ध्यान तुमच्या आहाराच्या गुणवत्तेवर ध्यानाची गुणवत्ता अवलंबून असते.

आहार फक्त शरिराचे पोषण करत नाही तर मनाच्या सजगतेवर आणि जागृततेवर पण परीणाम करतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या अन्न,शरीर आणि तुमच्या मनाबद्दल समजून घेणे गरजेचे आहे.

आपले शरीर एखाद्या वाद्याप्रमाणे आहे ज्याला रोज तेलपाणी करायची गरज असते. उत्तम संगीतासाठी उत्तम वाद्य पाहिजे. त्याचप्रमाणे, उत्तम ध्यान होण्यासाठी, हलके आणि आरोग्यपूर्ण शरीर गरजेचे आहे. ठराविक काळानंतर, खाण्याच्या चुकीच्या सवयी, आपल्या शरीराला काय गरजेचे आहे याचे अज्ञान, दगदग आणि अशांत झोप, वर्षानुवर्षे शरीर व मनाकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे आजार जडतात.

असंही होते की कधी तुम्ही ध्यानाला बसता पण तुम्हाला झोप येते किंवा असंख्य विचार येत राहतात? तुमचे अन्न हे कारण असू शकते.आहाराबद्दलचे थोडेफार ज्ञान तुमच्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये आणि आयुष्यात बदल आणू शकते.

आपली मानसिकता बऱ्याच अंशी आपण काय खातो यावर अवलंबून असते.

आयुर्वेदात, आयुष्याबद्दलचे सर्वात जुने ज्ञान, मानवी शरीराच्या प्रकारानुसार आणि दोषांच्या असमतोलानुसार, ढोबळ मानाने ३ भाग केले आहेत- वात, कफ व पित्त. मनाच्या अवस्थेनुसार तम, रज आणि सत्त्व असे तीन गुण आहेत. हे तीन गुण आणि तीन दोष जसे एकत्र येतात त्याप्रमाणे आपले व्यक्तीमत्व, स्वभाव, शरीरयष्टी आणि खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ठरतात.

मन सर्वसाधारणपणे शांत, आनंदी आणि निर्मितीक्षम किंवा सात्त्विक असते, त्याचबरोबर, योग्य प्रमाणातील रजोगुण व तमोगुण आपल्या दैनंदिन इच्छा व कामे पार पाडण्यासाठी मदत करतात.

आयुर्वेदानुसार, आपण काय खातो, काय करतो, आपली तब्येत आणि मानसिकता यात परस्पर संबंध आहे. सत्व, रजस् व तमस यांचा आपल्या मनात योग्य ताळमेळ असेल तर कुठल्याही परिस्थितीला प्रतिक्रिया न देता योग्य उत्तर देण्याची संधी आपल्याकडे असते.

सात्त्विक, राजसिक व तामसिक व्यक्तिंची वैशिष्ट्ये

सत्त्वगुण म्हणजे शांतपणा, उत्साह, शुद्धता, निर्मितीक्षमता आणि समज. हे लोक त्यांच्या अन्नाबद्दल सजग असतात त्यांच्या प्रकृतीला योग्य असाच आहार खातात, जसे की ताजे शिजवलेल्या हिरव्या भाज्या, धान्य, फळे आणि रस हा त्यांचा मुख्य आहार असते. यामुळे ते दिवसभर स्वस्थ, हलके आणि उत्साही राहतात.

तमस् म्हणजे सुस्ती किंवा जडपणा. तामसी व्यक्ती आळशी असतात, खूप जास्त झोपतात आणि आळसात दिवस घालवतात, दिवसभर सुस्तावलेले असतात. पण, जेवणाच्या वेळी उत्साहात असतात आणि सर्व प्रकारचे मांस आणि जड पदार्थ खाऊ शकतात.

रजोगुणामुळे लक्ष कृतीवर, अस्वस्थता आणि खूप सारे विचार येणे असे होते. राजसिक व्यक्ती अहंकारी, महत्त्वाकांक्षी, आक्रमक असतात पण मानसिक उर्जा लवकर कमी होणारे असतात, आणि गरम आणि तिखट व गोड पदार्थ आवडणारे असतात.

