“दहा वर्षांपूर्वी थायरॉईड विकारांविषयी केवळ शालेय पाठ्यपुस्तकांमुळे मला माहित होते. सुमारे सात वर्षांपूर्वी मला थायरॉईड होण्याआधी माझे तर असे मत होते की, ती केवळ एक शारीरिक दुर्बलता आहे जी बाह्य जगातील लोकांना ग्रासते."
थायरॉईडचा विकार खरोखर कोणालाही होऊ शकतो, अगदी मलासुद्धा ! असा प्रकाश माझ्या डोक्यात पहिल्यांदा पडला. सुरुवातीला मी थोडीशी घाबरले होते, पण नंतर माझ्या लक्षात आले की योगा आणि आयुर्वेद हे थायरोईड विकाराचे सुरक्षित आणि सरल उपाय आहेत, आता तर मी त्याबद्दल अजिबात विचारसुद्धा करीत नाही. जीवन आधी जसे सामान्य होते तसेच आत्तासुद्धा आहे आणि दैनंदिन योगाच्या सरावाने लक्षणांबरोबर जुळवून घेण्यात मदत होते आणि त्यामुळे जीवन अधिकच चांगले झाले आहे.” –निखिला सिंग, २००६ पासून हायपोथायरोईडने ग्रस्त.
होय, अति तणाव आणि डायबेटीस यांच्या पाठोपाठ थायरॉईड विकार हे आता घरगुती नाव झाले आहे. अमेरिकन थायरॉईड असोसिएशननुसार अमेरिकेतील जवळजवळ २० करोड लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा त्रास आहे आणि यापैकी ६० टक्के लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही. तसेच, असे मानले जाते की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या विकाराचे प्राबल्य अधिक आहे. थायरॉईड विकाराचे एक मुख्य कारण आहे आपण जगत असलेली तणावपूर्ण जीवनशैली.
आज थायरॉईड विकाराचा फैलाव जरी वाढत असला तरी रोग्यांना उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात, प्रत्येक उपचाराचा प्रभाव दिसण्यास बराच वेळ लागतो परंतु दरम्यान तुम्हाला प्रोत्साहित वाटेल असे काही आहे - योगा आणि ध्यान यांच्या सहाय्याने थायरॉईड विकाराचा उपचार नैसर्गिक प्रकारे होऊ शकतो. तुमच्या दैनंदिन उपचारामध्ये योगाच्या सरावाला काही मिनिटे दिल्याने तणाव कमी होण्यात मदत होते आणि शिवाय तुमचे दैनंदिन जीवन निर्विघ्न आणि अधिक आनंदी बनते.
थायरॉईड विकाराचे अनेक प्रकार आहेत पण दोन प्रकार सर्वात प्रचलित आहेत:
- हायपोथायरॉईडझम (अंतर्गत सक्रीय थायरॉईड) |Hypothyroidism (underactive thyroid)
- कमालीचे थायरॉईडझम (अतिक्रियाशील थायरॉईड) | Hyperthyroidism (overactive thyroid)
तुम्हाला कोणत्या प्रकारचा विकार जडलेला आहे त्याबाबतीत डॉक्टरांकडून माहिती करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच तुम्ही अनुभवत असणाऱ्या प्रत्येक विशिष्ट लक्षणांनासुद्धा तुम्ही तपासून घेऊ शकता परंतु सर्वप्रथम डॉक्टरांकडून नक्की खात्री करून घ्या, कारण पुढील उपचार सुरु करण्या अगोदर डॉक्टरच तुम्हाला व्यवस्थित वैद्यकीय तपासणीचा सल्ला देतील.
तुम्हाला हायपोथायरॉईड झालेला असू शकतो जर:
- जर तुम्ही हळूहळू दैनंदिन जीवनाच्या बाबतीत उदासीन होऊ लागलात, तुमच्यात अनुत्साह जाणवू लागला आणि सगळ्या गोष्टींच्याबाबतीत तुम्ही निरुत्साही राहू लागलात.
- तुम्ही नित्याचीच कामे करीत असलात तरीसुद्धा तुम्हाला नेहमीपेक्षा अतिथकवा वाटू लागतो.
