जर योग्य प्रशिक्षण घेतले आणि नियमित सराव केला तर योगामुळे सर्वांचाच फायदा होतो.
योगाच्या नियमित सरावामुळे शरीराचे खालीलप्रमाणे फायदे होतात:
- पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती यामध्ये सुधारणा होते.
- मज्जातंतू आणि अंतःस्राव यांच्या इंद्रियांच्या कार्यात योगामुळे वृद्धी होते.
- योग दिर्घकालीन आजारांना प्रतिबंध करते आणि त्यापासून सुटका मिळते.
- एकूणच संपूर्ण शरीर अधिक निरोगी आणि अधिक उत्साहवर्धक जाणवते
मधुमेहाचे दोन प्रकार आहेत- प्रकार १ ज्यामध्ये इन्सुलिन बिलकुल निर्माण होत नाही आणि प्रकार २,, ज्यामध्ये स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिनचे उत्पादन करत नाही. अनेक केसेसमध्ये मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते खास करून जेव्हा कोणत्याही लक्षणांचा अनुभव येत नसतो.
योगाचा सराव हा परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि जीवनशैली आणि तणाव या कारणांमुळे होणारा टाईप २ यावरसुद्धा परिणामकारक आहे.
श्री श्री योगा हे आसनाच्या सुरुवातीपासून ते संपेपर्यंत प्रत्येक पैलूची आणि त्याचबरोबर श्वसनाच्या कार्याची नीट काळजी घेतो. म्हणूनच वैयक्तिक सराव सुरु करण्या आधी योग्य प्रशिक्षण महत्वाचे आहे. खाली दिलेली आसने व प्राणायाम हे मधुमेहावर परिणामकारक आहेत. परंतू त्यांचा सराव सुरु करण्या आधी ते योग्य मार्गदर्शनाखाली शिकणे अतिशय महत्वाचे आहे:
- वज्रासन
- मंडूकासन (या आवृत्तीमध्ये हाताच्या मुठी पोटाच्या भागात ठेवाव्या)
- सुप्त वज्रासन
- विपरीत करणी – सर्वांगासन – हलासन – सर्वांगासन
- खाली आडवे व्हा आणि थोडावेळ आराम करा.
- चक्रासन
- नटराजासन (दोन्ही पाय एका बाजूला)
- पूर्ण शलभासन
- त्रियक भुजंगासन
- धनुरासन
- वरती तोंड केलेला श्वान (ऊर्ध्वमुख श्वान आसन)
- शिशु आसन
- उडीयान बंध
- पश्चिमोत्तानासन
- अर्धमत्स्येन्द्रासन
- पर्वतासन-योग मुद्रा
- कपालभारती नाडीशोधन प्राणायाम
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.