मानसिक धक्क्यानंतर येणाऱ्या तणावामुळे (PTSD)जीवन उध्वस्त होऊ शकते आणि ही गोष्ट खूपच काळजीपूर्वक हाताळत होते. आज अशा तणावाखाली असलेल्या लोकांना त्यांचे जीवन पुन्हा पूर्ववत होण्यासाठी फक्त वैद्यकीय उपचार आणि ध्यान याशिवाय तणाव घालवण्यात अतिशय उपयुक्त असलेल्या योगाचाही समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. योग हे एक असे प्राचीन तंत्र आहे जे शरीर आणि मन दोन्हीवर काम करते आणि धक्क्यातून सावरण्यासाठी खूपच परिणामकारक आहे.
मानसिक धक्क्यातून / आघातातून सावरण्यासाठी काही सोपी आसने खालीलप्रमाणे आहेत.

या प्राणायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, चेहरा तेजस्वी होतो आणि मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. मानसिक आघात झालेल्या लोकांसाठी हा प्राणायाम खूपच चांगला आहे कारण या प्राणायामामुळे मेंदूतील पेशी पुनरूज्जीवित होतात आणि मन उत्साहित होते.

या आसनाने तणाव, थकवा दूर होतो. शरीरातील तणाव दूर झाल्यामुळे मानसिक आघाताचा परिणामही नाहीसा होतो.

ताडासनाप्रमाणेच या असनानेही शरीरातील ताण दूर होण्यासाठीआणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

या आसनाने मेंदू शांत होतो. चिंता, ताण आणि नैराश्य कमी होते. मानसिक आघात झालेल्या लोकांसाठी हे अगदी सोपे आणि परिणामकारक योगासन आहे.

हे सर्व योगासनांच्या शेवटी करण्याचे विश्रांती आसन आहे. याने मेद आणि पेशी पुनरूज्जीवित होतात आणि शरीर तणावमुक्त होते. या आसनाने रक्तदाब, चिंता कमी होते आणि मानसिक आघात झालेल्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
योगामुळे शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो आणि आरोग्य सुधारते. तरीही तो औषधांना पर्याय नाही. प्रशिक्षित योग शिक्षकांकडून योगासने शिकणे महत्वाचे आहे.