- आजकाल तुम्हाला मलावरोध का होतो हे तुम्हाला अजिबातच कळत नाही.
- तुमचे अचानक वजन वाढल्याचे तुमच्या मित्रांच्या लक्षात येऊ लागते आणि त्याचे कारण तुम्ही देऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतःच आश्चर्यामध्ये आहात की अति आहार न घेतासुद्धा वजन कसे काय वाढले आहे ?
- हल्ली आरश्यात बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की तुमचा चेहरा सुजलेला दिसतो आहे.
- तुमचे लांब जाड केस अचानक गळू लागले आहेत आणि घरभर केसांचे पुंजके पडलेले दिसू लागतात आणि हे बघून तुम्ही चिंतीत होता.
- अनियमित मासिक पाळी (याची आणि इतर कारणेसुद्धा असू शकतात, डॉक्टरांकडून तपासून घेणे उत्तम राहील.
- तुमच्या चेहऱ्यावर केसांची लव इतक्या अतिप्रमाणात दिसू लागली आहे की त्याची तुम्हाला लाज वाटू लागली आहे.
- तुमच्या घश्याला सूज आलेली तुम्हाला दिसते आहे. आता नक्कीच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आलेली आहे.
योगाभ्यासाने थायरॉईड विकारांच्या लक्षणात कशी काय घट होऊ शकते:
थायरॉईड विकारासाठी योगाभ्यास सुरु करण्याआधी, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की च्या. तसेच ही योगाची तंत्रे विकारांच्या लक्षणांना आटोक्यात ठेवण्यात मदत करतात परंतु ही तंत्रे म्हणजे औषधांना पर्याय नाहीत. (तरीदेखील, काही काळ नियमित योगाभ्यास केला तर काही केसेसमध्ये औषधांची आवश्यकता कमी होते.) .
टीप: हायपो आणि हायपर थायरॉईड या दोन्ही प्रकारच्या विकारांच्या रोग्यांकारिता सर्व योगासने चांगली जरी समजली जात असली तरी खाली दिलेली विशिष्ट योगासनांची आम्ही शिफारस करतो कारण ती केली तर उपयुक्त ठरतील. तुमचा सराव केवळ या आसनांपुरता मर्यादित ठेऊ नका. श्री श्री योगा शिक्षकांकडून माहिती करून घ्या की तुमच्या परिस्थितीवर कोणती आसने करता येवू शकतील.
हायपोथायरॉईडझमच्या उपचारामध्ये खालील योगासनांचा अभ्यास करावा:
- सर्वांगासन (खांद्यांवर उभे राहणे) याची या विकारात अतिशय शिफारस केली आहे. या आसनाच्या दबावाच्या परिणामामुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते व व्यवस्थित कार्य करू लागते आणि तसेच दबावाच्या परिणामामुळे डोक्यातील इतर ग्रंथी जश्या पियुषीका ग्रंथी आणि तृतीयनेत्र ग्रंथी यांनासुद्धा चालना मिळते ज्या अप्रत्यक्षपणे थायरॉईड ग्रंथींच्या कार्याला नियंत्रण करतात.
- अधोमुख आसन (विपरीतकरणी).
- एका पायावर पुढे वाकणे (जानू शीर्षासन).
- मत्स्यासन (मत्स्यासन).
- हलासन (हलासन).
- मांजराप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरासान).
- वेगाने सूर्य नमस्कार केल्याने वजन ताब्यात ठेवणे चांगल्याप्रकारे शक्य होते.
या योगासानंशिवाय, कपाल भाती (कपाळ चमकवणारे श्वसन तंत्र), नाडी शोधन (नाकपुडी आलटून पालटून श्वास घेणे), भस्त्रिका आणि उज्जयी श्वसन यासारख्या प्राणायामाचा सराव (श्वसनाची तंत्रे) केल्याने हायपोथायरॉईडची लक्षणे कमी होण्यात चांगलीच मदत होते.
थायरॉईड विकाराने ग्रस्त लोकांकरिता अन्नविषयक सूचना
- आहारामध्ये अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश करा.
- चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा.
- ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खा. हायपोथायरॉईडझममध्ये फुलकोबी, पानकोबी आणि इतर प्रकारचा कोबी वर्ज्य करणे चांगले
- मांसाहारी पदार्थ, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ (मलईरहित दुध घेणे योग्य राहील), भात, मसालेदार पदार्थ, फास्ट फूड आणि परिरक्षक वापरलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्यावे.
तुम्हाला हायपरथायरॉईडझम असू शकतो जर:
- जर तुम्ही अति अन्न सेवन करीत असाल किंवा नेहमीपेक्षा अतिशय कमी जेवत असाल. भूक लागण्यात अचानक कमालीचा बदल असेल. आणि तुम्ही कितीही जेवलात तरीसुद्धा तुम्ही बारीकच राहत असाल (म्हणजेच तुम्ही वजन वाढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असाल).
- तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही.
- जर तुम्हाला विलक्षणरित्या भरपूर घाम येत असेल.
- बारीकसारीक गोष्टींनी तुम्ही सहजपणे वैतागत असाल.
- तुम्ही सामान्यतः कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत काळजीने घेरलेले, चिंताक्रांत आणि एकदम उतावळे असता.
हायपरथायरॉईडझमच्या उपचारामध्ये खालील योगासनांचा अभ्यास करावा:
- पूलासारखे आसन (सेतूबंधासन).
- मांजराप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरासान).
- बालकाप्रमाणे आसन (शिशु आसन).
- मृतक शरीराप्रमाणे (शवासन).
- मंदगतीने केलेले सूर्य नमस्कार आणि त्याच्या जोडीला मंत्रोच्चार केल्याने अविचालीत आणि शांत परिणाम साधणारे आहेत..
उज्जयी, भ्रमरी (भ्रमराप्रमाणे श्वसन), नाडी शोधन आणि शीतली आणि शीतकारी यासारखे थंडावा देणारे प्राणायाम हे हायपरथायरोईडझमच्या लक्षणांना नियंत्रणात ठेवण्यात प्रभावी मानले जातात.
तसेच हायपो आणि हायपरथायरॉईडझम यांमध्ये रोज काही मिनिटे ध्यान धरणे हा चांगला नेम आहे. हायपोथायरॉईझमचे रुग्ण जे त्यांच्या विकारामुळे जर निरुत्साही झाले असतील तर त्यांनी जागरूकपणे शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे गरजेचे आहे. आणि इथे तुमची इच्छाशक्ती सबळ करण्यात ध्यानधारणाचा फायदा होईल.
तुम्ही पंचकोषा आणि हरी ओम ध्यान करू शकता. जे तुम्हाला श्री श्री योगा शिक्षक शिकवू शकतील किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग च्या पार्ट २ च्या कोर्स मध्ये शिकविले जाते.
थायरॉईड विकाराचे मुख्य कारण तणाव आहे असे मानले जाते आणि ध्यानाने मन शांत आणि शिथिल राहते आणि दैनंदिन तणाव कमी करते. दररोज काही मिनिटे ‘ओम’ चे उच्चारण करण्यानेसुद्धा मदत होते. उच्चारण केल्यानंतर एक छोटी कृती करा: तुमचा हात थायरॉईड ग्रंथीवर ठेवा आणि ती बरी होऊ लागली आहे हे जाणा. मंत्रोच्चाराची सकारात्मक ऊर्जा थायरॉईड ग्रंथींना उत्तेजित करते.
योग निद्रा (मृतक शरीराप्रमाणे) ही हायपो आणि हायपरथायरॉईडझम या दोन्हीमध्ये तणाव कमी आणि शांत करण्यात मदत करते. हायपरथायरॉईडझमचे रुग्ण ज्यांना रात्री झोप लागत नाहीत अशांना योग निद्रा जणू आपण दिवसा घेतो तश्या डुलकीचे काम करते आणि शरीराला पुरेसा आराम प्रदान करते.
शारीरिक दुखाण्यांमुळे बांधल्यासारखे वाटते आहे का? भावनांमुळे वैयक्तिक आणि कार्यालयीन जीवनावर परिणाम होतो आहे का? जीवनशैलीत अत्यल्प फरक करून योग तुमच्या समस्यांचे समाधान नैसर्गिकरित्या कसे करतो हे शिकण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा.