योगासन आणि त्याचे रोगप्रतिबंधक व रोगनिवारक उपाय (Yoga to avoid and cure diseases in Marathi)

संपूर्ण जगात, वेगवेगळ्या प्रकाराने केलेल्या संशोधनातून जे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, त्यावरून आपण खात्रीलायक सांगू शकतो की, योगासनाच्या आचरणाने रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक असा दुहेरी उपयोग आपल्याला होतो. नियमित करत असलेल्या योगासनांमुळे आपली रोगनिवारक शक्ती आश्चर्यकारक रीतीने वाढलेली दिसते. योगासनांमुळे अनेक शारीरिक फायदे तर होतातच शिवाय आपल्या मनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात. आपली जगण्याची शक्ती प्रभावी होतेच. तसेच आपली बुद्धीची सर्जनशीलता सुद्धा वाढते.  

काही मोठमोठ्या जुनाट आजारावरच्या योग उपचारांचे संशोधन अंती मान्य झालेले निष्कर्ष खालील प्रमाणे:

- कामाच्या पद्धतीमुळे येणाऱ्या अति ताणामुळे, आपल्या ह्रदयाच्या हालचाली आणि चयापचयाच्या क्रियेवर दुष्परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: बैठी काम करण्याच्या वातावरणांत हा धोका जास्त असतो. आपल्या योगासनाच्या उपचारांच्या उपयोगांच्या निष्कर्षांवरून लक्षात येते की, अधूनमधून घेतलेल्या थोड्या विश्रांतीच्या वेळात केलेल्या योगासनाच्या व्यायामामुळे, महत्वाची अशी निर्णायकता, सी.व्ही.डी. (ह्रदयाच्या झडपांच्या हालचालीमुळे होणारे आजार) च्या इतर आजारासहचा धोका कमी होतो हे लक्षात येते, वर उल्लेख केलेल्या सी.व्ही.डी. कारणांमुळे - वजन कमी होणे, ह्रदयाच्या ताणामुळे योग्य असणारे ब्लड प्रेशर कमी होऊ लागणे; अंगावरील चरबी वाढू लागणे आणि आय.एल. मध्ये होणारी घट, ही वजन अति वाढवते अथवा लठ्ठपणा वाढत जातो.

- वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे की, योगोपचारामुळे विशिष्ट प्रकाराची अकार्यक्षमता सुधारता येते; दु:खण्याची तीव्रता कमी होते आणि आजारामुळे निर्माण होणारी शरीरातील दाहकता कमी करता येते. योगोपचारांच्या व्यायामामुळे उद्दीपित झालेले ‘को-अॅक्टीव्हेटर पीजीसी-१ अल्फा हे सूक्ष्म कण स्नायूंपासून मुक्त होतात आणि त्यांची विशाल संरचना स्नायूची दाहकता कमी करण्यास खूप मदत करतात.

- ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या पेशंटमध्ये सुद्धा त्यांच्या जगण्याचा स्तर उंचावलेला दिसला. त्यांच्यातील ताणाची पातळी कमी झाली त्याचप्रमाणे, रेडीएषण होणारे डी.एन.ए. चे नुकसानही कमी झालेले दिसले.

- मानसिक ताणामुळे पुढील तीव्र परिणाम दिसून येतात, जे जीन आनुवंशिकतेमुळे येतात त्यांत अनावश्यक बदल होतात, रोगाच्या ग्रंथी वाढतात, नैसर्गिक रित्या रोगाच्या कणांना होणारा, अंगभूत प्रतिकारकता कमी होतो. या बाबतीत केलेल्या अनेक संशोधनाद्वारे हे निश्चित झाले आहे की, हा मानसिक ताण कमी करण्यासाठी केलेल्या योगोपचारांच्या योजनेमुळे व्यक्तीची प्रतिकार शक्ती चांगल्या रीतीने वाढते.

त्यासाठी पहिला योग्य रीतीने हाताळलेला सोदाहरण प्रात्यक्षिक प्रयोग सर्वसाधारण निरोगी तरुणावर केला गेला. त्यांच्यावर एक पूर्ण महिनाभर ताण सोडून आरामदायी राहण्यासाठी योगाचे शिक्षण दिले. त्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर दिसले की, ह्या महिन्याच्या ट्रेनिंगमुळे त्यांच्या शरीरातील ‘नॅचरल किलर’ पेशींमध्ये आश्चर्यकारक वृद्धी दिसून आली. तसेच आनुषंगिक घट ही ताणवृद्धी करणाऱ्या पेशींमध्ये दिसून आली.

तात्पर्य:

आजच्या जगात झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण त्यामुळे वाढणारे, वाढते शहरीकरण व वाढते प्रदूषण, त्यांचं जोडीला बैठी आरामशीर कामांची वाढ, आणि या सगळ्यामुळे येणारे प्रचंड ताण यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी नव्याने सुरु झाल्या आहेत. कॉम्प्युटरवर काम करताना अयोग्य रीतीने बसू नये. प्रवासात घालवायला लागणाऱ्या वेळेत वाढ, काहीवेळा अतिरिक्त शारीरिक श्रम या सर्वाची परिणीती तीव्र दुखण्यात होते. जेवण्याखाण्याच्या बदललेल्या सवयी हेही एक महत्वाचे कारण आहेच.

वरील सर्व अयोग्य गोष्टींना आटोक्यात ठेवण्यासाठी योग्शास्त्रांचा अवलंब हेच एक योग्य उत्तर आहे. योगासनाद्वारे होणारे रोगप्रतीबंध व रोगनिवारक परिणाम हे या संशोधनातून पुन: सिद्ध झाले आहेत. किंबहुना शेकडो वर्षानंतरही आजच्या युगात “प्राचीन योगशास्त्र” अजूनही टिकून आहे व त्याचा प्रसार होत आहे हेच त्याच्या चकित करणाऱ्या उपायांचा दाखवला आहे.

  • डॉ. निखिला बी. हिरेमठ, सहाय्यक प्राध्यापक.

श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिकशास्त्र आणि संशोधन, बंगलोर