कटीचक्रासन म्हणजे नांवाप्रमाणे कंबरेतून शरीर फिरवणे होय. या आसनामुळे कंबरेला ताण बसून ती आणखी लवचिक बनते. अगदी कमी वेळेत या आसनामुळे ताण बसून अपचनाची तक्रार दूर होते.
कटीचक्रासन कसे करावे | How to do Standing Spinal Twist
कटीचक्रासन कसे करावे | How to do Standing Spinal Twist
- दोन्ही पाय एकत्र ठेऊन उभे राहूया.
- श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे, तळहात एकमेकाकडे करून जमिनीला समांतर करूया.
- खात्री करून घ्या, दोन्ही तळहातांमध्ये खांद्याएवढे अंतर आहे नां?
- श्वास सोडत कंबरेला पीळ देऊन हळुवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पहा.
श्री श्री योग तज्ञांची सूचना : आपले पाय जमिनीवरून अजिबात हळू देऊ नका. त्यामुळे
तळहातातील अंतर एकसारखे राहूद्या. कंबरेच्या खालील भागात पीळ जाणवतोय नां? कंबरेला चांगला पीळ बसेल.
श्वास घेत आसन सोडा. समोर या.- श्वास सोडत डाव्या बाजूला वळत आसन करा.
- श्वास सोडत आसन सोडा. समोर या.
- आपल्या दोन्ही बाजूंना हि कृती परत परत करत रहा. मग श्वास सोडत हात खाली घ्या.
Sri Sri Yoga श्री श्री योग तज्ञांचा सल्ला : आपले आसन संथपणे आणि ऐटीत करा. शरीराला झटके देत आसन करू नका. जेंव्हा आपला श्वास आणि आपल्या हालचाली यामध्ये ऐटीत समन्वय असेल तेंव्हा आसनाचा लाभ ज्यादा मिळेल.
कटीचक्रासनाचे लाभ | Benefits of the Standing Spinal Twist
- अपचन दूर होण्यास अत्यंत उपयुक्त.
- कंबर आणि मणक्याची लवचिकता flexibility of the spine आणि मजबुती आणि वाढते.
- हाताच्या आणि पायांच्या स्नायूंसाठी उपयुक्त.
- मान आणि खांद्याचे स्नायू खुलतात. पोटातील आणि कंबरेचे स्नायू मजबूत बनतात.
- बैठे काम असणाऱ्यांसाठी अति उपयोगी.
कटीचक्रासन कोणी करू नये | Contraindications of the Standing Spinal Twist
- गरोदरपणात तसेच हर्निया, स्लिप डिस्क आणि अलीकडेच पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास कटीचक्रासन करू नका.
- मणक्याचे काही आजार असतील तर हे आसन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा..