नियमित ध्यान करणाऱ्या आपल्या मित्रासाठी भेटवस्तू देण्याच्या कल्पना

तुम्हाला नियमित ध्यान करणाऱ्या तुमच्या मित्रासाठी एखादी भेट द्यायची आहे आणि भेटवस्तू काय द्यावी हे सुचत नाहीये का? येथे दिलेल्या काही सूचना तुम्हाला मदत करू शकतील. ह्या वस्तू खूप स्वस्त आहेत आणि ध्यानाविषयीची बांधिलकीसुद्धा कायम ठेवतात. 

बर्‍याचदा आपण देत असलेल्या किंवा आपणास मिळालेल्या भेटवस्तू ह्या प्राप्तकर्त्यास विशेषतः महत्त्वपूर्ण किंवा उपयुक्त नसतात. परंतु ध्यानाशी निगडीत काळजीपूर्वक निवडलेल्या भेटवस्तू प्राप्तकर्ता आणि देणारा दोघांसाठीही बर्‍याच काळापर्यंत विशेष बनू शकतात. म्हणून काळजीपूर्वक विचार करून अशी भेटवस्तू निवडा जिच्यामधून चिरस्थायी आनंद मिळेल.

भेटवस्तू १: ध्यानाची उशी किंवा तक्क्या 

आपल्यासाठी येथे एक टीप आहे: जेव्हा आपण मित्रासाठी खरेदी करता तेव्हा नेहमी स्वत:ला त्यांच्या जागी ठेवा. आपण जर त्यांच्या जागी असतो तर आपल्याला काय आवडले असते? ध्यान करण्यासाठी आरामदायक बसणे  परंतु पाठ ताठ ठेवणे फार महत्वाचे आहे आणि मऊ उशीचा आधार असल्यास पाठ ताठ राहू शकते. ही भेट तुमच्या बजेटमध्ये नक्कीच आहे. ही भेट लवकर खराब होत नाही, कोठेही घेऊन जाणे सोपे आहे आणि दीर्घकालीन फायदेशीर आहे.

ही भेट अधिक आकर्षक बनविण्यासाठी, आपण आपल्या मित्राच्या पसंतीची, खुर्चीचा रंग किंवा घराच्या सजावटीशी चांगली जुळेल अशा रंगसंगतीची उशी निवडू शकता. 

भेटवस्तू २: ध्यानाबद्दलची पुस्तके 

कोणत्याही ध्यानधारकास त्याच्या गुरुचे सुंदर शब्द ऐकणे नेहमीच प्रेरणादायक असते, विशेषत: जेव्हा ते गुरु श्री श्री रविशंकर (आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक) असतात. त्यांनी दिलेली अनेक प्रवचने पुस्तक किंवा व्हिडिओ स्वरूपात आहेत ज्यांची आपण निवड करू शकता. आम्ही विशेषतः तीन डीव्हीडींच्या मालिकेची शिफारस करतो— What is Meditation?, Dispassion and Practice, and Higher States of Consciousness. अशी अनेक पुस्तके आणि डीव्हीडी आहेत. उपलब्ध पुस्तकांमध्ये The Space Within चा समावेश आहे. डीव्हीडीमध्ये पतंजलीच्या योगसूत्रांवर श्री श्रींची अनोखी भाष्ये आहे. या व्यतिरिक्त आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे शॉपवर अजून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके आणि डीव्हीडी निवडू शकता. 

आपण आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे ऋषीमुख नावाच्या मासिकाचे सदस्यत्व विचारात घेऊ शकता. ऋषीमुख मासिकामध्ये ध्यान आणि अध्यात्मिक मार्ग, श्री श्रींचे प्रवचन, योगाच्या सर्व बाबींचा सराव करण्याच्या टिप्स, अधिक परिपूर्ण आणि उत्क्रांतीशील जीवनशैली, पाककृती आणि इतर बरेच काही याबद्दल अनेक आकर्षक लेख असतात. आपण ऋषीमुख मासिकाचे ऑनलाइन सदस्यत्व घेऊ शकता आणि मासिक ऑनलाइन वाचू शकता. किंवा टपालाद्वारे मागवू शकता. 

भेटवस्तू ३: ध्यानाची चटई

ध्यानाची चटई ही वापरण्यास अत्यंत सुलभ आणि सोयीची असून मित्राला भेट देण्याचा आणखी एक आनंददायक पर्याय आहे.

आपल्या सर्वांना माहितच आहे की योगासने ध्यान अधिक खोल आणि गहन करतात. ही बहुउद्देशीय चटई योग आणि ध्यान या दोहोंसाठी वापरली जाऊ शकते. या योग चटईसाठी आपण एक आवरण किंवा वेष्टणदेखील देऊ शकता ज्यामुळे ही चटई स्वच्छ आणि सुव्यवस्थित राहील. या भेटीद्वारे  आपण आपल्या मित्राला लवकरच शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक निरोगी पहाल. 

भेटवस्तू ४: सहज समाधी कोर्स

जर आपल्या मित्राने हा कोर्स केला नसेल, तर त्यांना ह्या कोर्सला पाठविणे ही सर्वात मोठी भेट आहे. आर्ट ऑफ मेडिटेशन कोर्स (पारंपारिकपणे सहज समाधी मेडीटेशन कोर्स म्हणून ओळखला जातो) सखोल आंतरिक परिवर्तन आणि जाणीवेच्या उच्च अवस्थेचे एक अद्भुत प्रवेशद्वार आहे. ह्या सहज समाधी कोर्समध्ये सहभागी शिक्षक एक अद्वितीय मंत्र देतात आणि त्याच्या वापरासाठी सोपी प्रक्रिया सांगतात. जरी हे तंत्र पूर्णपणे सहज असले तरी ते सूक्ष्म आणि तरल देखील आहे. पुस्तक किंवा इंटरनेटवरून तेदेता येत नाही.

हा कोर्स केल्याने आपल्या मित्राला ध्यानधारकांच्या नेटवर्कशी देखील जोडले जाईल आणि तो सामूहिक चिंतनांचा आनंद घेऊ शकेल, जे केवळ एकटे ध्यान करण्यापेक्षा बरेच सामर्थ्यशाली आहेत. तुमचा मित्र मनाच्या सहजतेसाठीच्या या अप्रतिम भेटीसाठी तुमचा अनंतकाळ कृतज्ञ राहील.

जर आपण हा कोर्स केला नसेल तर आपल्या मित्राबरोबर करू शकता. किंवा आपण जर आधीच हा कोर्स केला असेल तर पुन्हा करू शकता. भारतात आपण हा कोर्स विनामूल्य पुन्हा करू शकता. भारताबाहेर नाममात्र फीमध्ये आपण हा कोर्स पुन्हा करू शकता, जेणेकरून आपण आपल्या मित्राच्या अनुभवाचे साक्षीदार व्हाल. त्याचबरोबर तुमचा स्वतःचा तंत्राचा सराव होईल. एक दिवस, तुमचा मित्र तुमचे मनापासून आभार मानेल. 

भेटवस्तू ५: ध्यानासाठी शाल 

मन जेव्हा ध्यानात प्रवेश करते, तेव्हा शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीची किंवा काश्मिरी एखादी उबदार शाल कोणाला आवडणार नाही? जरी तुमच्या मित्राकडे एखादी शाल असेल तरी अजून एक शाल मिळाली तर तिचे नेहमीच कौतुक असते. बर्‍याच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दुकानांमधून तुम्ही ही घेऊ शकता किंवा ऑनलाइन मागवू शकता.

भेटवस्तू ६: मार्गदर्शक ध्यानाची CD 

जेव्हा follow-up क्लास नसतो, अश्या वेळी गुरूने सांगितलेले किंवा एखाद्या तज्ञाने सांगितलेले मार्गदर्शक ध्यान अतिशय उपयुक्त असते. घरी बसूनसुध्दा असे ध्यान करणे उपयोगी आणि खूपच स्वस्त असते. 

श्री श्री रविशंकर यांनी जगाला भेट दिलेली अशी अनेक मार्गदर्शक ध्याने सीडीवर रेकॉर्ड केली आहेत. हरी ओम, शांती पंचकोशा, ओम, राम, हर आणि इतर कित्येक सीडीपैकी निवडून आपण आपल्या मित्राला भेट देऊ शकता. नियमित सराव करण्यासाठी आम्ही विशेषतः हरि ओम ध्यानाची शिफारस करतो.

भेटवस्तू ७: अध्यात्मिक दौरा किंवा पर्यटन 

आपण आत्तापर्यंत स्वतःमधील मेडिटेशन टूरबद्दल चर्चा केली. चला आता बाहेरच्या मेडिटेशन टूरबद्दल चर्चा करू! आपणास जर परवडत असेल तर आपण आपल्या मित्रासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सहलीची व्यवस्था करू शकता.

आपल्या मित्राला आवडेल अशी ठिकाणे आपण गुप्तपणे शोधून त्या यादीतून उच्च सौंदर्य आणि आध्यात्मिक मूल्ये असलेली जागा निवडा. अशी सुंदर जागा त्यांच्या डोळ्यांसाठी एक विश्रांती असेल आणि आध्यात्मिक मूल्यांमुळे अधिक चांगले ध्यान करण्यास मदत होऊन आयुष्यात सौंदर्य वाढेल.

त्यांना जगभरातील कोणत्याही एका आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमात आठवड्याभराच्या दौर्‍यावर पाठवण्याबद्दलसुध्दा आपण विचार करू शकता. त्या मित्राच्या गावापासून सर्वात जवळचा आश्रम शोधा, तेथील व्यवस्थापकांशी संपर्क साधा, तिकिट बुक करा, आश्रमात त्यांच्यासाठी एक खोली आरक्षित करा आणि तुमची इच्छा असेल तर त्यांना मेडिटेशन कोर्ससाठी नोंदणी करा. कोणत्याही भेट-प्रेमीकडून अशा भेटवस्तूंचे कौतुक केले जाईल.

 

एकदा आपण काही प्रमुख मुद्द्यांची नोंद घेतल्यानंतर भेटवस्तू निवडण्याची कला शिकणे खूप सोपे आहे आणि अशा शॉपिंगचा अनुभव गम्मतदार असल्याचे सिद्ध होईल. शेवटी, कोणत्याही गिफ्ट पॅकेजचा एक अनिवार्य भाग असलेले चॉकलेट आणि गुलाब समाविष्ट करण्यास विसरू नका!

 

हॅपी शॉपिंग आणि हॅपी गिफ्टिंग!