प्रत्येक प्रकृतीची वैशिष्ट्ये

वात प्रकृती

  • भावनीक तरी कार्यक्षम
  • पटकन शिकतात, नवीन गोष्टींचे आकलन लगेच होते पण पटकन विसरतात.
  • चांगली कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती
  • बारीक, उंच आणि भरभर चालणारे
  • हात व पाय गार असतात आणि थंडीचा ऋतू मानवत नाही.
  • उत्साही आणि आनंदी
  • सारखी बदलणारी मनःस्थिती आणि अनियमित वेळापत्रक
  • पटकन येणारं, थोड्या काळापुरतं उत्साहाचं भरतं
  • असंतुलन झाल्यास काळजी, भिती आणि चिंता वाटणारे
  • कोरडी त्वचा व केस, घाम कमीतकमी किंवा अजिबात न येणे

पित्त प्रकृती

  • मध्यम, कणखर, मजबूत बांधा आणि तीक्ष्ण मन
  • उत्तम एकाग्रता
  • नीटनेटकेपणा, लक्ष केंद्रित करू शकणे, सकारात्मकता, आत्मविश्वास आणि उत्तम वक्ता
  • व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्ववान आणि उद्योजकता
  • जेव्हा पित्त असंतुलीत होते तेव्हा आक्रमक, रागीट स्वभाव, अधीर आणि चिडके, हूकुमशाह, मागे लागणारे व डोक्यावर बसणारे
  • स्पर्धात्मक, उत्कट आणि रसिक
  • चांगली पचनशक्ती आणि भूक
  • जेवणाची वेळ चुकल्यास किंवा थांबायला लागल्यास चिडचिड ‌होणार
  • पटकन चिडचिड किंवा राग येणारे
  • ठराविक शारीरिक त्रास जसे की, पुरळ किंवा गांधी उठणे, तारुण्यपिटीका, गळू, त्वचेचा कर्करोग, तोंड येणे, छातीत जळजळ, निद्रानाश आणि कोरडे किंवा चुरचुरणारे डोळे.

कफ प्रवृत्ती

  • स्थिर, भरवशाचे, विश्वासू, सरळस्वभावाचे, निवांत, संथ, प्रेमळ आणि दयाळू, क्षमाशील, करुणा असणारे आणि सर्वांना सामावून घेणारे
  • काटक शरिर, बळकट, जड आणि तरतरीत बांधा
  • मुद्दाम विचार करून चिंतनशील आणि हळूवार बोलणे
  • शिकण्यासाठी वेळ लागतो पण जास्त वेळ लक्षात राहते
  • मऊ केस व त्वचा, मोठे खोल डोळे, हळू व गोड आवाज. वजन वाढण्याची शक्यता असते आणि पचनशक्ती मंद असते.
  • लगेच उदास होतात पण स्वयंपूर्ण, सभ्य आणि
  • आयुष्याकडून फारश्या मागण्या नसणारे असतात.
  • उत्तम तब्येत आणि चांगली प्रतिकारशक्ती
  • सहसा तोल ढळत नाही आणि आणीबाणीच्या परिस्थितीत सुद्धा शांत असतात
  • आजूबाजूला सुसंवाद आणि शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशील असतात
  • इतरांसाठी, स्थैर्य देणारी व्यक्ती

मालकी हक्क दाखवणारे

थंड आणि दमट हवामान आवडत नाही

सर्दी पडसे, सायनस डोकेदुखी, श्र्वसनाचे आजार जसे की दमा, एथेरोस्क्लेरॉसिस (धमन्या जाड होणे)

आयुर्वेद तुम्हाला तुमचा आहार निवडण्यात मदत करेल.

तुमच्या प्रकृतीनुरूप आहारातील सोपे बदल तुम्हाला आरोग्यपूर्ण व संतुलित जीवन जगण्यासाठी मदत करेल आणि ध्यान अजून चांगले होईल. मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी तम, रज व सत्वगुणांची आवश्यकता आहे. कुठल्याही स्वभाव किंवा प्रकृतीसाठी सात्त्विक आहार हा सर्वोत्तम आहार आहे

जेवढं सत्त्व जास्त तेवढं ध्यान सखोल

विचारपूर्वक आहार निवडा आणि आनंदमयी ध्यानाचा रस्ता मोकळा करा. निरोगी शरीर आणि शांत मन चांगल्या ध्यानासाठी आणि आपल्या आत खोल जाण्यासाठी मदत करते. शाकाहार पचायला हलका आणि उत्तम ध्यानासाठी चांगला आहे