चंद्र नमस्कार
चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे आणि ज्याप्रमाणे चंद्र हा सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो त्याचप्रमाणे चंद्र नमस्काराचा सराव हा सूर्य नमस्काराची प्रतिकृती आहे. सूर्य नमस्कारांमध्ये करावा लागणारा आसनांचा संच तोच आहे पण फक्त इतकाच फरक आहे की अश्व संचलानासनाच्या ऐवजी अर्ध चंद्रासन केले जाते. आकाशात जेव्हा चंद्र दृष्टीस पडतो तेव्हा रात्रीची ती वेळ चंद्र नमस्कार करण्यास योग्य आहे. जेव्हा रात्री याचा सराव कराल तेव्हा तो रिकाम्या पोटी करावा.
चंद्र नमस्काराचे फायदे
थंड, शिथिल करणारी आणि सृजनता जागवणारी ही चंद्राची उर्जा मार्गीकृत होण्यास चंद्र नमस्कार मदत करतात. पाठीचा कणा, गुडघ्याच्या मागचे स्नायू आणि पायाच्या पोटऱ्या यांना ताण पडणे; पाय, हात, पाठ आणि पोटाचे स्नायू यांना बळकटी मिळणे हेसुद्धा चंद्र नमस्काराचे फायदे आहेत. इतर सर्व योगासनांप्रमाणेच, चंद्र नमस्कारसुद्धा योग्य देखरेख आणि योग्य मार्गदर्शन याखाली शिकणे हे महत्वाचे आहे.
आसनांचा क्रम खालीलप्रमाणे

प्रणामासन (प्रर्थानेचा पवित्रा)
दोन्ही पाऊले जोडलेल्या स्थितीत उभे राहा. दोन्ही तळव्यांना प्रार्थनेच्या स्थितीत एकत्र आणा.

हस्तौत्तानासन (हात वर केलेला पवित्रा)
श्वास आत घेत हात समोरच्या दिशेने आणा आणि वर न्या, जेवढे उंच ताणता येतील तितके उंच न्या. हात मागच्या दिशेने नेत आणि ओटीपोट समोर आणत पाठीची कमान हळुवारपणे करा कोपर आणि गुडघे सरळ ठेवा, आणि डोके दोन्ही हातांच्या मध्ये, हनुवटी छताच्या दिशेने असावी.

पादहस्तासन (हात ते पायापर्यंतचा पवित्रा)
श्वास सोडत समोर वाका. हात जमिनीवर ठेवा. गुडघे वाकवा. हात जमिनीवर असतानाच गुडघे सरळ करा.

अश्व संचलन आसन (घोडेस्वाराचा पवित्रा)
उजव्या पायाला जितके शक्य होईल तितके मागे न्या; उजवा गुडघा जमिनीवर, तळवे छताच्या दिशेने. वर बघा.

दंडासन (काठीप्रामाणे पवित्रा)
श्वास रोखा, डाव्या पायाला मागे न्या. गुडघ्यांना सरळ ठेवत संपूर्ण शरीर एका
एका सरळ रेषेत आणा.

शिशुआसन (बालकाप्रमाणे पवित्रा)
श्वास सोडा आणि मागे व्हा. नितंब टाचांवर ठेवा, कपाळ जमिनीवर आणि हात समोर जमिनीवर एकदम स्थिर ठेवा. ताण द्या.

अष्टांग नमस्कार (आठ भाग किंवा बिंदूंनी वंदन करणे)
समोरच्या दिशेने जा, हनुवटीला जमिनीजवळ ठेवा. तुमची हनुवटी, छाती, (छातीच्या दोन्ही बाजूला) हाताचे तळवे,
गुडघे आणि पायांची बोटे यांनी जमिनीला स्पर्श करा. तुमच्या पार्श्वभागाला वर उचला.

भुजंगासन (नागाप्रमाणे पवित्रा)
श्वास आत घेत नागाप्रमाणे पवित्रा घ्या. हात खांद्याच्या खाली, हाताचे कोपर शरीराला लागून, पायाच्या टाचा एकत्र जोडलेल्या. ओटीपोट जमिनीला चिकटलेले ठेवून शरीराचा वरचा भाग वर उचला. पाठीचा वरचा भाग वाकवण्यावर लक्ष केंद्रित करा.

पर्वतासन (पर्वताप्रमाणे पवित्रा)
श्वास सोडत हात आणि पाय अशा प्रकारे आणा की इंग्रजी अक्षर ‘व्ही” उलटे केल्यावर जसे दिसेल तशी स्थिती. हात व नितंब यांना मागे ढकला; पायाच्या टाचांना जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.

अश्व संचलन आसन (घोडेस्वाराचा पवित्रा)
श्वास सोडत, उजवे पाऊल पुढे आणा, वरच्या दिशेने पाहत डावा गुडघा जमिनीवर टेकवलेला ठेवा आणि डावे पाऊल छताच्या दिशेने असावे.

पादहस्तासन (हात ते पायापर्यंतचा पवित्रा)
श्वास बाहेर सोडा, डाव्या पायाला उजव्या पायाजवळ आणा.

हस्तौत्तानासन (हात वर केलेला पवित्रा)
श्वास आत घ्या, उभे राहा, हात समोरच्या दिशेने ताणत मागे न्या, कटिभागाला समोरच्या दिशेने ढकला.
ताडासन
श्वास बाहेर सोडा आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला खाली आणा. शरीराच्या दोन्ही बाजूमधील फरकाबाबतीत जागरूक व्हा.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.