आपल्याला डोकेदुखी होण्यामागची कारणे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी कोणते ‘ध्यान’ करावे या संबंधित सूचना:
- ताण
- शारीरिक आणि मानसिक श्रम
- शरीर-मन प्रणालीतील असमातोल
- डोक्याला होणाऱ्या रक्तपुरवठ्याची कमतरता
- रात्रीच्या वेळी अपुरी झोप
- कर्कश्य आवाज
- सतत फोनवर बोलणे
- खूप विचार करणे
डोकेदुखी – हे नाव जरी नुसते काढले तरी आपल्याला मागच्या वेळी झालेल्या डोकेदुखीची आठवण येते! हा त्रास सुरुवातीला मंद असतो, हळूहळू वाढतो व नंतर कधी कधी असह्य होतो? आणि असे वाटते की डोक्याला दोन्ही तळहाता मध्ये घेऊन मुठी आवळून डोके भिंतीवर आदळावे!
जर आम्ही सांगितले की तुम्हाला डोकेदुखीच्या त्रासापासून मुक्ती फक्त तुमच्या आवळलेल्या मुठी उघडून मिळेल तर? पुढील वेळी तुम्हाला डोकेदुखी झाली की, डोळे मिटा, मुठी उघडून आकाशाच्या दिशेने ठेवा आणि एक दीर्घ श्वास घ्या. जास्तीत जास्त वेळ या स्थितीत आराम करण्याचा प्रयत्न करा - या स्थितीला आम्ही ध्यानधरणा म्हणतो.
ध्यान करून बचाव करा: घरच्या आणि कामाच्या ठिकाणी अतिश्रम करणे - अशावेळी काही मिनिटे केलेले ध्यान तुम्हाला ताजेतवाने करते. २० मिनिटे ध्यान केल्याने तुमचा सकाळचा तजेलपणा आणि हास्य तुम्ही सायंकाळी सुध्दा परत आणू शकता. हे ध्यान तुम्हाला पूर्णपणे आराम देते ज्यामुळे सायंकळचा वेळ तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही आनंदाने घालवू शकता.
ध्यान करून बचाव करा:– तुमच्या लक्षात आले असेल की जर तुमचे पोट बिघडलेले असेल तर तुम्हाला डोकेदुखी होते. आपल्या शरीरातील अवयव हे एकमेकांशी जोडलेले आहेत व एका अवयवातील असंतुलन थेट दुसर्याक अवयवावर परिणाम करते.
ध्यान केल्याने हे असंतुलन पूर्ववत करून साठलेला ताण व हानिकारक गोष्टी शरीराच्या बाहेर फेकून देण्यास मदत होते. ते तुमच्या शरीराच्या पचन क्रियेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही दररोज ध्यान करता, तुम्ही प्रत्येक दिवसागणिक तुम्ही काय व किती खाता याविषयी जागृत होता. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आहारा विषयी जागृत राहता, तुमच्या पचनशक्तित सुधारणा होऊन शरीरातील विविध प्रणालींमध्ये सुसंगतपणा निर्माण होते. म्हणजेच डोकेदुखीच्या त्रास कमी.
ध्यान करून बचाव करा: रोज दिवसातून दोन वेळा, १० - २० मिनिटे ध्यान केल्याने मन आणि शरीर यांना पूर्ण विश्रांती मिळते शिवाय डोक्याच्या भागाला रक्तपुरवठा होऊन त्या भागात रक्ताभिसरणात सुधारणा होऊन डोकेदुखीची शक्यता कमी होते.
ध्याना व्यतिरिक्त तुम्ही काही योगासने करण्याचा प्रयत्न सुध्दा करू शकता ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होईल. उदाहरणार्थ - हस्तपादासन, सर्वांगासन आणि हालासन.
ध्यान करून बचाव करा: कार्यालयीन कामाच्या लांब वेळा, धावपळीची कार्य संस्कृती किंवा फक्त टीव्ही आणि इंटरनेटच्या समोर बसणे ही उशिरा झोपण्याची करणे असू शकतात. उशिरा झोपण्याची व त्याची सवय करण्याची चांगली कल्पना नसली, तरी काही वेळेस ती अटळ असते. ज्या दिवशी तुम्हाला एखाद्या प्रकल्पाची अंतिम मुदत असते किंवा उशिरापर्यंत ग्राहकांशी बोलणे अनिवार्य असते - तेथे आपण काहीच करू शकत नाही. परंतु अशावेळी, एका ठिकाणी बसून व २० मिनिटे ध्यान करून आपण कामाच्या ताणावर नियंत्रण आणू शकता.
ते तुमच्या मनाला आराम देईल, तुम्हाला उत्साही ठेऊन तुमची कार्य करण्याची क्षमता वाढवेल. खरे म्हणजे, तुम्ही नियमीत केलेल्या ध्यानाच्या सरावामुळे, तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुम्ही तुमचे काम लवकरात लवकर उशिरपर्यंत जागे न राहता संपवू शकता.
