ध्यानधारणेवर सर्वसामान्य गैरसमजांची यादी खाली दिली आहे. आशा बाळगूया की तुमचा गोंधळ दूर होईल.
#१ ध्यानधारणा म्हणजेच एकाग्रता
ध्यान म्हणजे खरं तर एकाग्रतेच्या अगदी विरुद्ध गोष्टं आहे. एकाग्रता ही ध्यानामुळे मिळणारा लाभ आहे. एकाग्रता करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो तर ध्यान हे मनाची संपूर्ण विश्रांती आहे. ध्यान म्हणजे सोडून देणे/ शिथिल सोडणे आणि जेव्हा हे होते तेव्हा तुम्ही खोल विश्रांतीत जाता. जेव्हा मन आरामशीर असते, तेव्हा आपण जास्त एकाग्र होतो.
#२ ध्यानधारणा, एक धार्मिक विधी आहे
योगा आणि ध्यान ह्या प्राचीन रीती आहेत ज्या सर्व धर्माच्या पलीकडे आहेत. ध्यान करण्यासाठी, कोणत्याही धर्माची आडकाठी नाही. खरे म्हणजे, ध्यानामध्ये सर्व धर्म, देश आणि मान्यतांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. जसा सूर्य सर्वांसाठी तळपतो, वारा सर्वांसाठी वाहतो तसेच ध्यान सर्वाना लाभदायक आहे. " आम्ही विविध पार्श्वभूमीच्या, धर्माच्या आणि सांस्कृतिक परंपरा असणार्या् लोकंना एकत्र येण्यास आणि ध्यानाचा उत्सव करण्यास प्रोत्साहन देतो" असे श्री श्री रविशंकर म्हणतात.
#३ ध्यानासाठी पद्मासनात बसावं लागतं
पातंजली योगसूत्रे ही मनाचे स्वरूप सांगणारी कदाचित सर्वात शास्त्रोक्त आणि तपशीलवार अभ्यास केलेली मानव निर्मिती आहे. “स्थिरसुखामासनम”, योगसूत्र ज्यामध्ये पातंजली स्पष्ट करतात की ध्यान करताना सुखदायक / आरामशीर आणि स्थिर असणे महत्वाचे आहे. ज्यामुळे आपल्याला ध्यानामध्ये सखोल अनुभव येण्यास मदत करते. तुम्ही सुखासनात, खुर्चीवर, सोफ्यावर बसू शकता. पण जेव्हा तुम्ही ध्यान करण्यास सुरुवात करता तेव्हा शरीराराची ढब/ ठेवण अशी असली पाहिजे की ज्यात तुमचा पाठीचा कणा ताठ, मान आणि खांदे शिथिल असतील.
#४ ध्यान धारणा हे वृद्ध लोकांसाठी आहे
ध्यान हे वैश्विक आहे. आणि ते सर्व वयोगटातील लोकांच्या जीवनातील मूल्ये वाढवते. ध्यान हे तुम्ही वयाच्या आठव्या किंवा नवव्या वर्षापासून सुरु करू शकता. स्नान जसे शरीराला स्वच्छ ठेवते तसे ध्यान मनाला स्वच्छ ठेवते.
“ध्यानाचा सराव केल्याने मी पूर्वीसारखी रागवत नाही”, शाळेत जाणारी सांड्रा सांगते. “ काही मिनिटांच्या ध्यानामुळे मी दिवसभर शांत असतो”, करण, १९ वर्षाचा ध्यान करणारा तरुण म्हणतो. “ ध्यान मला उमेद आणि उत्साह, सकारात्मक उर्जा पसरवण्यास मदत करते”, एक २५ वर्षीय व्यक्ती सांगते.
#५ ध्यान हे स्वतःला संमोहन करण्यासारखे आहे.
ध्यान हे संमोहानावर उतारा ठरू शकते. संमोहानाच्या प्रभावाखाली असलेल्या मनुष्याला आपण कोठे आहोत आणि कशामधून जात आहोत याची जाणीव नसते. ध्यान हे प्रत्येक क्षणाची पूर्ण जाणीव देणारे आहे. संमोहन, आपल्या मनातील धारणांनाच धृढ करते. ध्यान आपल्याला या धारणांपासून मुक्त करते जेणे करून आपली चेतना ताजी व स्पष्ट राहते. संमोहानात आपली चयापचयाची गती वाढवते, तर ध्यानत ती कमी होते. “जे कोणी प्राणायाम आणि ध्यान नियमितपणे करतात त्यांना सहजपणे कोणी संमोहित करू शकत नाही”. श्री श्री रविशंकर म्हणतात.
