Virbhadrasana in Marathi | वीरभद्रासन

  

वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या व पाठीचे स्नायू बळकट बनतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव ह्या आसनाला दिले गेले आहे. वीरभद्र हा शिवाचा अवतार मानला जातो. उपनिषदातील सर्व गोष्टींप्रमाणे वीरभद्राच्या गोष्टीमध्येही नैतिक मुल्यांचा समावेश आहे.

वीरभद्रासन म्हणजेच वीर: शूर योद्धा; भद्रा: शुभ; आसन: शरीराची स्थिती.

वीरभद्रासन कसे करावे? | How to do Veerabhadrasana

वीरभद्रासन हे एक अत्यंत डौलदार आणि लालित्यपूर्ण आसन आहे. हे आसन आपल्या योगसाधनेत एक मोहकता आणेल.

  • सरळ अभे रहा. दोन्ही पायांत ३-४ फूट अंतर असू द्या.
  • उजवा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय १५ अंश.
  • हे तपासून पहा: उजव्या पायाची टाच डाव्या पावलाच्या मध्यभागी आहे नां?
  • दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे, हाताचे तळवे वरच्या दिशेस.
  • हे तपासून पहा: हात जमिनीस समांतर आहेत नां?
  • श्वास सोडा आणि उजवा गुडघ्यातून वाका..
  • हे तपासून पहा: तुमचा उजवा गुडघा आणि घोटा एका रेषेत आहे का? उजवा गुडघा उजव्या घोटेच्या पुढे नाही ना ह्याची दक्षता घ्या.
  • उजवी कडे वळून पहा.
  • आसनात स्थिर होताच हात आणखी ताणून घ्या.
  • कंबर आणखी थोडी खाली दाबायचा हलकासा प्रयत्न करा. एका योध्याच्या जिद्दीने आसन स्थिर ठेवा. चेह-यावर प्रसन्न भाव असू द्या. खाली वाकताना श्वासोच्छवास चालूच ठेवा.
  • श्वास घेत सरळ व्हा.
  • श्वास सोडता सोडता दोन्ही हात खाली आणा.
  • अगदी अशाच प्रकारे डाव्या बाजूसही करा. (डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व उजवा पाय १५ अंश.)

वीरभद्रासनाचे फायदे | Benefits of the Virabhadrasana

  • हात पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते व ते सुडौल बनतात.
  • शरीर संतुलित राहते व काम करण्याची क्षमता वाढते.
  • बैठी कामे करणाऱ्यांसाठी अतिउत्तम.
  • खांद्यांचा ताठरपणावर अतिशय उपयुक्त.
  • थोड्याच अवधीमध्ये खांद्यांमधला ताण कमी होतो.
  • मांगल्य, धैर्य, कृपा व शांती प्राप्त होते.

वीरभद्रासन करताना घ्यायची दक्षता | Contraindications of the Veerabhadrasana

  • पाठीच्या कण्याचे काही विकार असल्यास किवा नुकतेच दिर्घ आजारातून बरे झाले असाल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे आसन करावे.
  • उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने हे आसन टाळावे.
  • गर्भधारणेच्या दुस-या व तिस-या तिमाही चरणात असलेल्या स्त्रियांना (नियमित योगसाधना करणा-या) विशेष लाभ होतो. भिंतीजवळ उभे राहून हे आसन करू शकता,, असे केल्याने गरज पडल्यास भिंतीचा आधार घेऊ शकता. परंतू हे आसन करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
  • तुम्हाला अतिसारचा त्रास असेल तर हे आसन करु नये.
  • तुम्हाला जर संधिवात किंवा गुडघे दुखी असेल तर हे आसन करताना गुडघ्यांना आधार द्या.

<<Standing Forward Bend with Feet Apart                                                         Triangle Pose >>

(लाभदायक योगासने)

योगाभ्यास केल्याने मानसिक आणि शारीरिक विकास होतो ज्यामुळे अनेक लाभ होतात. तरी पण त्याला औषधांना पर्याय म्हणून मानू नये. एखाद्या तज्ञ श्री श्री योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच आसनांचा सराव करणे आवश्यक आहे. कोणतीही व्याधी असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आपल्या आसपास असेलेले श्री श्री योग किवा आर्ट ऑफ लिविंग सेंटर शोधण्यासाठी. अधिक माहिती साठी किवा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी ई मेल: info@srisriyoga.in