योगाद्वारे सांधेदुखीवर मात I (Yoga for joint pain in Marathi)

बारीकसारीक गोष्टी करताना तुमचे गुडघे, मनगटे, खांदे आणि इतर सांधे दुखतात कां? तुम्हाला हवा तसा जीवनाचाआनंद घेताना सांधेदुखीमुळे अडथळा येतो कां? दिवसांत बरेच वेळा वेदनाशामक गोळ्या घेऊन तुम्ही कंटाळला आहात कां?


यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेल तर तुम्ही खूप सहन केले आहे आणि साहजिकच आता दुखणे असह्य झाले आहे. वय होत जाते तसतशी सांधेदुखी वाढते. कमकुवत हाडे, पुरेशा व्यायामाची कमी आणि पोषक आहाराची कमी कमतरता यामुळे त्रास वाढू शकतो. ध्यानाने त्रास कमी होतो त्याचप्रमाणे योगासारख्या अनुभव सिद्ध सर्वंकष उपचारपद्धतीने दुखणे पूर्णपणे जाऊ बरे होऊ शकते. योग हे एक प्राचीन असे भारतीय तंत्र आहे, जे दु:ख समूळ दूर करते, शरीर तंदुरुस्त करते आणि मन शांत करते.

खाली दिलेली योगासने सांध्यांचे दुखणे बरे करून त्यांना बळकट बनवतात :

वीरभद्रासन गुडघ्याला बळकटी देणारे आसन आहे. आखडलेल्या खांद्यांसाठी सुद्धा या आसनाचा फायदा होतो. खांद्यातील ताण नाहीसा होतो. त्याचप्रमाणे शरीराचा तोल सुधारतो.

धनुरासनात खांदे मोकळे होतात आणि दुखणे कमी होते. या आसनामुळे पाठीची लवचिकता वाढते आणि शरीरातील थकवा आणि ताण नाहीसा होतो.

सेतू बंधासन गुडघ्याचे सांधे मजबूत करण्यास मदत करते. आणि अॅस्टिओपोरॅसिस या हाडांच्या आजारात उपयुक्त ठरते. याने मेंदू शांत होतो आणि चिंता आणि ताण कमी होतो.

त्रिकोणासनाने पाय, गुडघेआणि घोटे मजबूत होतात. जांघा आणि मांड्या ताणल्या जाऊन मोकळ्या होतात. या आसनांचा सायटिका आणि पाठदुखी यावर वर फायदा होतो.

[331720:पाठ व खांदे यांना बळकटी देणारे हे आसन आहे. उष्ट्रासनाने पाठीचा कणा लवचिक होतो आणि पाठीच्या खालच्या भागातील दुखणे जाऊन शरीराची ठेवण सुधारते.

 

या आसनाने मांड्या आणि खांद्यांना बळकटी येते. तसेच मनगटे, दंड आणि पायांना बळकटी येते व शरीराचा थकवा आणि पाठीचे दुखणे दूर होते. या आसनाने ओस्टोपोरसिस होण्यास प्रतिबंध होतो.

सावधानतेची एक गोष्ट:

योगासने करताना दुखणे वाढू नये म्हणून योगा साठी असलेले ठोकळे, उश्या आणि आधाराच्या वस्तू वापरा. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घ्या आणि तुम्हाला सहज जमेल इतकेच करा. जर दुखणे वाढले तर योगसाधना थांबवा आणि पुन्हा सुरु करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वेदना मुक्त होण्यासाठी काही वेदना रहित सूचना:

१. तुमच्या कामाच्या टेबलावरून दर तासाला           उठा आणि जरा शरीर ताणा.

२. बसताना आणि उभे राहताना शरीराची ठेवण       चांगली ठेवा.

३. सांध्यांवर कधीही जास्त ताण देऊ नका.

४. पोषक आहार घ्या

५. स्नायू कमवा.

योग्य आहार 

गोल फिरणे, वाकणे, घरंगळणे) पुढे सरकणे या क्रिया करण्यासाठी दोन अस्थि / हाडे एकत्र जोडली जातात त्याला सांधे म्हणतात. सांधे चांगले ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे योग्य आहाराची निवड करणे. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, साखर आणि ग्लुटेन युक्त उत्तेजक पदार्थांचा वापर कमी करणे. उत्तेजना कमी करणारे पदार्थ जसे हिरव्या भाज्या आणि फळे जास्त घ्यावी. तुमच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा अंतर्भाव करण्यानेही दुखणे कमी होते.

योग हा नैसर्गिक आणि दुष्परिणाम नसलेला, निरोगी आयुष्यासाठी असलेला उपाय आहे. योगाच्या नियमित साधनेने शरीर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी बनते. त्याने तुमच्यातील जोश टिकून राहतो. योगासनांचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो त्यामुळे चिकाटी न सोडता साधना करत रहा. थोडा वेळ योगासने करा आणि वेदना कायमच्या घालवा

योगाने शरीर व मन सुधारते आणि त्याचे अनेक फायदे आहेत पण तो औषधाला पर्याय नाही. योगासने केवळ तज्ज्ञांच्या  मार्गदर्शनाखालीच करणे महत्वाचे आहे.