#६ ध्यान म्हणजे विचारांचे नियंत्रण
विचार आपल्या संमतीने येत नाहीत. ते येत असतानाच आपल्याला त्यांची जाणीव होते ! विचार हे आकाशातील ढगांप्रमाणे असतात. ते आपल्या मर्जीने येतात व जातात. विचारांवर नियंत्रण ठेवण्यास खूप कष्ट पडतात आणि मन शांत होण्यासाठी गुपित म्हणजे ते तसे विनासायास होऊ देणे. ध्यानामध्ये आपण चांगल्या विचारांची इच्छा ठेवत नाही किंवा वाईट विचारांचा विरोध करत नाही. आपण फक्त साक्षीदार होतो आणि कालांतराने विचारांच्या पलीकडे जातो व खोल नि:शब्द / अव्यक्त जागेत जातो.
#७ ध्यान हे समस्यांपासून लांब पळण्यासाठी करतात
उलटपक्षी, ध्यान तुमच्या अवघड प्रश्नांना हसत तोंड देण्यास सक्षम बनवते. योग आणि ध्यानामुळे आपल्यात कोणतीही परिस्थिती हसत-हसत आणि विधायक पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य विकसित होते. आपल्यात परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची क्षमता येते आणि भूतकाळाचे चिंतन न करता व भविष्यकाळाची चिंता न करता सजगतापूर्वक कृती करण्यास मदत होते. ध्यानमुळे आंतरिक शक्ती व स्वतःचा स्वाभिमान जागृत होतो. ते पावसाळ्यातील छत्री प्रमाणे काम करते. आव्हाने आलीत तरीही आपण विश्वासाने पुढे जाऊ शकतो.
#८ गहन अनुभव येण्यासाठी तासं-तास ध्यान करावे लागते
ध्यानात गहन अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तासं-तास ध्यानात बसण्याची गरज नाही. तुमचा अस्तित्वातील खोल अंतस्थ आणि तुमचे स्त्रोत यांना सांधण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी फक्त २० मिनिटांचे सहज समाधी ध्यान तुम्हाला या सखोल अंतस्थ मार्गाकडे नेईल. जसे तुम्ही दररोज ध्यानाचा सराव कराल, तशी तुमची ध्यानाची गुणवत्ता हळू हळू सुधारेल.
#९ जर तुम्ही ध्यान कराल, तर तुम्ही संन्यासी व्हाल
जर तुम्हाला ध्यान किंवा अध्यात्मिक मार्गावर प्रगती करयची असेल तर तुम्हाला भौतिक आयुष्याचा त्याग करण्याची गरज नाही. खरं म्हणजे, तुम्ही जेव्हा ध्यान करण्यास सुरुवात करता तेव्हा तुमच्या आनंदाची गुणवत्ता सुधारते. शिथिल व शांततापूर्ण / नि:शब्द मनामुळे, तुम्ही सुखाने जगू शकता आणि तुमच्या कुटुंबातील व आसपासच्या लोकांना पण आनंदी ठेवू शकता.
#१० तुम्ही ठराविक वेळेला व ठराविक दिशेलाच ध्यान करावं लागतं
ध्यानासाठी कोठली ही वेळ अनुकूल आहे आणि सर्व दिशा चांगल्या आहे. फक्त एकच गोष्ट लक्ष्यात ठेवावी कि तुमचे पोट हे संपूर्ण भरलेले नसावे, नाहीतर तुम्ही ध्यानाच्या बदली डुलकी घ्याल. तरीपण सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी ध्यानधारणा करणे उत्तम, ज्यामुळे आपल्याला दिवसभर शांत आणि उत्साहपूर्ण वाटते.
आम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ध्यान करण्याचे फायदे नक्कीच लक्षात आले असतील. आमच्या बरोबर ध्यान करा – सहभागी व्हा ध्यान भारत मध्ये.
प्रेरित ~ श्री श्री रविशंकर यांची ज्ञानगंगा
ग्राफिक्स – निलादरी दत्ता