ध्यान हे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. तुम्हाला माहीत आहे का की २० मिनिटांचे ध्यान हे तुमच्या ८ तासांच्या झोपेपेक्षा जास्त गहन विश्रांती देते? ह्याचा अर्थ असा नाही की ध्यान हे झोपेला पर्याय आहे. पण जेव्हा तुम्ही ध्यान करता, तुम्ही जास्त शांत झोपु शकता.
ध्यान करून बचाव करा: हा असह्य आवाज आपण सर्वांनी कुठे ना कुठे तरी, कधी ना कधी अनुभवला असेलच. आणि आपण काही जण तो असह्य होऊन शेवटी डोकेदुखीची तक्रार करतो.
ध्यानाचा एक प्रभाव म्हणजे ते आपल्याला कोणतीही परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची ताकद देते जेणे करून आपण कोणत्याही परिस्थितीत, कोठे ही शांत व सहजतेने राहू शकतो. म्हणून जरी तुमच्या आजूबाजूला गोंगाट असेल, तरी तुम्ही ध्यान करत असल्यामुळे व अंतर्मनातून शांत असल्यामुळे, त्याचा परिणाम तुमच्यावर जास्त होत नाही.
सूचना : नियमित ध्यान केल्याने तुम्हाला अंतर्मनातून शांत झाल्याचा अनुभव येईल. अशा काही परिस्थिती असतील की जेव्हा तुमच्या भोवती आवाज असतील व तुम्हाला डोकेदुखी होईल पण नियमीत ध्यानाचा सराव केल्याने, तुम्हाला तो सुसह्य होईल व स्वीकारण्याचे बळ येईल.
ध्यान करून बचाव करा: ही एक कठीण परिस्थिती आहे जी खूप वेळा बदलू शकत नाही. संपूर्ण दिवसातून गिर्हाकईकांचे फोनकॉल किंवा संपूर्ण जगात पसरलेल्या आपल्या मित्रमैत्रिणी समवेत बोलणे जे आपण रोजच आपल्या जीवनात करत असतो ! कधी कधी हे अती प्रमाणात झाल्याने आपल्याला डोकेदुखी होते.
परंतु काळजी करण्याचे कारण नाही. जेव्हा तुम्हाला डोके चक्रावत आहे असे वाटेल तेव्हा काही मिनिटे ध्यान करा. ते तुम्हाला विद्युत उपकरणे वापरुन झालेल्या तणावापासून मुक्त करून तुमच्या मज्जासंस्थेला संपूर्ण विश्रांती मिळवून देईल.
मला साधारणपणे १० वर्षे अर्धशिशीचा त्रास होता आणि तो इतका असह्य होता की मी काही वेळा एका जागे वरून हलू सुद्धा शकत नव्हते – तीव्र वेदना होत असत. पण मी जेव्हा ध्यान करण्यास सुरूवात केली, त्यावेळी मला थोड्याच दिवसात बदल जाणवायला लागला. प्रथम वेदनांची तीव्रता कमी होत गेली आणि आता डोकेदुखी होण्याच्या पुनरावृत्तीचा वेग पण रोज ध्यान केल्यामुळे कमी झाला - सारा जोसेफ, पोलंड.
ध्यान करून बचाव करा: एक उपाय आहे - जास्त विचार करू नका! परंतु काही वेळेस ते अपरिहार्य असते. रोजच्या जीवनातील तणाव, कार्यालयीन दडपण, कौटुंबिक समस्या, नाते संबंधातील समस्या - या सर्वांचा आपण विचार न करता कसे रहाणार? पण, तुम्ही असे करू शकता की दिवसभरातला थोडा वेळ काढून डोळे मिटा, आराम करा, बाहेरचे जग थोडावेळा पुरते विसरा आणि हा वेळ 'फक्त तुमचा आहे' असे समजा व तो फक्त तुमच्यासाठी घालवा. हे करून पहा आणि फरक अनुभवा.
आणखी काय आहे की ज्याच्यामुळे डोकेदुखी पासून मुक्तता मिळेल?
- नियमीत योगासनांचा सराव करणे उदाहरणार्थ आधी नमुद केलेली आसने, प्राणायाम - नाडी शोधन (नाकपुडीने आळिपाळीने श्वास घेणे) आणि भ्रामरी प्रभावी आहेत, त्यानंतर २० मिनिटांचे ध्यान.
- भरपूर पाणी प्या – काहीवेळा आपल्याला ध्यान किंवा योगासने केल्या नंतर सुद्धा डोकेदुखी होते! याचे कारण असे की ध्याना नंतर आपल्या शरीरातून हानिकारक द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि म्हणूनच आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन योग्य ठेवले पाहिजे जेणेकरून आपली प्रणाली संपुर्णतः शुद्ध होईल व आपल्याला डोकेदुखी होणार नाही.
- आयुर्वेद आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या प्रभावशाली वनस्पती आहेत ज्या डोकेदुखी पासून मुक्त करतात. उदाहरणार्थ - विड्याचे पान, लवंग, लसूण, आले आणि मेंदी.
प्रेरणा: श्री श्री रविशंकर यांची ज्ञानगंगा
शब्दांकन : प्रितिका नायर, आधारित पुरवलेली माहिती - भर्हाचटे हरीश, सहज समाधी ध्यान शिक्षक आणि निशा मणीकंठन, आयुर्वेदाचार्या