आयुष्यात आलीत जरी कितीही आव्हाने, त्याला उधळून योग शिकवितो हसणे.. समस्या, संघर्ष वा असो कितीही विघ्ने. योग हटवी फरफट नि मागे पडणे..
आयुष्य म्हणजे सोबत सुख-दु:खाची, योग शिकवी भूमिका विदूषकाची.. बनवी निश्चित मन आणि तन निरोगी, आव्हाने झेलण्या सज्ज, सुदृढ योगी..
जीवनी असोत जरी काळजी, चिंता, योगाने दिधले नवे साधन हाता.. होई मन शांत अन सुदृढ शरीर, योगाने लाभे गहन व स्पष्ट विचार..
जरी झाले मन कुंठित अन आठ्या कपाळी, योगाने व्हाल विजेते, गवसेल झळाळी.. वादळे झेलण्यासाठी सज्ज तुम्ही होणार, योगाच्या सामर्थ्याने त्यास पुरून उरणार..
मन झुलते भविष्य अन भूतकाळात, पोषण करण्या ऊर्जा मिळे योगात.. वर्तमान क्षणाची शक्ती असे प्रबळ, साधकाच्या कीर्तीचा चहूकडे दरवळ..
जीवन किती सुंदर असे हे मित्रा ! योगाचे तेज थक्क करी तव गात्रा.. चमकत, उजळत सदा तू चिरतरुण, कसे फेडावे अनमोल योगाचे ऋण..