नि:शब्दता /शांतता /शांती:
तुमचे मन तुम्हाला अव्यक्त आणि अंतस्थ शांततेच्या अनुभवापासून दूर ठेवत असते जे इतरत्र भटकत असते.काही काळापुरती शांतता ठेवली तर त्यामुळे अखंडित भ्रमण करणाऱ्या मनाला विश्रांती मिळेल.जेंव्हा तुमचे मन शांत-निरव असते तेंव्हा तुम्ही गहरी विश्रांती,शांत चित्त आणि नि:संदिग्धता अनुभवता.हे तुमचे कौशल्याचे गुणसंवर्धन चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यास मदत करते.म्हणून थोडा वेळ नि:शब्दतेचे निरीक्षण करण्यासाठी काढा,कारण हे मन साफ करण्याचे एक साधन आहे.शांती अनुभवल्यावर तुमचे मन अधिक सुस्पष्ट होते.तुम्ही काय बोलत आहात ह्याबद्धल जास्त सजगता निर्माण होते आणि तुमचे आंतरिक ज्ञान,अंत:प्रेरणा आणखी सशक्त बनते.
उपवास : नवरात्री मध्ये उपवासाचे महत्व:
नवरात्र हा वर्षातील असा कालखंड आहे जो रंग,परंपरा,गायन आणि नृत्यांनी समृद्ध असतो.जे अध्यात्मिकतेचा शोध घेत आहेत त्यांना ही वेळ धार्मिक दृष्टया पवित्र आणि पूजनीय आहे.हि अशी वेळ आहे की आपण स्वत:ला जीवनातील इंद्रिय संवेदना आणि भौतिक सुखांपासून दूर नेऊन अध्यात्मिक प्रक्रियांमध्ये स्थिर करून अंत:सामर्थ्याचा निर्भेळ आनंद,संतोष आणि अगणित उत्साह जीवनात आणू शकतो.आणि हे सर्व आपल्या बाह्य वर्तणुकीतून सहजतेने व्यक्त होऊ शकते,हे होईल जेंव्हा आपल्यामध्ये सत्व गुण वाढेल आणि उपवास हा एक सात्विकता वाढवण्याचा पर्याय आहे.
हे जग पांच तत्वांनी बनलेले आहे.आणि ह्या पांच तत्वांचे तीन स्वभावगुण आहेत.
तीन गुण:
ईश्वरी शक्ती ही सृजनतेचे,जगाच्या निर्मितेचे प्रतिक आहे.आणि हि संपूर्ण सृजनता पांच मूलतत्वांनी बनली आहे.ह्या मूलतत्वामध्ये तीन स्वभावगुण आहेत.ते असे:
- सत्व
- रजस
- तमस
सर्व सृष्टी ह्या तीन गुणांनी संचालित आहे.ते आपल्या ज्ञात स्थितीशी सुद्धा संबंधित आहेत, जसे जगणे, स्वप्न बघणे आणि झोपणे.
सत्व –
आत्ता व्यापकरित्या समजून घेऊ की सत्व म्हणजे काय,रजस म्हणजे काय आणि तमस म्हणजे काय ?
सत्व म्हणजे अशी गुणवत्ता जी स्पष्टता,ज्ञान आणि योग्य कृती करण्यासाठी जबाबदार आहे.जेव्हा सत्व सभोवतालच्या पर्यावरणात आणि आपल्या शरीरात वर्चस्व करत असते तेंव्हा आपण स्वत:ला हलके-फुलके,आनंदी,आल्हाददायक,दक्ष आणि सजग अनुभवतो.आपली आकलनशक्ती स्पष्ट असते.
रजस –
रजस हा असा गुण आपल्या शरीर आणि मनाच्या क्रियाशीलतेला जबाबदार आहे.आपण आपले ‘कर्म’ काही प्रमाणात रजस शिवाय करू शकत नाही. रजसमध्ये आपले स्वतःचे असे काही गुण आहेत जेंव्हा ते उरलेल्या दोन गुणांच्या बरोबर समतोल असतात.परंतु जेंव्हा रजस वाढतो किंवा त्याचे वर्चस्व वाढते तेंव्हा आपल्यामध्ये खूप विचार येतात,आपल्याला अस्वस्थ वाटते,आपल्यामध्ये खूप इच्छा निर्माण होतात आणि खूप गोष्टी कराव्याश्या वाटतात. तसेच आपण खूप आनंदी आणि उत्सुक असतो किंवा अतिशय ऊर्जाहीन वाटते.हा रजो गुणांचा परिणाम आहे.
तमस –
तमस हा असा गुण आपल्या शरीरातील व मनातील संपूर्ण विश्रांतीच्या अवस्थेला जबाबदार आहे.तमसच्या एका विशिष्ट पातळी शिवाय कोणीही ‘झोपू’ शकत नाही.परंतु जेंव्हा तमसचा समतोलपणा नसतो तेव्हा भ्रम,चुकीचे समज, निरसता इत्यादी अनुभव येतात.
सतत ह्या तीन गुणांपैकी एका गुणाचा आपल्या जीवनात अंमल चालू असतो.जेंव्हा सत्वाचा अंमल चालू असतो तेंव्हा रजस आणि तमस सुप्त असतात आणि त्यांचा परिणाम किमान असतो.जेंव्हा रजसचा अंमल चालू असतो तेंव्हा सत्व आणि तमस सुप्त असतात.जेंव्हा तमसचे वर्चस्व असते तेंव्हा सत्व आणि रजस सुप्त असतात.त्यांचा परिणाम फार कमी असतो.अशी या विश्वाची आणि जीवनाची संपूर्ण कार्यप्रणाली आहे.
हे तीन गुण आपल्या अन्नात सुद्धा उपस्थित असतात.आपले अन्न हे सात्विक,राजसिक किंवा तामसिक असते.आपले मन आणि बुद्धी सुद्धा सात्विक,राजसिक आणि तामसिक स्वभावाची असते.आपली वृत्ती आणि क्रिया ह्यादेखील सात्विक,राजसिक आणि तामसिक असतात.
हे तीनही गुण एका पाठोपाठ एक अश्या कालखंडाने येतात.हे तीन गुण वेळोवेळी अनुभवणे स्वाभाविक आहे.काही वेळेस तुम्ही आनंदी आणि सजग असता (सत्व).काही वेळेस तुम्ही अस्वस्थ,दु:खी,असंख्य गोष्टींचा बोजा असलेले आणि अनेक इच्छा असलेले अनुभवता (रजस).तसेच काही वेळेस तुम्ही निरस, निवांत आणि आळशी असता (तमस).
जरी हे तीन गुण आपण वेळोवेळी अनुभवत असतो तरी आपण सत्वगुणाचा स्तर निरोगी आणि संतुलित जीवनशैली ठेवून उच्च राहू शकतो.अध्यात्मिक प्रक्रिया जसे ध्यान,जप इत्यादी सुद्धा आपली सत्वाची पातळी उच्च ठेवायला मदत करतात.जितके सत्व उच्च,अधिक तेव्हढा आनंद आणि सजगता जास्त अनुभवास येते.
नवरात्री आणि तीन गुण:
हे आपले नैसर्गिक गुण आहेत जे दैवी जाणीवेने शुद्ध करता येतात.देवी ही त्रिगुणात्मक आहे–जी तीन गुणांची स्वामीनी आहे, जी गुणांची संचयिनी आहे.
नवरात्री मध्ये, प्रथम तीन दिवस हे तमस ह्या गुणविशेषासाठी मानले जातात.आणि देवी ही दुर्गेच्या स्वरुपात सन्मानित होते.देवी दुर्गेची उपासना प्रथम तीन दिवस केल्याने तामसिक प्रवृतींमध्ये समतोल साधता येतो.
नंतरचे तीन दिवस हे रजस ह्या गुणविशेषचे आहेत.या वेळी देवी ही लक्ष्मीच्या स्वरुपात उपासली जाते.देवी लक्ष्मीची उपासना केल्याने राजसिक प्रवृतींचा समतोल साधता येतो.
नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस हे सत्व गुणविशेषाचे आहेत.जेथे देवी सरस्वतीच्या रुपात उपासली जाते.देवी सरस्वतीच्या उपासनेने आपल्यातील सत्व वाढते.नवरात्रीमध्ये आपली चेतना तमस,रजस ह्या माध्यमातून जाऊन शेवटच्या तीन दिवसात सत्व गुणात बहरते.
तिन्ही गुणांवर उपासना आणि अध्यात्मिक प्रक्रियांनी विजय मिळवणे आणि अंर्तमन केंद्रीत करणे हा नवरात्रीचा उत्सव साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.
- सत्व (सकारात्मकता आणणारा गुण)
- - रजस (क्रियाशीलता आणणारा गुण)
- - तमस (सुस्ती/ जडत्व आणणारा गुण)
सर्व अध्यात्मिक प्रक्रिया उदा.ध्यान,जप,उपवास,मौन इत्यादीने आपली सत्वाची पातळी उंचावते.जेंव्हा सत्व उंचावते तेंव्हा जीवनातील ज्ञान,सजगता,सृजनशीलता आणि आनंद वाढतो,कारण हे सर्व गुण सत्वाबरोबर येतात.म्हणून उपवास,जप,ध्यान इत्यादी करणे हे महत्वाचे आहे.ते जीवनातील गुणवत्ता उंचावून अधिक आनंद आणि समाधान देतात.उपवास केल्यामुळे शरीरातील सत्वाची पातळी आणखी उंचावते कारण आपली शरीर प्रणाली शुद्ध होते जिच्यावर आपण बरेच वेळा जास्त अन्न खाल्यामुळे ताण दिलेला असतो.उपवासासह थोड्या थोड्या अंतराने अन्न घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरातील सत्वाचे प्रमाण वाढते.
जे आपण चांगले पचवू शकतो,सहजासहजी झोपी जाऊ शकतो,सकाळी उठताना किंवा ध्यानाला बसताना जड वाटत नाही असे योग्य प्रमाणातील ताजे अन्न थोड्याश्या मसाल्याबरोबर खाणे म्हणजेच सात्विक अन्न.
उपवासाचे फायदे –
आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय उपचार पद्धतींमध्ये उपवास हे एक पचनाची आग आणि भूक पुन्हा प्रज्वलित करणारे एक प्रभावी साधन मानले जाते.सर्वसाधारणपणे आपण सर्वजण चांगली भूक लागण्याची वाट पहात नाही.जेंव्हा शरीर अन्न पचविण्यास तयार असते तेंव्हा ते भुकेच्या माध्यमातून दर्शवते.भूक लागण्याच्या आधी खाल्ल्यामुळे आपल्या पचन संस्थेवर ताण येऊन ती दुर्बल बनते आणि रोग प्रतिकारशक्ती कमी होते.उपवासामुळे आपली पचनक्षमता वाढते आणि ही आग आपल्यामधील सुस्ती आणि निरसता,जडत्व जास्त खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेले असते ते कमी करते.म्हणून उपवास केल्यानंतर आपल्याला टवटवीत आणि हलके वाटते कारण शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत आणि ताज्यातवान्या होतात.उपवास हे शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम उपचार आहे.
उपवासाचे फायदे फक्त शरीरिक पातळीवरच होतनसून त्यांचे सकारात्मक परिणाम आपल्या मनावर आणि भावनांवर देखील होतात.शरीर हे मनाशी जोडलेले आहे आणि मन भावनांशी.जेंव्हा शरीर उपवासाच्या माध्यमातून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध,शांत,निर्मळ आणि शांत होते.
उपवास-
शरीर शुद्ध करण्यासाठी केला जातो.विशिष्ट प्रकारच्या अन्नाचा विशिष्ट परिणाम शरीरावर होतो तसेच आपण सेवन केलेल्या अन्नाच्या प्रमाणाचा परिणाम सुद्धा शरीरावर होत असतो. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारचे अन्न ग्रहण करणे होय.
शरीर आणि मन हे दोन्ही जोडलेले आहे.म्हणून जेंव्हा शरीर उपवास करून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध होते. आणि निर्मळ मन हे शांत आणि स्थिर असते.म्हणून या नवरात्रीमध्ये थोडी फळे व पाणी किंवा अल्प प्रमाणात,पचायला हलके अन्न खाऊन उपवास करून शरीराला हलके ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्वांचा मनावर कसा परिणाम होतो.
ध्यान –
ध्यान तुम्हाला खोल,स्वत:च्या अंतर्मनाकडे आणि मनाच्या पलीकडे घेऊन जाते.हा तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे,सत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. म्हणून नवरात्रीमध्ये दररोज ध्यान करा.
ध्यानामुळे तुमचे शरीर सामर्थ्यवान-स्वस्थ,मन शुद्ध आणि भावना मृदू,सौम्य आणि सकारात्मक होतात.तुमची अंत:प्रेरणा वाढते,तुमच्यातील ऊर्जा लहरी आणि सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढते.जर तुम्ही एकत्र येऊन समूहामध्ये ध्यान केलेत तर तो यज्ञ होतो.जेंव्हा एकत्र समुहामध्ये ध्यान केले जाते तेंव्हा त्याचे फायदे जास्त अनुभवास येतात.कारण एकत्रित ध्यानात तुमच्या ऊर्जेचा स्तर त्वरित उंचावतो.
जप करणे –
मंत्र हे ऊर्जेने युक्त असतात.सर्व शब्दांशी शक्ती,ऊर्जा संलग्न असते.जर तुमचा कोणी एखाद्या अप्रिय,कटू शब्दाने अपमान केला तर त्याचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो.आणि जर कोणी तुमची प्रशंसा,स्तुती केली,तुम्हाला सुंदर किंवा दयाळू म्हटले तर तुमच्यात काहीतरी मानसिक उन्नती झाल्यासारखे वाटते.
मंत्र ह्या अतिशय प्राचीन ध्वनीलहरी आहेत.त्यांच्या बरोबर त्या सखोल आणि परिवर्तन करणारी उर्जा घेवून येतात. आणि पूर्वापार,हजारो वर्षांपासून तेच मंत्र म्हटले जात असल्यामुळे त्यांचात अतिशय शक्ती आहे.
आपल्या रोजच्या जीवनात,आपण वेगवेगळ्या क्रियांमध्ये अडकलेले असतो.शिवाय येथे सतत आपल्या मनात विविध प्रकारचे विचार सुरु असतात-जसे झगडणे,निर्णय घेणे इत्यादी.नवरात्र हि अशी एकच वेळ आहे की ज्यावेळी आपण ह्या सर्व प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्या मूळ स्त्रोत्राशी एक होऊ शकतो.
आपला अभिप्राय येथे कळवा: webteam.india@artofliving.org