माझ्या सहकाऱ्यांना सादर करावयाच्या काही गोष्टी मी पडताळून पहात होतो. माझी तयारी झालेली नव्हती. अंर्तमनात मला दडपण जाणवत होते. माझा थरकाप उडाला होता. तळव्यांना घाम आला होता. मिनिटा गणिक माझ्या ह्रदयाची धडधड वाढत होती. मी काय वाचत होतो इकडे माझे लक्ष एकाग्र होत नव्हते. अर्थात या सर्व गोष्टी नक्कीच सुखावह नव्हत्या. हे सर्व मनातल्या भीतीमुळे घडत होते याची जाणीव मला होती. इतक्या लोकांसमोर बोलताना माझी घाबरगुंडी उडणार होती याची मला भीती वाटत होती.
नुकतेच जे काही मी शकलो होतो याचा सराव करण्याची आवश्यकता आहे याची जाणीव मला झाली. मी लगेचच डोळे मिटून खाली बसलो, माझ्या श्र्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केले आणि काही मिनिटे ध्यान केले. ध्यान धारणेमुळे माझे मन शांत झाले, आणि मला आतून बळ मिळाले.
“भिती” म्हणजे दुसरे काही नसून उलट्या झालेल्या प्रेमाचे शेवटचे टोक असते. तुम्हाला कशाची भिती वाटते? तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट तुमच्या परिचयाची नाही अशा गोष्टींबद्दल तुम्हाला भिती वाटते बरोबर? समजा तुम्हाला दिलेले काम वेळेत पुरे झाले नाही तर तुमचा “बॉस” तुम्हाला ओरडेल अशी भिती तुम्हाला वाटत असते किंवा एखादी बॅडमिंटन मॅच खेळताना आपण हारू अशी भिती तुम्हाला वाटत असते.
या अंर्तमनातून वाटणाऱ्या भीतीचे रुपांतर परत प्रेमात करता येते कां? ध्यान धारणेमुळे असे घडू शकते. कसे ते आपण आता पाहुया.
भीतीचे बियाणेच नष्ट करा
१. गत काळातल्या ओझ्या पासून मुक्त व्हा.
पूर्वी घडून गेलेल्या एखाद्या घटनेचे पडसाद तुम्हाला वर्तमान काळात कसे त्रास देतात हे तुमच्याकधी लक्षात आले आहे का? समजा तुम्हाला कुत्र्यांबद्दल भिती वाटत असली तर त्याचे मुळ तुमच्या गतकाळात दडलेले असते. पूर्वी तुम्हाला किंवा तुमच्या माहितीतल्या एखाद्या इसमाला कुत्र्यांसंबंधी वाईट अनुभव आलेला असला तर त्या अनुभवाची परत पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून भीतीपोटी तुम्ही कुत्र्यापासून लांब रहायचेच पसंत कराल.
लहान मुलांना कशाचीच भिती वाटत नाही? कारण अशा भीतीदायक घटनांचे ठसे त्यांच्या मनावर उमटलेलेच नसतात. परंतू आपण जस जसे मोठे होत जातो तस तसे आपल्या मनावर चांगल्या, वाईट घटनांचे ठसे उमटायला लागतात. मनावर उमटलेल्या या ठश्यांचे पर्यावसन पुढे भिती किंवा तिरस्कारामध्ये होते. कोणाला काळोखाची भिती वाटते तर कोणाला उंचीची भिती वाटते. मनातल्या भीतीचे ठसे पुसले जातात आणि अंतस्थ तुम्हाला मोकळे वाटायला लागते.
रुपाल राणा म्हणतात, “मला रात्री झोपेत चालण्याची सवय होती. मला सारखी भिती वाटायची की माझ्यावर मागून कुणीतरी हल्ला करतेय. माझ्या एका मित्राने मला रोज ध्यान करण्याचा सल्ला दिला. आता जवळपास दोन वर्षे होऊन गेली आहेत मी रोज नियमितपणे ध्यान करते आणि मला आता कशाचीही भिती वाटत नाही”.
२. भीतीचा जोराने सामना करा.
समजा तुम्हाला काही दिवसात एका मुलाखतीला जायचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्वत:चे कधी निरीक्षण केले आहे का? तुम्ही किती घाबरलेले असता आणि तुमच्या मनात प्रश्नांचे थैमान असते. “काय होईल? ते मला काय विचारतील? मी मुलखत व्यवस्थित देईन का? अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या विचारांमुळे तुमच्या मध्ये भिती निर्माण होते.
ध्यान केल्याने मन शांत होते आणि कुठल्याही परीस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य देते. जे काही होणार आहे ते चांगलेच होणार हा विश्वास ध्यान केल्याने येतो, जरी तुम्हाला काही गोष्टी नवीन असल्या तरी. ह्या मुलाखतीत निवड झाली नाही म्हणून काय झाले? तुम्हाला माहित असते की भविष्यात तुमच्या साठी पेक्षा काही तरी चांगले होणार आहे.
