या आसनाला “नटराजासन” हे नाव नृत्य करणाऱ्या ईश्वराच्या स्थितीवरून पडले आहे.
नटराजासन १ कसे करावे:
- जमिनीवर पाठीवर झोपा. उजवा गुढघा वाकऊन उजवा पाय डाव्या गुढघ्याच्या बाहेर ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करा.
- श्वास घ्या. श्वास सोडत शरीराला डावीकडे पीळ द्या. डोके उजवीकडे वळवा, उजव्या खांद्यावरून पहा.
- दोन्ही खांदे जमिनीवरच ठेवत उजवी मांडी जमिनीकडे दाबा. मांडी आणखी खाली आणण्यासाठी डाव्या हाताने दाबू शकता.
- या स्थितीत स्थिर रहा. दीर्घ श्वसन सुरु ठेवा.
- श्वास सोडत विश्राम करा.
- दुसऱ्या बाजूला आसन करूया.
नटराजासान १ चे लाभ:
- कंबर, पाठीचा खालील भाग, ओटीपोट आणि मानेचे स्नायू लवचिक आणि बळकट बनतात.
- पाठीचा कणा लवचिक बनतो.
- पचनक्रिया सुधारते.
हे आसन कोणी करू नये:
- ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे.
Natarajasana video