध्यानामुळे इच्छा तुम्हाला नियंत्रित करण्याऐवजी तुम्ही इच्छांना नियंत्रित करत असल्याचे जाणवू लागेल.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मते, “तुम्हाला इच्छा असतील तर हरकत नाही. पण तुम्ही म्हणजे फक्त वासना किंवा इच्छाच, असे होऊ देऊ नका. ‘मला काही नको आहे, मला काही करायचे नाही, मी काही नाही’ या वृत्तीने ध्यान होते."
5. ध्यान करण्यासाठी आरामदायी आसन
ध्यान नेहमी बसूनच करावे. आपण सोफा, खुर्ची, पलंग किंवा जमिनीवर बसा. पण ध्यान करतेवेळी आपण आडवे झुकत नाही ना हे सुनिश्चित करा. आडव्या स्थितीत असताना शरीराला झोप येते. ध्यान करतेवेळी आपला पाठीचा कणा हा नेहमी सरळ असावा. पण सखोल ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी आपले आसन आरामदायक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. सरळ बसल्यामुळे शरीरात वेदनांनी विचलित झाल्यासारखे वाटत असल्यास, शारीरिक तणाव सोडण्यासाठी आणि सामर्थ्य आणि लवचिकता शरीरात विकसित होण्यासाठी योग आसनांचा अभ्यास करावा. योगासने केल्याने ध्यान करतेवेळी आसनस्थ स्थिती आरामदायी होते. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, "ध्यान करणे ही काही करण्याची नाही तर सोडून देण्याची कला आहे."
वरील यादीत सांगितल्याप्रमाणे कोणताही एक चांगला किंवा वाईट अनुभव ध्यानाचा परिपूर्ण किंवा अपयशी सराव दर्शवत नाही. तथापि, आपण योग्यरित्या शिकत आहात याची खात्री करण्यासाठी, आपल्या जवळच्या सहज समाधी ध्यानाच्या शिक्षकाशी संपर्क साधा. आपण केवळ योग्य तंत्र शिकणार नाही तर आपल्याकडे उद्भवणारी कोणतीही चिंता किंवा प्रश्न सोडविण्यासाठी एक समर्थ प्रणाली आपल्याकडे असेल.