ध्यान धारणेमुळे भविष्यातल्या अनिश्चित गोष्टींची काळजी वाटेनाशी होते. आणि मन वर्तमान काळात जगायला लागते. वर्तमान काळातच तुम्ही कृती करू शकता (भविष्यात तुम्ही कृती करू शकता कां?). मनातली भीतीची भावना नष्ट झाल्यामुळे तुम्ही वर्तमान काळात निश्चिंत मनाने कृती करू शकता.
“ध्यान धारणा तुम्हाला वाचविते साहिब सिंग म्हणतात, “MBA च्या परीक्षे वेळी मी केलेला सगळा अभ्यास ऐनवेळी विसरून जाईन” याचीच मला भिती वाटत असायची. पुढे मी ध्यान करायला शिकलो, नापास व्हायची माझ्या मनातली भिती नष्ट झाली आणि मी उत्तम प्रकारे MBA ची परीक्षा दिली”.
काळजी, चिंता वाटण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्राण शक्तीचा अभाव. ध्यान धारणेमुळे शरीरातल्या प्राण शक्तीची पातळी वाढते आणि त्यामुळे सहाजिकच सगळ्या चिंता, काळज्या या मिटतात.
३. ‘मी’ पणा सोडून द्या.
आपण जेव्हा एखाद्या पार्टीला किंवा समारंभाला जातो तेव्हा इतरांवर प्रभाव पडण्याचा प्रयत्न आपण करीत अस्तो. इतर लोक आपल्या बद्दल काय बोलतात याचीच चिंता आपण जास्त करत असतो. याचे मुख्य कारण आपला ‘अहंकार’. त्या अहंकारालाच आपण जपत असतो.
त्याउलट तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांच्या घोळक्यात असता तेव्हा त्यांच्यामध्ये अगदी मोकळेपणाने वावरत असता. तुमच्यावर कसले दडपण नसते, अगदी स्वाभाविक पद्धतीने तुम्ही त्यांच्यात मिसळत असता. नैसर्गिक तऱ्हेने वागणे हा तर अहंकारावर उत्तम उतारा आहे, आणि ध्यान धारणेमुळे तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावाकडे येता. ध्यान तुम्हाला नैसर्गिक बनवते.
कामना अरोरा म्हणाल्या, “आमच्या सामाजिक वर्तुळात मीच फक्त शाकाहारी होते. त्यामुळे इतर लोक माझ्या कसा स्वीकार करतील याची सतत मला काळजी वाटायची. या भीतीपोटी बऱ्याच वेळेला त्यांना मी पण मांसाहारी आहे असे सांगत असे. ध्यान धारणा नियमित करायला लागल्या नंतर मात्र मला धीर आला आणि शाकाहारी आहे असे ठणकावून सगळ्यांना सांगायला लागले. उलट मी शाकाहारी असल्याचा मला आता अभिमान वाटतो.”
भिती पासून सुटका मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या ध्यानासाठी काही उपयुक्त सूचना
- · तुम्हाला चिंतेनेधारणा ग्रासले असेल किंवा कसलीतरी काळजी वाटत असेल तर काही मिनिटाची ध्यान धारणा त्यावर एक चांगला उपाय आहे.
- · हममम..... ची प्रक्रिया भिती घालवण्यासाठी उपयोगी पडते.
- · नेहमी हे लक्षात ठेवा की जे काही होते ते चांगल्या साठीच होते.
- · रोज निदान २० मिनिटे तरी ध्यान धारणेचा नियमित सराव करत रहा म्हणजे काही काळाने तुम्हाला चिंता, काळज्या यावर ताबा मिळवता येईल.
- · ध्यानासाठी खरेतर सकाळची वेळ सगळ्यात उत्तम परंतू दिवसभरात तुम्ही ध्यान कधीही करू शकता. फक्त ध्यान करताना पोट हलके असायला हवे. भरल्या पोटी ध्यान करू नये.
- · ध्यान धारणा सखोल आणि गाढ होण्यासाठी एखादा निवांत, शांत कोपरा निवडा.
भीतीची दुसरी बाजू
जेवणात चवीसाठी आपण जसे मीठ घालतो त्याप्रमाणे थोडीशी भिती आवश्यक आहे.
लोकांना कसली भीतीच वाटत नसेल तर काय होईल? याची नुसती कल्पना करा. विद्यार्थ्यांना नापास होण्याची भिती नसेल तर ते अभ्यास करतील कां? आजारी पडण्याची तुम्हाला भीतीच वाटत नसेल तर तुम्ही आरोग्याची काळजी घ्याल कां? म्हणून भिती काही प्रमाणात असणे हे आपल्या भल्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
प्रेरणा - श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञान वाणी
दिव्या सचदेव, चिंकी सेन या सहज समाधी ध्यान धारणेच्या तज्ञांनी केलेले संकलन.