सर्वांगासानामध्ये संपूर्ण शरीराचा तोल खांद्याच्यावर सांभाळला जातो. हे एक पद्मसाधना तील आसन आहे. नांवाप्रमाणेच या आसनामध्ये सर्व शरीराचे कार्य प्रभावित होते. या आसनामुळे उच्च दर्जाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते. म्हणून या आसनाला ‘आसनांची महाराणी’ संबोधतात.
जर तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मल नाही आहे, तुम्हाला काचबिंदू आहे, तुमच्या डोळ्याचे पटल वेगळे झालेले आहे, तुम्हाला तीव्र थायरोईडचा विकार आहे, मानेच्या किंवा खांद्याच्या दुखापती असतील तर सर्वांगासन करण्यापूर्वी कृपया तुम्ही तुमचे योग प्रशिक्षकांचा तसेच डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
सर्वांगासन कसे करावे (खांद्यांवर कसे उभे राहावे) | How to do Sarvangasan
- पाठीवर झोपा. संथ गतीने तुमचे पाय, नितंब आणि पाठ असे उचला की ते तुमच्या खांद्याच्या वर
- येतील.
- तुमच्या हातांची कोपरे एकमेकांच्या जवळ आणा आणि तुमचे हात तुमच्या पाठीच्या जवळ खांद्याच्या दिशेने आणा. कोपारांना जमिनीवर आणि हातांना पाठीवर दाबून ठेवत पाय आणि पाठीचा कणा हे दोन्ही एकदम सरळ ठेवा. तुमच्या शरीराचे वजन हे तुमचे डोके व मान यावर न पेलता तुमच्या खांद्यांवर आणि हातांवर पेललेले पाहिजे.
- पाय स्थिर ठेवा. तुमच्या टाचांना इतक्या वर उचला की जणू तुम्ही छतावर पाय ठेवणार आहात. पायाच्या अंगठ्याला नाकाच्या रेषेत सरळ आणा. आता पायाच्या बोटांना छताच्या दिशेने करा. तुमच्या मानेकडे लक्ष राहू द्या. मानेला जमिनीत खाली दाबू नका. त्याऐवजी मानेचे स्नायू थोडेसे आखडून घ्या त्यामुळे मान भक्कम होईल. तुमच्या छातीचे हाड/उरोस्थीला हनुवटीवर आणा. जर मानेला कोणत्याही प्रकारचा थोडासाही ताण पडत असेल तर ताबडतोब हे आसन सोडा.
- खोल श्वास घ्या आणि या आसनामध्ये ३०-६० सेकंद राहा.
- हे आसन सोडण्यासाठी प्रथम गुडघ्यांना कपाळाच्या दिशेने आणा. हातांना जमिनीवर आणा, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने. डोके न उचलता एक एक मणका करीत पाठीचा कणा संपूर्णपणे खाली आणा. पायांना जमिनीवर आणा. ६० सेकंद आराम करा.
सर्वांगासनाचे फायदे | Benefits of Sarvangasan
- थायरोईड आणि पॅराथायरोईड ग्रंथींना चालना देते आणि त्यांचे कार्य कार्य सुधारते.
- हात आणि खांदे यांना बळकट होतात आणि पाठीचा कणा लवचिक बनतो.
- मेंदूला अधिक रक्तपुरवठा मिळाल्यामुळे त्याचे चांगले पोषण होते.
- हृदयाच्या स्नायूंना ताण पडल्यामुळे अशुद्ध रक्ताचे हृदयाकडे अधिक वहन होते.
- मलावरोध, अपचन आणि वेरीकोस व्हेन्स (अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा विकार) यापासून आराम मिळतो.
सर्वांगासन कोणी करू नये | Contraindications to Saravangasan
गरोदरपणा, मासिक पाळी, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, स्लिप डिस्क, स्पॉन्डीलोसीस, मान दुखी, थॉयरॉइड जर असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्व पाहा - पाठीवर झोपून करावयाची योगासने
<< Plow Pose Wind-Relieving Pose >>
योगाभ्यासाने शरीर व मनाचे स्वास्थ्य खूपच सुधारत असले तरी तो औषधोपचारांना पर्याय होऊ शकत नाहीत. योगासने ही श्री श्री योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच शिकली पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचार घेणाऱ्या व्यक्तींनी योगासने डॉक्टरांचा व श्री श्री योगशिक्षकांच्या सल्ल्यानंतरच करावीत. आपल्या भागातील जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रावर श्री श्री योग शिबिर कधी आहे ते शोधा. अभ्यासक्रमांविषयी माहिती हवी असेल अथवा तसेच तुमच्या प्रतिक्रिया info@srisriyoga.in या संकेत स्थळावर (Email ID) नोंदवा.