२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा होतोय हे तुम्हाला समजले असेलच. अजूनही तुम्ही योग म्हणजे शरीराला पीळ देत वेदनादायी स्थितीत वाकविणे आहे, असे समजत असाल तर ह्या प्राचीन तंत्राबद्दल आपले पूर्वग्रह दूर सारत योग करण्याची हीच वेळ आहे. आणखी खुलाशाची गरज आहे? चला तर, योग कां करावा, हे जाणून घेऊया
चिरतारुण्याचा अगदी स्वस्त उपाय | Inexpensive anti-aging treatment
आपण शरीराचे वाढते वय रोखू शकत नाही, पण कमीतकमी ते निरोगी आणि विषजन्य तत्वांपासून दूर ठेवू शकतो. योग आणि त्यासोबतचे प्राचीन ज्ञान - आयुर्वेद, ज्यामुळे वाढत्या वयासोबत दिसणाऱ्या सुरकुत्या टाळण्याचे विस्मयकारक उपाय प्राप्त होतात. या प्रक्रियांनी शरीर अंतर्बाह्य शुद्ध होऊन टवटवी लाभते.
अतिरिक्त चरबी हटवा | Shed those extra pounds
जीम मध्ये घाम न गाळता तुम्हाला खरेच आपले वजन कमी करायचे आहे काय? जर तुम्हाला हे कसे करावे हे माहित नसेल तर, योग हा त्यावरील तोडगा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करीत काही हळूवार हालचालींचे व्यायाम केल्याने जीमसारखी मेहनत न घेता योग तेवढ्याच प्रभावीपणे काम करतो, तेही घाम न गळता.
वयाचे बंधन नाही | Age - No bar
शरीराची तंदुरुस्ती ही जशी प्रत्येक वयोगटासाठी आवश्यक आहे तसेच योगसुद्धा सर्व वयोगटाचे लोकं करू शकतात. असे म्हटले जाते की तान्ही मुलं जितक्या सुंदर रीतीने योग करतात, तेवढे तर एखादा सराईत योगी सुद्धा करणार नाही. तुम्ही सात वर्षाचे बालक असाल किंवा सत्तरीतले ज्येष्ठ नागरिक, योग सर्वांना निरोगी आणि ऊर्जावान राहण्यास मदत करतो. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला शाळेतील मुलांपासून सत्तरी पार केलेल्या म्हाताऱ्यापर्यंत सारे लोक योग करतील आणि जगाला दाखवून देतील की योगसाधना विशिष्ट वयोगटासाठीच मर्यादित नसते.
चयापचयक्रियेत सुधारणा | Improve metabolism
जेंव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती बरोबर काम करीत आहे तेंव्हाच आपल्या चयापचयाच्या वेगाकडे लक्ष देणे योग्य असते. करायला कठीण आणि जटील वाटणारी आसने, जी प्रत्यक्षात प्रयत्न करीत सरावात आणायची असतात, ती चयापचय क्रियेत जोम आणतात.सात्विक अन्न आणि संतुलित आहार पद्धती अनुसरल्यास तुमच्या चयापचयाचा वेगतुमच्या नियंत्रणात येईल. शरीराच्या चयापचयाचे संतुलन साधत वजन कमी करण्याची किमया योगामुळे साध्य करता येते.
योग कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवतो | Burn cholesterol
शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉल किंवा वाईट कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यात अडथळा येऊन हृदय विकाराचा धोका संभवतो. योगासनाद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवून ही परिस्थिती टाळणे शक्य होते. ह्या विषयावर बरेच संशोधन झाले असून त्यातून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याच्या योगाच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
चमकदार त्वचा | Radiant skin
योग म्हणजे केवळ न करकरणारे सांधे आणि लवचिक असलेला पाठीचा कणा नव्हे.योगामुळे शरीरातील विषतत्वे बाहेर टाकली जातात. ज्यामुळे त्वचेवर चमक आणि तजेला दिसू लागतो. सोबत आयुर्वेदाची जोड द्या आणि बघा, त्वचेशी संबंधित साऱ्या समस्या दूर होतील.
शरीराला योग्य आकार द्या | Shape up!
जर तुम्ही पोटावरील चरबी घालविण्यासाठी जीममध्ये तासनतास घालविले असाल तर, योग ह्याबाबतीत तुंम्हाला नक्कीच मदतीस येऊ शकतो. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते,त्यामुळे अतिरिक्त चरबी हटण्यास मदत होते.तुम्ही योगाला सुरुवात करा आणि बघा केवळ काही आसने केल्याने पोट सपाट होऊ लागते
मनाची शांती | Peace of mind
निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आणि तुमच्या शरीराला आणि मनाला चांगल्या प्रकारे समजून घेणे केवळ योगाच्या मार्गानेच शक्य होते. नियमितपणे योगाचा सराव केल्यास लक्ष केंद्रित होते, कार्यातील कौशल्य वाढते आणि जीवनात भावनिक समतोल साधला जातो. योगाने मन शांत होऊन टवटवी प्राप्त होते, ज्यामुळे जगणे सुसह्य होण्यास बळ प्राप्त होते. काही मिनिटे ध्यान केल्याने प्रसन्न आणि केंद्रित राहण्यास मदत लाभते.