आपल्या घरातील पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला योगाचे धडे शिकवतात! योगी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने आपल्या आसपासच्या जगातील कल्पना आत्मसात करीत असतो. मार्जारी आसन किंवा मांजरीप्रमाणे शरीर ताणणे यामध्ये मांजरीचे शरीर ताणणे याचा योगामध्ये अप्रतिमपणे समावेश केला आहे.
मार्जरी = मांजर; आसन = शारीरिक स्थिती
मांजरीप्रमाणे शरीर कसे ताणावे (मार्जरी आसन) |How To Do Marjariasana
- मांजरीप्रमाणे चार पायांवर गुडघ्याच्या व हाताच्या सहाय्याने उभे राहा. अशाप्रकारे टेबल बनवा की तुमची पाठ म्हणजे टेबलाची वरची बाजू आणि तुमचे हात व पाय हे टेबलाचे पाय होतील.
- तुमचे हात जमिनीला लंबरूप ठेवा, हात हे खांद्याच्या बरोबर खाली असले पाहिजेत आणि हाताचे तळवे हे जमिनीवर सपाट असावेत; दोन्ही गुडघ्यांमध्ये नितंबांच्या रुंदीइतके अंतर ठेवावे.
- दृष्टी समोर सरळ ठेवावी.
- जसा तुम्ही श्वास आत घेऊ लागता तसे हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे, तुमच्या नाभीला खालच्या दिशेला ढकलावे आणि पुच्छहाडाला वर उठवावे.
- या मांजरीच्या पवित्र्यात थोडा वेळ रहा आणि दिर्घ श्वास घ्या.
- आता केलेल्या स्थितीच्या अगदी विरुद्ध स्थिती करा.जसजसे तुम्ही श्वास सोडू लागता तसतसे हनुवटीला छातीकडे आणा आणि पाठीची तुमच्या क्षमतेनुसार कमान करा; नितंबांना सैल सोडा. या स्थितीत थोडी सेकंदे रहा आणि मग तुमच्या पहिल्या टेबलच्या स्थितीत परत या.
- या योगासनातून बाहेर येण्यापूर्वी असे पाच किंवा सहा वेळा करा
- श्री श्री योगा तज्ञांकडून टीप:
- जेंव्हा तुम्ही ही हालचाल सावकाशपणे आणि डौलदारपणे कराल तेंव्हा त्याचा परिणाम अधिक परिणामकारक आणि लाभदायक होईल..
मांजरीप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरी आसन) याचे फायदे|Benefits Of Marjariasana
- पाठीच्या कण्याला लवचिकता आणते.
- मनगटे आणि खांद्यांना बळकटी आणते.
- पचनेन्द्रीयांना मालिश होते आणि पचनक्रिया सुधारते.
- उदर सुडौल बनते.
- पचनक्रिया सुधारते.
- मन शांत बनते.
- रक्ताभिसरण सुधारते.
मांजरीप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरी आसन) याचे निर्बंध|Contraindication of the Marjariasana
पाठ अथवा मान यांचे त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मांजरीप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरी आसन) याचा सराव श्री श्री योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करावा.
<<Child Pose Butterfly Pose >>
योगाच्या नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही. श्री श्री योगा प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगा शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योगा शिक्षक यांचा सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबीराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमचा प्रतिक्रिया नोंदवायची आहे का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा