आजच्या आधुनिक काळात आपल्या शरीराला बराच तणाव सहन करावा लागतो. या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त तणाव सहन करावा लागतो आपल्या खांद्यांना. माणसाचे शरीर चालत्या फिरत्या यंत्रासारखे दिवसभर कार्यरत असते, इकडे तिकडे धावपळ करते,पोट भरण्यासाठी. शरीराचा प्रत्येक अवयव काही ना काही कार्य करत असतो, पण हा संघर्ष इथेच संपत नाही. कामावर जाताना गाडीत बसून, गाडी चालवत जातो, संपूर्ण दिवस कॉम्पुटरवर काम करत बसतो, तेथेच आपले दुपारचे जेवण घेतो, घरी येऊन पुन्हा टि.व्ही समोर बसतो. परिणाम स्वरूप आपले खांदे हळूहळू आखडत जातात. आणि उजवा खांदा तर अधिकच दुखावतो.
खांदेदुखी कमी करण्यासाठी योग | Yoga to reduce shoulder pain
आधुनिक गतिमान जीवनशैलीमध्ये संपूर्ण दिवस एका खुर्चीत बसून काम करण्याने खांद्यांमध्ये तणाव वाढून खांदे आखडतात. तसेच तेथे चिता आणि तणाव संकलित होऊ लागतात. मग काय केल्याने आखडलेले खांदे पुन्हा लवचिक होतील? या दुखण्यामध्ये योग काही मदत करेल कां ?
नक्की ! यात काही शंका नाही की योगासनांमुळे खांद्यांचा सांधा आणि स्नायुंना विश्राम मिळून तणाव दूर करण्यात मदत होईल. योगासनामुळे मान व पाठीच्या वरील भागाला देखील विश्राम मिळतो. खांद्याचे दुखणे कमी होण्यासाठी श्री श्री योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने योग करणे उत्तम होय. यामुळे ज्या भागाचे दुखणे असेल त्या भागासाठी योगासने योग प्रशिक्षक सुचवतील.
खांद्यासाठी योगासन | Yoga asanas for shoulders
आखडलेल्या खांद्यासाठी कोणती योगासने करावीत?
सकाळी उठल्या उठल्या वॉर्म अप व्यायाम करावा-जसे जॉगिंग, शेकिंग वा जंपिंग. सूर्य नमस्काराने दिवसाची सुरुवात केल्यास अतिउत्तम. शरीरात गरमी निर्माण झाली की खांद्याचे व्यायाम सुरु करावेत. उदाहरणार्थ: खांदे फिरवणे, मान मागे-पूढे करणे, फिरवणे , शरीर वाकवणे, फिरवणे. हळूहळू मग पाठीमागे झुकणे आणि छाती फुलवणे. हि सर्व योगासने श्री श्री योग प्रशिक्षकांकडून शिकाव्यात. ते कुशलतेने मार्गदर्शन करतील.
खुपसे लोक आखडलेल्या शरीरानेच योगाभ्यास करतात. मग नियमित सराव केल्याने, शरीरातील कडकपणा कमी होतो, शरीर सुटत जाते, हलके होत जाते. खांदे नरम होऊन लवचिक होतात. खांद्यासाठी खालील सोप्या योगासनांचा सराव सुरू करावा:
या आसनाने खांदे, छाती आणि मानेला ताण बसतो. खांदे, पाठ आणि मनगटे मजबूत होतात.
या आसनाने खांद्याचे सांधे खूलतात व छातीचे स्नायू खेचले जातात.
हे आसन केल्याने शरीराचा समोरचा भाग ताणवून मजबूत होतो. पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात.
धनुरासन
या आसनामुळे छाती, मान आणि खांद्याचे सांधे खुलतात. तणाव आणि थकवा नाहीसा होतो.
या योग मुद्रा करण्याआधी खालील गोष्टींची काळजी घ्या.
- एक मुद्रा संपवून दुसरी मुद्रा पूर्ण जागरुकतेने, हळूहळू सुरू करा.
- श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास सतत व सामान्य असायला पाहिजे.
- तज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करा. योग मुद्रा व्यवस्थित होऊ लागल्या की योग घरी प्रशिक्षकांच्या सूचनांप्रमाणे घरी करु शकता.
उत्तम उपाय म्हणजे श्री श्री योग शिबीर करा. जवळच्या योग प्रशिक्षकाशी संपर्क साधून आगामी योग शिबिराची माहिती मिळवा. श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञानचर्चेवर आधारित.
हा लेख मीना अरसेल यांनी लिहीला आहे.
योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा..