अभिव्यक्तीचा उत्तम मार्ग समजली जाणारी नृत्य ही एक उपजत कला आहे. बहुतेक सर्व प्राचीन नृत्य प्रकार परंपरेशी संलग्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोलाचे आहेत. मग तो जोशपूर्ण भांगडा असो, मनमोहक बॅले असो वा आकर्षक सालसा असो, प्रत्येक शैली आपापल्या परीने खास आहे आणि आपले लक्ष वेधून घेणारी आहे. तुम्ही लपून छपून नाच करणारे असाल किंवा सर्वांसमोर, तुम्हाला हिप हॉप आवडत असेल किंवा टॅप डांस. तुम्हाला नृत्य करण्यातला आनंद आणि त्यातून मिळणारे समाधान समजले आहे.
नृत्यातून मनोरंजन
नर्तक जेंव्हा नृत्याचा आनंद घेत असतो आणि मनापासून सादर करत असतो तेंव्हाच त्या नृत्यात मजा येते. जेंव्हा शरीर सुदृढ आणि आणि मन मोकळे असेल तेंव्हाच नृत्याचे चांगले सादरीकरण होऊ शकते. नृत्य सादर करण्याआधी जर नर्तकाला खूप ताण आला असेल किंवा सराव करताना शरीरात लवचिकपणा नसेल तर सादरीकरण उत्तम होणार नाही. मग निराशा येईल. अशा अडचणींमुळे तुमच्या नृत्यात अडथळा येऊ शकतो आणि त्यावर नीट उपाय करायला हवा.
योगासने कां करायला हवीत ?
योगासने म्हणजे आसने आणि प्राणायाम या दोन्हीचा मिलाफ आहे, जे आपले शरीर निरोगी आणि मन शांत ठेवायला मदत करतात. या प्राचिन तंत्रामुळे नर्तकांच्या भावना व्यक्त करण्यात सुधारणा होते, लवचिकपणा वाढते, ते जास्त डौलदार बनतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मोनिकाला असे वाटते की, “योगासने म्हणजे सावकाश केलेले नृत्यच आहे. ज्यामुळे शरीराचा दम वाढतो.”
नृत्याच्या सरावात तुम्हाला उपयोगी पडतील अशी काही आसने बघुया.
सुरुवातीला शरीर मोकळे करणारे काही व्यायाम करा. जसे मान, खांदे, गुडघे, घोटे गोल फिरवणे.
त्रिकोणासनामुळे नर्तकांचे पाय, गुडघे, घोटे, दंड आणि छाती मजबूत होते. मांड्या, जांघा, पोटऱ्या, खांदे, छाती आणि पाठीचा कणा यांना बळकटी येते. योगासनांमुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन तयार होते. आणि नर्तकांची चिंता, तणाव आणि पाठीचे दुखणे दूर होते.
उत्कटासनामुळे पाठीचा कणा, मांड्या आणि छातीच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. पाठीचा खालचा भाग मजबूत बनतो. मांड्या, घोटे, पाय आणि गुडघे यांनाही बळकटी येते. योगासनांमुळे नर्तकांना शरीराचा तोल सांभाळायला मदत होते आणि मनाचा निश्चय वाढतो.
shchay
पूर्वोतानासनामुळे मनगटे, दंड, पाठ आणि पाठीचा कणा यांना बळकटी येते. पाय आणि मांड्या ताणले जातात.
अधोमुख श्वानासन(खाली तोंड केलेल्या कुत्र्याप्रमाणे)
अधोमुख श्वानासन हे पुनरुज्जीवित करणारे आहे त्यामुळे संपूर्ण शरीरास बळकटी येते. विशेषत: दंड, खांदे, पाय आणि पावले. स्नायू बळकट होतात, डोक्याकडे जाणारा रक्त प्रवाह वाढतो. पाठीचा कणा खेचला जातोआणि छातीचे स्नायू बळकट होतात. या योगासनामुळे नर्तकांचे मन शांत होते आणि थकवा, डोकेदुखी असेल तर ती दूर होते.
सेतुबंधासन करण्याने पाठीचे स्नायू बळकट होतात आणि छाती, मान आणि कण्याचे स्नायू ताणले जातात. याने अंगदुखी आणि पाठदुखी दूर होते. आणि मेंदू शांत होतो
शवासनातील गाढ ध्यान स्थितीमुळे शरीराचे पुनरुज्जीवन होते. योगासनांच्या शेवटी दोन मिनिटे हे आसन करावे.
नृत्य-कार्यक्रम सादर करण्याआधी काय करावे?
शरीरातील सांधे फिरवण्याचे काही व्यायाम आणि शरीर ताणण्याचे काही व्यायाम करण्याने सादरीकरणास तुमचे शरीर तयार होईल. दोन चार सूर्यनमस्कार घालण्यानेही शरीर मोकळे होऊन ऊर्जा वाढेल. जर तुम्हाला अस्वस्थपणा/ भिती वाटत असेल तर काही वेळ भ्रामरी प्राणायाम करून असला-नसलेला अस्वस्थपणा घालवून टाका.
सादरीकरण जास्त चांगले करा.
एकदा कां तुम्ही तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावर काम करायला सुरुवात केली की नृत्य अगदी सहज विनासायास होऊन जाते. नवोदित नर्तकांना योगसाधनेमुळे आत्मविश्वास मिळेल आणि मन शांत ठेवण्यास मदत होईल. परिस्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही तयार असाल. योग साधना करण्याने व्यावसायिक नर्तकांचा दम जास्त काळ टिकेल आणि शरीराची तंदुरुस्ती सुधारेल.